Sri Sri Ravishankar Vidya Mandir, Latur

Sri Sri Ravishankar Vidya Mandir, Latur It is only one School..where the child get stress free education & enjoy with mind magical activities.

13/05/2026

जय गुरुदेव!
आज 13 मे 2026 वार बुधवार, परमपूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर गुरुदेव यांचा जन्मदिवस शाळेत उत्साहात पार पडला..
या प्रसंगाचे काही क्षणचित्रे..

13/05/2026

|| जय गुरुदेव || 🌸
गुरुदेवांचे जीवन हे शांतता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे प्रेरणास्थान आहे. ✨
त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त श्री श्री रविशंकर विद्यामंदिर मध्ये पूजा, प्रार्थना, भजन आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेत हा दिवस आनंद, भक्ती आणि कृतज्ञतेने साजरा केला.
#जयगुरुदेव

शाळेच्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात आईच्या प्रेम, काळजी आणि पाठिंब्याने होते. ❤️पहिल्या पावलापासून प्रत्येक शिकण्याच्या ...
10/05/2026

शाळेच्या प्रत्येक प्रवासाची सुरुवात आईच्या प्रेम, काळजी आणि पाठिंब्याने होते. ❤️
पहिल्या पावलापासून प्रत्येक शिकण्याच्या टप्प्यावर आईच मुलांची पहिली मार्गदर्शक असते. SSR कडून मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! 🥳👏​श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर​आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, नुकत्याच जाह...
08/05/2026

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! 🥳👏
​श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूर
​आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत (१० वी) परीक्षेच्या निकालात आपल्या शाळेने १००% निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम राखली आहे! 🏆🎉
सौम्य सचिन बडवे 99.80% प्रथम क्रमांक मधुरा विजयकुमार शिनगारे 99.40% द्वितीय क्रमांक सिद्धी चंदन कुलकर्णी 98% तृतीय क्रमांक प्राप्त केला. 100 ते 90% 52 विद्यार्थी, 89 ते 80% 33 विद्यार्थी, 79 ते 70% 14 विद्यार्थी, 69 ते 60 2 विद्यार्थी असे घवघवीत यश संपादन केले आहे.

​शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन!
​विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 💐📚

रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त विचार, सर्जनशीलता आणि जागरूकतेने शिकण्याची प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या शिक्षण तत्त्वांना अभ...
08/05/2026

रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त विचार, सर्जनशीलता आणि जागरूकतेने शिकण्याची प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या शिक्षण तत्त्वांना अभिवादन.
कारण खरे शिक्षण हे केवळ पाठांतरापेक्षा खूप मोठे असते.✨

जय गुरुदेव! आज 1 मे 2026 "महाराष्ट्र दिन" आणि "जागतिक कामगार दिन" सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. श्री श्री रविशंकर व...
01/05/2026

जय गुरुदेव!
आज 1 मे 2026 "महाराष्ट्र दिन" आणि "जागतिक कामगार दिन" सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.
श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, लातूर येथे "महाराष्ट्र दिन" आणि "कामगार दिन" उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक सदस्य मा. श्री. पत्रावळे सर लाभले होते, त्याचबरोबर या कार्यक्रमास शाळेचे संचालक सदस्य श्री. अरुण जोशी सर, मुख्याध्यापिका सौ. सोनाली कुलकर्णी मॅडम (मराठी माध्यम), मुख्याध्यापिका सौ. विनया मराठे मॅडम (इंग्रजी माध्यम),सौ. प्रमिला राऊळ मॅडम (मुख्याध्यापिका,पूर्व प्राथमिक विभाग) उपमुख्याध्यापिका सौ.सुलभा जोशी मॅडम व सौ.विशाखा पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्याचबरोबर या कार्यक्रमास सर्व गुरुजन व कार्यालयीन सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा 66 वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. माननीय श्री पत्रावळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायले गेले. यानंतर महाराष्ट्र दिनाची माहिती ही सर्वांना सांगण्यात आली, याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना मिळाले. वंदे मातरम घेऊन आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक यशामागील मेहनत आणि समर्पण यांचे महत्त्व ओळखूया. समाज घडवणाऱ्या प्रत्येक हाताचा...
01/05/2026

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक यशामागील मेहनत आणि समर्पण यांचे महत्त्व ओळखूया. समाज घडवणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान करूया.

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. भगवान बुद्धांच्या शिकवणीमुळे जीवनात शांतता, संयम आणि स्पष्टता येवो.
01/05/2026

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. भगवान बुद्धांच्या शिकवणीमुळे जीवनात शांतता, संयम आणि स्पष्टता येवो.

जय महाराष्ट्र! परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेल्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा. महाराष्ट्र दिनाच्य...
01/05/2026

जय महाराष्ट्र! परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेल्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा. महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
#महाराष्ट्रदिन

23/04/2026

जय गुरूदेव.. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सादर केलेली एक सुंदर कविता.

Address

SSRVM-Latur
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri Sri Ravishankar Vidya Mandir, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sri Sri Ravishankar Vidya Mandir, Latur:

Shortcuts

Share

Category