A.B.Goregaonkar English School

A.B.Goregaonkar English School सर्व A B Goregaonkar ex Students ना एकत्र एकाच मंचावर आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न
"मराठी शाळा टिकल्य

15/05/2025
04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 41
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...

नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आज चा विद्यार्थी सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट विक्रांत बासुतकर... याची यशोगाथा त्याच्याच शब्दात.... विक्रांत तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!नमस्कार,
सर्वप्रथम पांढरकामे बाईंचे मनापासून आभार या सदरामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आणि अभिनंदन सुद्धा खूप चांगला, वेगळा आणि स्तुत्य उपक्रम चालविल्याबद्दल

मी १९९७ च्या बॅचचा. ५ वी ला शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा मनामध्ये खूप संमिश्र भावना होत्या. एकतर नवीन शाळा, खूप प्रसिद्ध आणि हुशार मुलांची शाळा, आपण तग धरू शकू कि नाही आणि महत्त्वाचे म्हणजे शाळेला मिळालेले प्रशस्त मैदान म्हणजे खेळण्याची भरपूर मज्जा! शाळेमध्ये असणारी विहीर, प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांबद्दल वगैरे पण मित्रांच्या शाळेत असणाऱ्या मोठ्या भावंडांकडून खूप ऐकले होतं त्यामुळे हे सगळं बघण्याची आणि अनुभवण्याची खूप उत्सुकता होती. आणि अजून एक म्हणजे शाळेला येण्यासाठी बसने एकट्याने प्रवास करायला मिळणार होतं, म्हणजे त्यावेळेला ती सुद्धा एक मजा वाटायची काहीतरी वेगळं आणि प्रौढ असल्याचा भाव मनात यायचा. तर एकूणच छान सुरुवात झाली.

शाळेतल्या सगळ्या आठवणी सविस्तर सांगायच्या तर मला वाटतं खूप मोठा प्रबंध लिहावा लागेल आणि आजकालच्या insta आणि facebook च्या reels च्या जमान्यात एवढा मोठा प्रबंध out of trend होईल. पण तरीही काही गोष्टी या नमूद करण्यावाचून गत्यंतर नाही, त्या पुढीलप्रमाणे :

१. "कला ज्ञान क्रीडा" हे शाळेचं ब्रीदवाक्य. एवढं सुंदर आणि अर्थपूर्ण ब्रीदवाक्य माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा इथे खूप खोलवर विचार केलेला आहे हे जाणवतं. जो विद्यार्थी या ब्रीदवाक्याला प्रमाण मानून चालेल तो विद्यार्थी केवळ शालेयच नाही तरी पुढील व्यवहारी जीवनात पण नक्कीच यशस्वी होईल, आणि हे मी स्वानुभवातून सांगतो
२. शाळेचा क्रीडामहोत्सव आणि त्या वेळचे विद्यार्थ्यांनी चालवलेले कॅन्टीन
३. शाळेचे खो-खो आणि कबड्डीचे संघ ज्यांनी त्यावेळेला राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती
४. एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट चित्रकला स्पर्धा
५. विविध स्पर्धा परीक्षांमधील शाळेचा आणि शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन
६. रामन विज्ञान मंडळ आणि त्यातील उपक्रम
७. शाळेचं वाचनालय आणि त्यातील विविध विषयांची पुस्तके (मी या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे)

हे सगळे सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच की या सर्व गोष्टींचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर खूप प्रभाव आहे म्हणजे आज मी जो काही आहे त्यामध्ये शाळेचा आणि या सर्व गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे. एवढंच नव्हे तर मी माझ्या मुलाला सुद्धा आपल्या शाळेच्या प्राथमिक मधेच घातले (डोसीबाई जिजीभॉय) आणि तो सुद्धा त्याच्या परीने यशस्वी वाटचाल करतो आहे. तो आता नववीत आहे. आपल्या शाळेमध्ये आता पाचवी पासूनच Semi-English सुरु झालं आहे आणि या लेखाच्या माध्यमातून मी सर्व मराठी पालकांना आवाहन करू इच्छितो की मराठी शाळांमधून शिकून सुद्धा तुम्ही किंवा तुमचा पाल्य आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो आणि आपल्या शाळेसारख्या शैक्षणिक संस्था हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या आहेत. आणि माझी सहचारिणी ही माझी वर्गमैत्रिणच आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगावेसे वाटते. असो.

१९९७ मध्ये त्यावेळी मुंबई विभागात २१ व्या गुणानुक्रमाने उत्तीर्ण होऊन मी नरसी मोनजी या मुंबईतील प्रथितयश अशा वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश मिळवला .तिकडे कडू-गोड अनुभव घेत मी माझी पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर Chartered Accountant (सनदी लेखापाल) बनण्यासाठीचा प्रवास सुरु झाला. CA बनण्यासाठी जी मेहनत घेतली ती तर मी कधीच विसरू शकणार नाही, माझ्या CA मित्रांना अजूनही CA च्या परीक्षेत नापास झाल्याची स्वप्न पडतात.

२००७ साली CA झाल्यावर J P Morgan, KEC International Limited या सारख्या मोठ्या व काही छोट्या कंपन्यांमध्ये १० वर्ष नोकरी करून आता मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे २०१७ पासून.

चिरीमिरी चिरीमिरी धूम धडाका, हय्या ! ह्या आपल्या शाळेच्या घोषवाक्याने मी समारोप करतो. धन्यवाद!

