EKACH WADA BABAN DADA

EKACH WADA BABAN DADA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from EKACH WADA BABAN DADA, Education, Madha.

19/11/2024

निष्ठेला आणि प्रामाणिक कामाला न्याय मिळालाच पाहिजे.
शेतकऱ्याच्या उसाला स्पर्धात्मक भाव मिळालाच पाहिजे.

19/11/2024
*माढा तालुक्याचे भाग्यविधाते सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ,हरित क्रांती ,धवलक्रांती, औद्योगिक क्रांतीचे जनक, राजकारण ...
01/09/2022

*माढा तालुक्याचे भाग्यविधाते सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ,हरित क्रांती ,धवलक्रांती, औद्योगिक क्रांतीचे जनक, राजकारण ,समाजकारण ,अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य,शिक्षण,शेती ,उद्योग,व्यवसाय,सांस्कृतिक, धार्मिक-अध्यात्मिक, क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती करणारे आमचे दैवत ,तालुक्याचे भाग्यविधाते आमदार ,आदरणीय श्री बबन (दादा )शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*
*दादांची राजकीय सुरुवात गावचे सरपंच पदापासून सुरू होऊन ,पंचायत समिती सभापती ,जिल्हा बँकेचे संचालक ,माढ्याचे सन 1995 ते आज पर्यंत आमदार ,जिल्हा दूध संघाचे चेअरमन, विठठलराव शिंदे सह .सा. का .लि. चे संस्थापक चेअरमन, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया चे चेअरमन, पंचायत राज समितीचे अध्यक्ष, अशा या राज्यातील विविध पदावर ती काम करून राज्यात नावलौकिक मिळवणारे देशात कारखाना ऊस गळीतामध्ये प्रथम क्रंमाक मिळवणारे एकमेव आमदार म्हणून बबन दादा शिंदे यांचा राज्यात नावलौकिक आहे .आमदार पदाची धुरा हातात घेतल्या पासून उजाड माळरान असलेला माढा तालुक्यामध्ये हरितक्रांती करून तालुक्याचं नंदनवन केलेलं आहे. माढा तालुक्यांमध्ये भीमा सीना जोड कालवा, सीना माढा उपसा, जलसिंचन योजना (बोगदा ),यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कॅनॉल च्या माध्यमातून संपूर्ण माढा तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे .संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबवून उसाची शेती भरपूर प्रमाणात झाल्याने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली सुरुवातीला अडीच हजार टन क्षमता असलेला कारखाना आज 15 ते 16 हजार मेट्रिक टन गाळप करत आहे. कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना चांगला दर देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस दुष्काळी परिस्थिती चा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवाच्या मुला मुलीचे विवाहाचे नियोजन करून सामुदायिक विवाह सोहळा प्रतिवर्षी कारखान्यावरती राबवून अनेक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या माध्यमातून हजारो लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन करून लोकांना दृष्टी दिली त्यांच्या प्रभावी कर्तुत्वामधून तालुक्याचा विकास पाहायचा झाला तर भीमा सीना जोड कालवा, सीना माढा उपसा जलसिंचन योजना ,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, डिस्टलरी प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प ,सहवीज निर्मिती प्रकल्प ,रिफायनरी शुगर प्रकल्प ,आयटीआय कॉलेज कुर्डूवाडी ,टेंभुर्णी माढा मोडनिंब नळ पाणी पुरवठा योजना, व्होळे ३२ गाव पाणीपुरवठा योजना, कव्हे व १५ गावे नळपाणी पुरवठा योजना ,भीमा व सीना नदीवरील बंधारे, टेंभुर्णी दूध प्रकल्प, एम आय डी सी टेंभुर्णी, जनावरांसाठी छावण्या ,टेंभुर्णी येथे कला महाविद्यालय ,रोहयोतून उपसा सिंचन योजना ,कालवा खोदाई ,विठ्ठल बजार, माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड माढा ,वाहतूक संस्था, एकात्मिक बाल विकास प्रकल्प माढा ,तालुका फळ उत्पादक संघ ,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 