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा  सदर क्रमांक 40माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम स्कूल के जिंदगी के साथ भी स...
04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 40
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...
मंडळी ...
आज आपणा सर्वांना मेजवानी आहे👍👌

**' स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी'....
नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आज चा विद्यार्थी शेफ मास्टर अभिजीत बागवे(L.L.B....Lord of last bench) याची यशोगाथा त्याच्याच शब्दात.... अभिजीत.. तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!! असेच उत्तम, उत्तम, छान, छान, स्वादिष्ट ,उत्कृष्ट... आणि तोंडाला पाणी सुटणारी चवीचे पदार्थ बनव या तुला खूप खूप शुभेच्छा!!!

**प्रत्येक यशाची सुरुवात झगमगाटाने होत नाही.
माझी गोष्ट सुरू झाली ए.बी. गोरेगाव 🏫 इथून, जिथे मी १९९८ पर्यंत शिकलो.
आता जर तुम्ही समजत असाल की मी हुशार, टॉपचा विद्यार्थी होतो... तर थोडं थांबा!
मी बेंचच्या मागच्या रांगेत बसणारा, शिक्षकांपासून लपणारा विद्यार्थी होतो 📚.
अभ्यास आणि माझं नातं थोडं गुंतागुंतीचं होतं.

पण आयुष्य नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवतं.
माझ्यासारख्या धांदरट मुलावर विश्वास ठेवणारे शिक्षक होते — पांढरकामे मॅडम, मोरे सर, फडतरे सर आणि बरेच जण — ज्यांनी मला हार मानू दिली नाही.
आणि मित्र — राजेंद्र मोरे आणि देवेन भोळे 🧑‍🤝‍🧑 — ज्यांनी मला अक्षरशः पुढच्या बाकांवर बसवलं (ओढत नेलं म्हणा ना)!

कसेबसे मी कॉमर्स पदवी 🎓 पूर्ण केली.
तेव्हा माझे काही मित्र १२वी नंतर थेट हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेत होते. पण मी मात्र आधी कॉमर्स पूर्ण केलं आणि मगच हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेतला.
(सुरुवातीला तर मला हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, हेही नीट समजत नव्हतं! 😅)

माझ्या मोठ्या भावाने Five Star Hotel 🏨 (पूर्वीचं Centaur Hotel) मध्ये काम सुरू केलं, आणि त्याचं मोठं हॉटेल, यशस्वी करिअर पाहून माझं या क्षेत्राकडे आकर्षण वाढायला लागलं.

घरातही एक वेगळीच जादू होती.
आई "खाना खजाना" 🍳सारखे कार्यक्रम टीव्हीवर पाहायची — विशेषतः शेफ संजीव कपूर यांच्या रेसिपीज पाहायची, आणि मग घरी नवनवीन पदार्थ बनवायची.
घरात सतत अशा पाककृतींचा गोड वास दरवळायचा 🍰, आणि त्या सुगंधाने मला नकळत स्वयंपाकाची आवड लागली.
आजही आठवतंय — आईने आम्हा भावांसाठी तयार केलेल्या घरगुती केकचा गोड वास अजूनही मनात ताजाच आहे.

हे सगळं पाहून आणि अनुभवून — शेवटी मी मनापासून ठरवलं की हॉटेल मॅनेजमेंट हाच माझा खरा मार्ग आहे!
आणि मग सुरू झाला माझा स्वादिष्ट प्रवास!

आज मी नैरोबी वेस्टलँड्स ✈️ मधील एका लक्झरी हॉटेलमध्ये किचनची जबाबदारी सांभाळतो — शहरातील एक नामांकित हॉटेल!
पुस्तकांमागे लपणाऱ्या त्या मुलापासून ते आज जगभरात चवांचा कारभार करणारा शेफ होईपर्यंतचा प्रवास खूप खास राहिला आहे.

या प्रवासात मला काही अप्रतिम ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळाली:

नोवोटेल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 🏨 – जिथे आम्ही भारतातील टॉप ५० रेस्टॉरंट्स मध्ये स्थान मिळवलं आणि Times Good Food Award 🏆 जिंकला.

डब्ल्यू गोवा – जिथे Sunburn फेस्टिव्हल 🎶, भव्य लग्नसोहळे आणि समुद्रकिनाऱ्यावरील भन्नाट पार्टीजमध्ये स्वयंपाक केला.

Viking Cruises 🚢, हयात इस्तंबूल Ataköy 🇹🇷, आणि The Ritz-Carlton Bangalore, Park Hyatt Goa, Renaissance Mumbai यांसारख्या आंतरराष्ट्रीय अनुभवांनी माझ्या कौशल्याला नवे आयाम दिले.

आणि सर्वात अनोखा अनुभव?
दररोजच्या जेवणासाठी 🥗🍛 — फक्त कार्यक्रमांसाठी नाही — एम.एस. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या 🏏 आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंना भोजन देण्याचा बहुमान मिळाला.
त्यांच्या दैनंदिन गरजा समजून घेणं — ही एक विलक्षण शिकवण होती.

आज मागे वळून पाहताना हसू येतं आणि मनापासून समाधानही वाटतं.
ज्याला कधी साधं गणित सोडवत येत नव्हतं, तो आज जगभरातील फाइव्ह स्टार किचन्समध्ये चव घडवतोय!
आणि ह्या सगळ्याची बीजे रोवली गेली होती ए.बी. गोरेगाव 🏫 मध्ये — त्या साध्या, पण जग बदलणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये.

प्रवास अजून संपलेला नाही... 🍽️
स्वप्नं अजून मोठी आहेत... ✨
आणि खात्री आहे — पुढची डिश अजूनही सर्वात गोड आणि खास असणार आहे! 👨‍🍳

– अभिजीत बागवे
(आजही मनाने बॅकबेंचर — पण हातात आता प्रोफेशनल चाकू आणि हृदयभर स्वप्नं!)
✨ My Journey: From A.B. Goregaon to Leading Culinary Excellence ✨

Not every success story begins with trophies and top marks.
Mine began at A.B. Goregaon 🏫, where I studied until 1998 — usually found sitting comfortably on the back benches, hoping the teachers wouldn’t notice me!
Academics and I had a complicated relationship — let’s just say, we weren’t exactly best friends 📚.

But life, as always, had its own plans.
I was lucky to have teachers like Pandharkame Ma'am, More Sir, Fadtare Sir, and many others — who believed in me even when I often doubted myself.
And friends like Rajendra More and Deven Bhole 🧑‍🤝‍🧑, who didn't just motivate me — they dragged me to the front benches, making sure I stayed focused.

Somehow, I completed my Commerce graduation 🎓.
At that time, many of my friends jumped directly into Hotel Management after their 12th grade. But I took the longer route — I finished my Commerce degree first, and only then chose to step into Hotel Management.
(At first, honestly, I had no idea what Hotel Management even meant! 😅)

Meanwhile, my elder brother had joined a Five Star Hotel 🏨 (previously known as Centaur Hotel), and watching him build a career in the hospitality world sparked a growing excitement in me.

There was also magic brewing at home —
My mother would regularly watch cooking shows like "Khana Khazana" 🍳, especially Chef Sanjeev Kapoor's recipes, and try out new dishes in our kitchen.
The aroma of freshly baked cakes 🍰, the excitement of new recipes, and the warmth of home-cooked love made our home feel like a mini restaurant.
Even today, I can still smell the cakes my mother lovingly baked for me and my brothers — that sweet fragrance is forever etched in my heart.

Slowly but surely, the decision became clear —
Hotel Management wasn't just a course; it was a calling.
And that's where my real journey began.

Today, I proudly lead the culinary operations at a luxury hotel in Nairobi Westlands ✈️ — one of the most prestigious addresses in the city!
From a shy boy hiding behind textbooks to a chef crafting flavors across continents — it’s been one unforgettable journey.

Along the way, I’ve had the honor to work with some truly iconic brands:

Novotel Mumbai International Airport 🏨 — where we ranked among the Top 50 Restaurants in India and won the Times Good Food Award 🏆.

W Goa — where we cooked for massive weddings, hosted electrifying Sunburn Festivals 🎶, and created experiences soaked in beachside magic.

Viking Cruises 🚢, Hyatt Regency Istanbul Ataköy 🇹🇷, and prestigious hotels like The Ritz-Carlton Bangalore, Park Hyatt Goa, and Renaissance Mumbai have all been part of my learning curve.

One of my most cherished experiences?
Catering daily 🥗🍛 — not just at events, but day in and day out — to cricket legends like M.S. Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma, Hardik Pandya, and many others 🏏.
Understanding their tastes, fueling their routines — it was a humbling and inspiring journey in itself.

Looking back today —
It’s a little funny, and a lot heartwarming, how a boy who couldn’t balance equations now balances flavors on global plates!
And all of it — truly all of it — started in the simple classrooms of A.B. Goregaokar 🏫, where dreaming big was the first lesson.

The journey is far from over... 🍽️
The dreams are getting bigger... ✨
And I know — the next dish is going to be even sweeter and even more special! 👨‍🍳

– Abhijeet Bagwe
(Still a proud backbencher — just with sharper knives and bigger dreams now!)

04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 39
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...

नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आजचा विद्यार्थी राहुल कांबळे... याची यशोगाथा त्याच्याच शब्दात.... राहुल, तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!!
नमस्कार, मी राहुल विलास कांबळे.

अ.भि.गोरेगावकर चा विद्यार्थी.........

माझी १०वी २०१५ मध्ये आपल्या शाळेतून पूर्ण झाली.
माझी १२वी सराफ कॉलेज मध्ये झाली वर्ष २०१७. आणि, मुंबई युनि्हर्सिटीमध्ये distance learning BCom पदवी पूर्ण केली वर्ष २०२१.

कॉलेजच्या काळात मी पार्ट टाइम नोकरी करत होतो, त्यामुळे दोन वेळा मला ड्रॉप लागला .पण मी हार मानली नाही,मुंबई युनि्हर्सिटीमध्ये distance learning मध्ये एडमीशन घेऊन BCom ही पदवी मिळवली.

त्यानंतर माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली- अजून ही सुरूवात चालूच आहे बर का!

खूप काही अडचणी आल्या काम करत अभ्यास करन खूप कठीण आहे,मी माझी जिद्द सोडली नाही आणि मेहनत केली आणि आज मी हिते पोहचलो. खूप खडतर प्रवास आहे. शाळेत असताना वाटायचं आपण कधी मोठे होणार कामाला जाणार पण आता अस वाटत की जे शाळेत ले दिवस होते ते सोन्या सारखे दिवस पुन्हा मिळू शकत नाहीत, ५वी ते १०वी मी आपल्या शाळेत होतो, सर्व शिक्षकाचा चांगला सपोर्ट होता, सगळे शिक्षक खूप मनमिळावू आणि फ्रेंडली होते.

१०वी झाल्या नंतर पण शाळा एक कोर्स राबवते, तो म्हणजे ब्रिज कोर्स. त्यात ते सर्वांना गाईड करतात कोणत्या फील्ड मध्ये गेलं पाहिजे कोणती शाखा निवडली पाहिजे, पुन्हा कॉलेज चे अर्ज भरताना देखील सगळ गोष्टी नीट सांगितल्या जातात, अगदी कॉलेज च ऍडमिशन होई पर्यंत शाळा आपल्याला मदत करते.

सगळच खूप भारी होत शाळेत.

कला ज्ञान आणि क्रीडा हे माझ्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे, ती शाळेची ओळख आहे.