शाखा ,कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना ,नवीन वीज केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र माढा, ग्रामीण रुग्णालय, आमदार फंडातून गावोगावी सभामंडप ,शाळा ,रस्ते ,घरकुले, विहिरी ,हातपंप, शेतीआवजारे ,गावोगावी दूध संस्था ,विकास सेवा सहकारी संस्था ,पतसंस्था, जलसंधारण मोहिमेअंतर्गत पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, नाला बिल्डिंग ,शेततळे ,गावजोड रस्ते ,हायमास्ट लाईट, इत्यादी कामे प्रभावीपणे राबवून तालुक्यातील सर्व जनतेच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणारे विकास रत्न आमदार शेतकऱ्याचा जाणता राजा कर्मयोगी म्हणून बबन दादांकडे पाहिलं जातं. काळाच्या ओघा मध्ये अनेक नेत्यांची नावं पुसली जातात परंतु जो परिस्थितीचा निर्माता आहे परिस्थितीचा शिल्पकार आहे अशां नेत्यांची नावे पुसली जात नाहीत सर्व सत्ताकेंद्र असून ज्यांना गर्व नाही अशी माणसे त्यांच्या मोठेपणां मुळे शोभून दिसतात खरं पाहिलं तर लोक उतार वयामध्ये राजकारणा पासून दूर होत स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतात पण स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता थेट शेतकऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेत तरुणाला लाजवेल असं उमदं नेतृत्व या तालुक्यात ज्यांनी केलं विकासाची गंगा ज्यांनी या तालुक्यातआणली यासाठी ते स्वतः उन्हात उभे राहिले आणि तालुक्यातील लोकांना सुखाची सावली दिली खरंच दादा आपले या तालुक्यावर अनंत उपकार आहेत कधीही न विसरता येण्यासारखे आणि शेवटी आमदार बबनदादा बद्दल म्हणावेसे वाटते ।। सुकून गेलेल्या जमिनीवरती ,तुम्ही नभ होऊनी बरसलात ,आणि विजे सारखे कडाडलात। तेव्हा इथली सृष्टी जागी झाली। हरितक्रांती चा नवोदय झाला। सर्व क्षेत्रात महाप्रताप झाला । स्वावलंबनाची दिशा सापडली। समृद्धीच्या कक्षा रुंदावल्या। अन दादा तुमचा जयजयकार झाला ।हरित क्रांतीचे प्रणेते महामानव म्हणून ।।आशा या जाणत्या राजास मानाचा मुजरा. सरपंचपदापासून ते आमदार की पर्यंत निमगाव टेंभुर्णी ते मुंबई दिल्ली पर्यंत जी झेप घेतली ते पाहून कुणालाही आश्चर्य वाटते खरेतर बबन दादा ची झेप महाराष्ट्रातील राजकीय नेते आमदार खासदार यांना खरंच प्रेरणादायी आहे .बबन दादांच्या या झेप मध्ये घेण्यासारखं पुष्कळ आहे जे झेप घेतील ते पुढे जातील बबन दादा ची ही झेप माढा तालुक्याचे भूषण असून महाराष्ट्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तीस-पस्तीस वर्षातील राजकारणामध्ये समस्त जीवन लोककल्याणासाठी अर्पित करणारा सहकार ,शिक्षण, समाजकारण, राजकारण,अर्थकारण या सर्व क्षेत्रात"—''माणूस"— हा घटक माणुन त्यांच्या विकासासाठी चौफेर काम करणारा कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन आनंददायी आरोग्यदायी उदंड जीवनासोबत समाज माध्यमातील आपली कार्य तत्परता अधिकाधिक उंच भरारी घेईल याचसाठी पांडुरंग परमात्मा कडे प्रार्थना करतो परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य निरोगी आरोग्य देवो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत एवढीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*
🙏धन्यवाद 🙏

07/10/2021

2021

परवा झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला म्हणणार्‍यांसाठी ही आकडेवारी 👇
अगोदर आज
भाजप- 29 23
शिवसेना- 09 12
राष्ट्रवादी- 16 17
काँग्रेस- 13 17
इतर- 18 16
#महाविकासआघाडी
🏹⏰✋🏻
🚩

उजनीचे आवर्तन लवकरच
01/08/2021

उजनीचे आवर्तन लवकरच

उजनी 43.46%
29/07/2021

उजनी 43.46%

उजनी 33%
26/07/2021

उजनी 33%

14/07/2021

Address

Madha
413211

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when EKACH WADA BABAN DADA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category