१०वी ची कल्याणी व्हीलेज ची ट्रीप तर मी कधीच विसरणार नाही. शाळेने खूप काही गोष्टी दिल्या आहेत, शिकवल्या आहेत त्याचा आज दैनंदिन जीवनात उपयोग होत आहे.

१२ वी नंतर, FYbcom लां सलग दोन ड्रॉप लागल्यावर, माझ graduation होईल की नाही, ऍडमिशन करू की नको असे अनेक निगेटिव्ह विचार येत होते, पण तरी ही जिद्दी ने , हार न मानता ऍडमिशन करून , डिग्री पूर्ण केली.

१२ वी पासून मी जॉब ला सुरूवात केली होती. कॉलेज सोबत मी पार्ट टाइम, फुल टाइम जॉब करत होतो:-
बिफोर ग्रॅज्युएशन :-
१st जॉब - ऑफिस असिस्टंट - सरस्वती क्लासेस.
२nd जॉब - एक्झक्युटिव्ह - आयडिया कॉल सेंटर.
३rd जॉब - किचन बॉय - मेकडोनाल्ड
४th जॉब - कॅशियर अँड पॅकर - डी मार्ट
५th जॉब - ऑपरेशन एक्झक्युटिव्ह - टीसीएस ( कॉन्ट्रॅक्ट)
६th job - फ्रंट डेस्क कम अडमिन एक्झक्युटिव्ह - ईगल सिक्युरिटी
७th जॉब - डीस्पॅच बॉय (कॉन्ट्रॅक्ट) - इंडसिंड बँक

आफ्टर ग्रॅज्युएशन (बीकॉम पदवी मिळवल्या नंतर)
८th जॉब - अडमीन एक्झक्युटिव्ह (कॉन्ट्रॅक्ट) - इंडसिंड बँक
९th जॉब - असोसिएट मॅनेजर ट्रेडफायनान्स ऑपरेशन- इंडसिंड बँक

असा हा ग्राफ, आज इथवर येऊन पोहचलो आहे, आणि आज मी Indusind Bank मध्ये असोसिएट मॅनेजर आहे. अजून खूप पुढे जायचं आहे. आपल्या शाळेचं नाव, शिक्षकांचं नाव, आई वडिलाच नाव मोठं करायचं आहे. आता ही सुरूवात आहे.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....

या वरील प्रवासात, एक गोष्ट मात्र शिकलो,
शिक्षण आहे तर सर्व आहे.

डॉ बाबा साहेब आंबेडकर म्हणतात.. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.

हेच आपल्याला शाळेत शिकवले जाते.

आणि माझ्या शाळेने सर्वांना चांगले नेतृत्वाचे धडे दिले.
मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे.
आणि अशीच आपली शाळा, आपले शिक्षक, शाळेतील विद्यार्थी खूप पुढे जावेत, आपल्या शाळेची प्रगती व्हावी, हीच प्रार्थना.

धन्यवाद🙏
तुमचाच,
राहुल.................

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा  सदर क्रमांक 38माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम स्कूल के जिंदगी के साथ भी स...
04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 38
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...

नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आज चा विद्यार्थी guest admin officer विपुल आग्रे... याची यशोगाथा त्याच्याच शब्दात.... विपुल, तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!!नमस्कार मी विपुल आग्रे , अ. भि. गोरेगावकर शाळेतून २०१० साली १० वी उत्तीर्ण झालो, त्यांनतर bhavans कॉलेज अंधेरीत कॉमर्स साठी ऍडमिशन घेतले .तिथून १२ वी उत्तीर्ण झालो. पण १३ वीत एडमिशन घेतल्यावर वाटू लागल की कॉमर्स मधे मन लागत नाही .मग लार्सन अँड टुब्रो पवई येथे अप्रेंटिसशिप सुरू केली. वेल्डर म्हणून २ वर्ष अप्रेटिशिप करून टेक्निकल नॉलेज तर मिळाल, परीक्षा चांगल्या पर्सेंटेज ने पासही झालो. मग वेळ आली job शोधण्याची... अप्रेटिशिप च्या बेस वर लार्सन एंड टुब्रो मध्ये temporary basis वर जॉब लागला पण.. temporary period संपल्यावर पुनः जॉबचा शोध सुरु. मग जॉब लागला गोरेगाव मधेच. एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मधे.. तिथे सर्विस इंजीनियर म्हणून काम करताना भारतभर फिरून नामांकित स्टील प्रोडक्शन प्लांट्स मधे जाऊन तिथल्या मैनेजमेंट शी भेटण्याच्या सधी मिळाल्या. या काळात बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःची communication skills सुधारण्याची संधी मला मिळाली.२ वर्ष मुंबईमध्ये काम केल्यावर मग overseas जॉब करण्याचे मनात आले आणि रॉयल कॅरेबियन cruise chip वर रिपेअरमन पोज़िशन साठी apply केले almost वर्षगभराने मला रिप्लाय आला. इंटरव्ह्यू झाला. us C1D visa मिळाला. २०२० डिसेंबर मधे पहिल्यांदा शिपवर आलो. maintainance डिपार्टमेंट मधे लवकरच स्वतःमधली cammunication skills वापरून फ्रंट डेस्क वर guest services officer म्हणून apply केल. select ही झालो. नवीन journey सुरू झाली एक वर्ष काम केल्यावर promotion ची संधी मिळाली. प्रयत्न केला पहिल्याच इंटरव्ह्यू मधे पास झालो. आता guest admin officer ( काही कंपनीज मधे ship documentation officer) म्हणून काम करतो आहे, कोणत्याही पोर्ट वर शिप डॉक झाली की सर्वात आधी शिप बाहेर जाऊन local authorities समोर ship documets present करून शिप पूर्णपणे clear करण्याचं काम माझ असत. मोठी resposiblity आहे. पण नवीन नवीन ports वर नवीन authorities ना भेटून बरेच काही नवीन शिकण्याची संधी मिळते. तिथल्या लोकल्स कडून तिथली माहिती मिळते. प्रवास अजूनही सुरू आहे. मी म्हणेन ही फक्त माझ्यासाठी सुरुवात आहे .
धन्यवाद🙏

04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 37
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...

नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आजची विद्यार्थीनी रूपाली खांडेकर कवीश्वरची यशोगाथा तिच्याच शब्दात.... रूपाली, तुझ्या पुढच्या सांगीतिक प्रवासासाठी व सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
नमस्कार🙏 मी रूपाली खांडेकर कवीश्वर, फेसबुकच्या पोस्ट बघताना सहज पांढरकामे बाईंचे माजी विद्यार्थ्यांसाठीचे सदर वाचनात आले होते. बाईंनी माझ्या एका पोस्टला like केले होते ,ते पाहून मग बाईंशी संवाद झाला आणि त्यांनी मला माझ्या सांगितीक प्रवासाबद्दल लिहिण्याचे विचारले .बाई प्रथमतः मी तुमची ऋणी आहे की माझा स्वरभारित जीवनकाळ व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला दिलीत... पण या संगीताच बीज रोवलं ते शाळेने...खरंतर अ. भी. गोरेगावकर शाळेत प्रवेश केला त्या दिवसापासून शाळेचा संपूर्ण परिसर आणि अभ्यास या दोन्हींची ओढ मनाला लावणारा गुरुजन वर्ग,या सर्व बाई आणि सर जे आत्मीयतेच आदराच नातं जोडलं गेलं ते आजतागायात अव्यक्त राहिलं....गुरुदक्षिणा म्हणून माझी कला सादर करणे किंवा मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन शाळेच्या उपयोगी पडणे या दोन्ही संधी आजतागायत काही मिळाल्या नाहीत,पण आज बाईंशी फोनवर बोलले आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला,वाटलं माजी विद्यार्थ्यांच्या सदरामधून एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देणे हे अतिशय उत्तम कार्य साधलं जात आहे..तर आपण त्यात सहभागी झालंच पाहिजे!!
पाचवीमध्ये पणशीकर बाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. शांत, मृदू, सौम्य स्वभावाच्या बाई विद्यार्थ्यांना प्रिय होत्या.गणित छान शिकवलं आम्हाला त्यांनी. इंग्लिश च्या तुंगारे बाई, पातकर बाई दोघीनीही उत्तम इंग्लिश शिकवल. विज्ञान विषय छान करून घेतला तो पांढरकामे बाई, सुतार बाई यांनी. गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केल ते देवल बाईंनी.हिंदी विषयातही चांगले गुण मिळायचे त्याचे पूर्ण श्रेय आचार्य बाई आणि कुंटे बाईंना होते कारण हिंदी माझा अगदी कमी अभ्यास किंबहुना अभ्यास न करण्याचा विषय होता
आमच्या वर्गाला दोन वर्ष, 6 आणि 7 वित क्लास टीचर म्हणून लाभलेल्या दांडेकर बाईंचा मराठीचा तास म्हणजे शब्दांची पखरण..कवी किंवा लेखकाचे मनोगत त्या आमच्यापर्यंत तसेच्या तसें स्वभावनांतून पोहोचवत... बालकवींचा निर्झर असो किंवा औदुंबर,सावरकरांची बखर आणि नासी फडक्यांचा निबंध.. वाङ्मयातील कोणताही प्रकार अतिशय समरसतेने शिकवणाऱ्या आमच्या संपूर्ण वर्गाच्या अतिशय लाडक्या अशा दांडेकर बाई!!15 ऑगस्ट च्या समूह गानाची पूर्वतयारी असो किंवा माझे गाण्याची स्पर्धा असो... मग गाणं कोणतं, ते कसं गायचं.. सर्व मार्गदर्शन बाई करायच्या.. स्पर्धा झाल्यानंतर शाळेत मी बक्षीसाचे जाऊन सांगण्याआधी बाई माझे अभिनंदन करायला आतुर असायच्या!! सहलीमधून आमच्यात अगदी मैत्रिणींप्रमाणे मिसळून आम्हाला विनोदी चुटके, बस मधील गाणी अशी खास मेजवानी बाईनी दर सहलीत दिली. माझ्या गैरवर्तनाबद्दल हक्काने कान पकडणाऱ्या ,पण त्यामागील तळमळ अजूनही आठवणीत रहावी अशी..नंतर हळुवार फुंकर घालून चूक सुधारण्याची संधी ठेवणाऱ्या दांडेकर बाई!!आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावून जाऊन साश्रू नयनांनी आमच्या वर्गाला सस्नेह आशीर्वाद देणाऱ्या दांडेकर बाई!!
कल्पकला मंच,कुमार कला केंद्र इत्यादी आंतर शालेय स्पर्धांना आम्ही सर्व गायक बाईसोबत गेलो आणि दरवर्षी शाळेला कोणते ना कोणते बक्षीस मिळून दिले!
शालेय गायनाला शास्त्रीय संगीताची जोड देणारे भागवत सर! ऋषितुल्य व्यक्तिमत्व! संस्कृत नाटक लिहून बसवून ते कालिदास जयंतीला उत्तमरीत्या सादर केले गेले. उत्तम लेखक, दिग्दर्शक,गायक, संगीतकार, उत्तम वक्ता, वादक, आदर्श शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले भागवत सर!! सुभाषितमाला शिकावी तर ती सरांकडून! जसे मला सरांचे हे सर्व पैलू खूप जवळून अनुभवायला मिळाले,लाभ घेता आला , तसे माझ्या एखाद्या वाईट सवयीला खोडून काढण्याचे कार्यही सरांनी फार छान केले!!
गृहपाठ कधीही करायचा चुकूनही राहणार नाही असे हे दोघे कला आणि विद्यादायी गुरुमाऊली होते माझे!!
निलगिरीच्या टोप्यांचा मंद सुवास आज कधीही अनुभवला की आठवते अभीच्या मैदानावर सकाळी सहा चाळीस ते पावणेसात वाजता धावत मारलेली प्रभातफेरी! मनाचे श्लोक,रामरक्षा,भीमरूपी हे सर्व संस्कार शाळेने दिले.
यशाचा कैफ काय असतो ते अनुभवावर पण गर्वाची बाधा कधी होऊ देऊ नये याची समज लहान वयातच मिळाली. अपयशाचे दुःख कधीही टिकत नाही आणि यशाची शिखरं कायम नवी आव्हान देत राहतील याची सुखद जाणीव करून दिली ती शाळेने!भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, समूहगीत, वीरगीत आणि पोवाडाही गाण्याची संधी जिथे मिळाली ते मला घडवणारे विद्यामंदिर म्हणजे अभी गोरेगावकर इंग्लिश स्कूल!! ललित कला केंद्र (उत्तेजनार्थ ) , नंदादीप समिती (2 वेळा विजेती .. प्रथम आणि तृतीय क्रमांक ) , सावरकर प्रतिष्ठान वीरागितगायान (प्रथम क्रमांक ), स्वामी विवेकानंद समिती आंतरशालेय गीतगायन स्पर्धा ( प्रथम क्रमांक )या सर्व आंतरशालेय वैयक्तिक गीतगायन स्पर्धांमधे
पारितोषिके मिळाली
इयत्ता पाचवी मध्ये बर्वे बाईनी शिकवलेला राग भूप मधील स्वलिखित तराना आज माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना शाळेच्या सुरम्य दिवसांची आठवण अनेकदा जागी होते! वंदे मातरमच्या वेगवेगळ्या चाली शिकले,गायले,आजही गाते,पण बाईंची भैरवीतील 'वंदे मातरम' ची चाल आजही सदा स्मरणी राहिली आहे!बाईंच्या घरी जाऊन त्यांच्याकडून रशियन गाणं शिकण्याची संधी मिळाली होती. गाण्यातील कोणताही प्रकार असो उत्तम सादरीकरणासाठी कशी मेहनत घ्यावी याच बाळकडू शाळेने दिल.
मराठी वाङ्मयाशी आपलं नातं जोडून देणाऱ्या बाई म्हणजे असनिकर बाई! 'मोगरा फुलला' मधील पाठांतराचा उतारा ऐकल्यावर 'किती नाटकी बोललीस 'अशी खरडपट्टी काढणाऱ्या आणि दहावीला मराठीत scoring व्हाव म्हणून शाळेव्यतिरिक्त स्वतः च्या घरी बोलावून शिकवणाऱ्या असनिकर बाई! पी.टीच्या वेळी नियमांना कडक आणि वर्गात तितक्याच प्रेमळ असलेल्या बाईंची आज पण अनेकदा आठवण येते.
मैदानावर फुटलेल्या कोपराच्या जखमेसाठी औषध देणारे सखाराम काका, कांबळे काका. आणि अतिसर्दीने बेजार झाल्याने किंचित ताप वाटतोय म्हणून सक्तीने झोपायला लावणाऱ्या, घरी पाठवणाऱ्या कावले बाई.. या सर्वांमुळे शालेय जीवनात हास्यविनोद टिकून राहिले.
शाळेनंतर रूपरेल महाविद्यालय आणि त्यानंतर विद्यावर्धिनी मधून बी. इ. इंस्ट्रुमेंटेशन केलं
प्रयोगशाळा, अभ्यास, लांबचा प्रवास, गर्दीची धकाधक, वाढता अभ्यास या सगळ्यामुळे माझ्या गाण्यावर मी स्वतः त्यावेळापुरती स्थगिती आणली होती आणि नोकरीला लागल्यावर पुन्हा शास्त्रीय संगीत शिकणं सुरू केलं. लग्न बाळंतपणात काही वर्ष सरली आणि आम्ही पुण्यात राहू लागलो.माझे शास्त्रीय गाण्याचे शिक्षण पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले पण आता पुण्यात सासरी राहून माझ्या लहानग्या मुलाला सांभाळत शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणे चालू झाले होते.मुंबईत ट्रेन किंवा बस ने प्रवास करण्याची सवय होती,आता मात्र दुचाकी स्वतःच्या भरवशावर चालवणे आले..माहेरी आई आणि आजी दोघींनी आम्हा मुलींना दुधावरच्या सायेसारख जपलेल.. कोठेही बाहेर कामासाठी किंवा शिक्षणासाठी खूप वेळ जावे लागणार असेल की आदल्या दिवशी घरी सांगितले की दिवसभराचे खाणे डब्यात भरून निघताना डबा आई हातात द्यायची आता मात्र कंडीशन opposite होत्या. आपल्याबरोबर नवऱ्याचा डबा, सासू-सासऱ्यांचे जेवण आणि माझ्या छोट्या बाळाची सोय लावून मग निघायचे.. पण त्यानंतर होणारा जो अलभ्य लाभ संगीताचा..त्याच्या विचाराने घर काम करताना नेहमी आणखी आणखी करावसं वाटायचं.. Pure क्लासिकल कोचिंग काय असतं आणि माझ्या आधीच्या गाण्यात मी काय बदल केले...ते समजू लागलं होतं.नवीन नवीन राग रचना शिकताना मिळणारा आनंद घरी आपोआप रीयाजाचे तास वाढवत होता. मध्यमा प्रथम आणि मध्यम पूर्ण दोन्ही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.शास्त्रीय संगीत सुरू झाल होत खरं परंतु संसारात मात्र नवीन नवीन आव्हाने समोर उभी ठाकत होती. त्या आव्हानांवर मात करून चालू असलेल माझ संगीत शिक्षण, हे माझं गाणं मला एक मेडिटेशनच वाटायचं त्यावेळी.. आणि त्यामुळे जशी मी माझ्या मुलाशी एकरूप होऊन खेळायचे तसेच सुरांशी एकरूपता, तल्लीनता नकळत साकार होऊ लागली. मध्यमा पूर्ण गायन परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली आणि विशारदचा अभ्यास सुरू केला. आता रियाज किती करेन तो कमीच वाटायचचा आणि मी आणखी आणखी सराव करीत राहायचे. क्लास मधील माझ्या गुरु सौ. मोहिनी ताई या एक आदर्श आणि डेडिकेटेड गुरु मला लाभल्या. तिथे जेवढी माझी शिकवणी होईल, त्याप्रमाणे घरी येऊन त्याचा नित्य सराव करणे, तो रेकॉर्ड करणे, ऐकणे, लिहून काढणे, स्वर घोटणे, ताना पाठांतर इत्यादी इत्यादी सर्व काही वेळच्यावेळी करण्याकडे माझा कटाक्ष ठेवला विशारद प्रथम ची परीक्षा ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर वर्षभरातच विशारद पुर्णची ही परीक्षा दिली. त्या काळात मी टीव्हीवरील गायक वर्ग आणि कार्यक्रम कधीच सोडले नाहीत.छोट्या अद्वैतलाही त्यामुळे थोडे फार गाण्यांचे संस्कार मिळाले.
मे 2017 मध्ये संगीत विशारद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि तेव्हापासून मी पुण्यातील माझ्या निवासस्थानी शास्त्रीय गायनाचे वर्ग घेते आहे.अनेक कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी मिळाली मिळते आहे.उत्तम श्रोते रसिकांची दाद, हेच आम्हा गायकांच खर वैभव असत... तसेच छान मित्र-मैत्रिणी लाभले .प्रोत्साहन मिळत राहिले.माझे लहानपणापासूनचे शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न माझ्या कलेमुळे पूर्ण झाले. अखील भारतीय गांधर्व मंडळातर्फे गायनाच्या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती झाली. संगीताची अफाट व्याप्ती आणि त्यापुढील आपले क्षुल्लक ज्ञान याची सत्यता जशी अंगवळणी झाली, तशीच गुरूंचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व क्षणाक्षणाला काही ना काही, या ना त्या रूपाने माझ्यातील विद्यार्थीपण जागृत ठेवत राहिले. मी शिक्षिका झाले तरी कायम मी स्वतः एक विद्यार्थी आहे..
शाळेत असताना दरवर्षी मराठी निबंध स्पर्धेचा प्रथम क्रमांक, वाचनाची भयानक आवड आणि गायन वृंद प्रमुख या माझ्या छान छान उद्योगामुळे मी दहावीनंतर विज्ञान विषयाला हात घालेन असे माझ्या आई-वडिलांना अजिबात वाटले नव्हते. पण त्यांनी कधीही असे अतिवक्तव्य माझ्यासमोर केले नाही.बी. ई. झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर 11, 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना Maths आणि physics हें दोन्ही विषय.सीईटी क्रॅश कोर्स मध्ये मुंबईत शिकवायला मिळाले. गोखलेबाई कॉलेज मध्ये अल्पकाल lecturer म्हणून कार्य केले.पुण्यातील गेली वीस वर्षे मात्र बहुतांश कलासक्त राहिले.
अलीकडे दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रसेविका समितीची सेविका म्हणून देशसेवा करताना मिळणारा निरामय आनंद, त्याचे बाळकडू लहानपणी मिळाले होते. समितीच्या निमित्ताने नवीन ओळखी झाल्या. मैत्रिणी आणि विद्यार्थिनी ह्या या दोन्हीच्या संख्येमध्ये भर पडली.
मानवी जीवन नेहमी ऊन सावली, सुखदुःख,चढ उतार यांनी भरलेले असते. थोडे दुःख, अपयशही माझ्या वाट्याला आल्याशिवाय कसे राहील! नवीन विभागात स्थायिक होताना अनेक समस्यांना तोंड देता देता आधीचा काटकपणा जाऊन थायरॉईडच्या दुखण्याने जोर धरला. ती. सौ. आई, आजी ती सासरेबुवा यांच्या पाठोपाठ गन्तव्यामुळे खचलेले मन, त्यातच माझ्या वडिलांचे अकस्मिक निधन मनाला चटका देणारे होते.
प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांच्या जाणीवामुळे या सर्वांतून सावरून 'अलंकार प्रथमच्या' परीक्षेसाठी क्लास जॉईन केला. अभ्यास आधीपासून तसा चालू झाला होता, क्लासमुळे योग्य मार्गदर्शन मिळेल अशा हेतूने स्वरोपासना अकॅडमी जॉईन केली. परीक्षेचे थिअरी पेपर वन आणि पेपर टू टोटल 200 मार्क्स.यात 72 टक्के गुण मिळाले . प्रॅक्टिकल एक्झाम दोन तासांची 300 मार्कांची होती पण त्यात 147 मार्क मिळाले म्हणजे अनुत्तीर्ण!! हा धक्का खूपच खोल आणि क्लेशदायक होता.त्यातून सावरायला खूप वेळ लागेल. परीक्षा चांगली होऊनही गुण न मिळणे असा दिलाय रिझल्ट. तो आल्यावर सर्व प्लस मायनस मनात चेक करून पाहिले. कमतरता उणीवा कुठल्या मोजल्या गेल्या आणि आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह आहे पण माझा त्याग, माझी मेहनत फळाला आली नाही याची बोच कायम राहील. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात.त्याप्रमाणे स्वतःला समजावलं.माझ्यासारखे बरेच विद्यार्थी या प्रसंगाला धीराने तोंड देतात असं पाहून स्वतःला सावरले आणि रियाज पूर्वीप्रमाणे रोज नित्यनेमाने करते आहे.
माझ्या class मधील विद्यार्थ्यांची परीक्षांची तयारी करून घेणे, त्यांचा नित्य सराव, रागाच्या विस्तृत सादरीकरणासाठी आवश्यक तयारी आणि माझा स्वतःचा रियाज. घर आणि संसार सांभाळून जमेल तशी कलेची साधना चालू राहील. कोणालाही गीतगायन विषयात काही मार्गदर्शन पाहिजे असल्यास मी त्यांची नक्की योग्य प्रकारे तयारी करून घेईन.माझ्या class चे online आणि offline अशा दोन्ही mode मधून मी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
शाळेच्या सर्व गुरुजन आणि कर्मचारी वर्गाची मी सदैव ऋणी आहे. 🌺🙏

- रुपाली खांडेकर कवीश्वर
- (passed out ssc 1992 बॅच )

04/05/2025

माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 36
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...
नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आजची विद्यार्थीनी दीप्ती गोडसे कुलकर्णीची यशोगाथा तिच्याच शब्दात.... दीप्ती तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
नमस्कार...मी दीप्ती गोडसे कुलकर्णी 10 वी क 1995
Pandharkame बाईंच्या 'स्कूल की जिंदगी के साथ भी स्कूल की जिंदगी के बाद भी' या सदरासाठी लिहायचा प्रयत्न करत आहे.
शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण कायम म्हणतो की शाळा आपला पाया घडवते. ABGES ni माझ्या बाबतीत नुसता पायाच नाही रचला तर मला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची ऊर्जा दिली. माझा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर मी BSc Botany MSc Plant Biotechnology करून पाटकर महाविद्यालयात लेक्चर म्हणुन बॉटनी Department la रुजू झाले. सिक्कीम मणिपाल university madhun Environmental science मध्ये 1 वर्षाच correspondence MSc केल .
लग्नानंतर नवर्‍याच्या नोकरी निमित्ताने परदेशात जावे लागल्याने मला पाटकर महाविद्यालयातील नोकरी सोडावी लागली. Taiwan, Thailand, US ,UK असा प्रवास करत 9 वर्षानी पुण्यात पोचले. पुढे काय हा प्रश्न होता. शिक्षण क्षेत्र सोडायचं नाही हे पक्कं होतं. Degree कॉलेज la लेक्चर पदासाठी che नियम बदलले होते. तब्बल 12 वर्षानी परत पुस्तक हातात घेतले अणि सावित्री बाई फुले विद्यापीठातून BEd केले. Bharati विद्यापीठ च्या CBSC branch मध्ये highschool teacher म्हणुन रुजू झाले. त्या नंतर एका नवीन CBSE शाळेत vice प्रिन्सिपल म्हणुन काम केले. नवर्‍याच्या सतत परदेश वार्‍या सुरू झाल्याने एकहाती मुलाला सांभाळणे आले .सगळ्या गोष्टींचा विचार करून नोकरी न करता क्लास घ्यावेत असा विचार केला अणि Erudite Classes या नावाने पुण्यात ग्रुप क्लास chi सुरवात केली.
COVID मध्ये हे क्लास पूर्ण पणे online केले. नवर्‍याची नोकरी निमित्ताने होणारी ओढाताण अणि COVID मुळे जे अनुभव आले त्यामुळे पुनः एकदा परदेशात नवर्‍यासोबत राहण्याचा निर्णय घेतला अणि 4 वर्षा पुर्वी Qatar la आले. ऑनलाईन क्लास असल्याने आता प्रश्न नाही. CBSE,ICSE,IGCSE या भारतातील मुलांसोबत सोबत कतार अणि UK मधल्या मुलांसाठी क्लास चालू केले.
या सगळ्यात अतिशय महत्त्वच म्हणजे ABGES च्या शिक्षकांनी केलेले संस्कार. शास्त्र कसं शिकवाव हे Pandharkame बाई, सुतार बाई, करंजकर सर अशा उत्तम शिक्षकांकडून शिकले तर गणित कसं शिकवाव हे देवल बाई, कुलकर्णी सर यांच्या कडून शिकले.
चित्रकलेची आवड असल्याने एलिमेंटरी intermediate परीक्षा दिल्या होत्या. तेव्हा देसाई सरांनी शिकवलेली भूमिती इतकी पक्की झाली की पुण्यात शाळेत शिकवत असताना मुलांना एलिमेंटरी intermediate च्या परीक्षेसाठी भूमिती ही शिकवली.
मला जे शिक्षण मिळाल ते पुढच्या पिढीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शिक्षण पद्धतीत कितीही फरक पडला तरी पाया भक्कम असला तर डोलारा सहज पेलता येतो.
एक शिक्षक काय करतो तर तो डॉक्टर engineer आर्किटेक्ट तर घडवतो अणि त्या सोबत पुढच्या पिढीचा शिक्षक ही घडवतो.
माझ्या या छोट्याश्या वाटचालीसाठी मोलाचं योगदान दिल्याबद्दल मी ABGES च्या सर्व शिक्षकांची आजन्म ऋणी आहे.
धन्यवाद 🙏🙏

Address

Aarey Road, Goregaon West, Mumbai
Maharashtra
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A.B.Goregaonkar English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to A.B.Goregaonkar English School:

Shortcuts

Share

Category