Shri Marwadi Rajasthan Shikshan Sanstha, Latur

Shri Marwadi Rajasthan Shikshan Sanstha, Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Marwadi Rajasthan Shikshan Sanstha, Latur, Education, Latur.

02/08/2025

वक्ता दशसहस्त्रेषु !

श्री मारवाडी राजस्थान विद्यालयातील आदिती मुस्कावाड या मुलीचे अमोघ वक्तृत्व , आपण वेळ काढून जरूर ऐकावे !

--------------------------------------------------------------------

डॉ. अण्णा भाऊ साठे : जीवन, साहित्य आणि विचार या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आदिती मुस्कावाड सर्वप्रथम !

समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र , जिल्हा शाखा, लातूर यांच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेपूर्वी १ ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेत वरील विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास राजर्षी शाहू महाविद्यालयातील 'सर्वोत्कृष्ट वक्ता' स्पर्धेत संधी देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट वक्ता निवडण्यात आला. या ठिकाणी एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये आपल्या विद्यालयाची कुमारी आदिती मुस्कावाड ही तिची 'सर्वोत्कृष्ट वक्ता' म्हणून निवड झाली. रोख रक्कम १००१ रुपये, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. आपल्या विद्यालयातील सहशिक्षक श्री खंडू बनसोडे यांनी तिला मार्गदर्शन केले.

fans Collector & District Magistrate, Latur Shailesh Lahoti

11/08/2024

संस्कृत श्लोक पठण : राजविद्या प्रथम !

दि. ११/०८/२०२४ , रविवार
वेद प्रतिष्ठान सार्वजनिक ग्रंथालय,लातूर येथे संस्कृत स्तोत्र आणि भगवद्गीतेतील अध्याय पठण स्पर्धा संपन्न झाली. यात श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाने सहभाग नोंदवला होता .

वैयक्तिक गीता अध्याय पठणात इयत्ता ६ वी (ब) वर्गातील चि. पार्थ राजेश जोशी याने प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृत शिक्षक श्री राजेश जोशी आणि चि.पार्थ जोशी यांचे स्पर्धेतील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !

👇 कांहीं क्षणचित्रे

Collector & District Magistrate, Latur Raja Narayanlal Lahoti English School Shailesh Lahoti

27/05/2024

HERITAGE OF ACADEMIC EXCELLENCE

Join us in Class XI and be the part of Strong Heritage of Academic Excellence in +2 stage.

📌 Intensive Focus on Basics

📌 Best Subject Experts

📌 Innovative Approach

Admissions are closing shortly.

To enroll WhatsApp JOIN RNLES on 077962 52529 or

https://forms.gle/VPEK3emgphh8e6hX7

Collector & District Magistrate, Latur Ministry of Education Fit India Movement Ministry of Youth Affairs and Sports, Government of India Maharashtra DGIPR Press Trust of India - PTI

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश !90% च्या पुढे गुण घेणारे  तब्बल 128 विद्यार्थी !आज ...
27/05/2024

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश !

90% च्या पुढे गुण घेणारे तब्बल 128 विद्यार्थी !

आज जाहीर झालेल्या मार्च 2024 परीक्षेतील निकालासह सीबीएसई च्या निकालामध्ये श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांनी खूप मोठी बाजी मारली .

संस्थेच्या, Raja Narayanlal Lahoti English School आणि श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 100% लागला असून राजा नारायणलाल लाहोटी स्कूलचे 29 तर बंकटलाल लाहोटी स्कुलचे 28 विद्यार्थी 90% च्या पुढे गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत .कु भावना गोजमगुंडे (98%) आणि चि.काबरा अथर्व , चि.अग्रवाल तन्मय (97%) हे विद्यार्थी शाळेतून प्रथम आले आहेत.

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाचा निकाल 95.58 % लागला असून 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 31 विद्यार्थी आहेत. कु.बेताळे शुभदा आणि कु. वाकडे साक्षी या दोन विद्यार्थीनी 98.60 % गुण घेवून पहिल्या आल्या .

श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचा निकाल 99.06% लागला असून या विद्यालयाच्या 40 विद्यार्थिनी 90% च्या पुढे गुण घेणाऱ्या ठरल्या. कू गायत्री रणदिवे ही विद्यार्थिनी 100% गुण घेवून प्रथम आली आहे.

संस्थेच्या सर्व शाळांनी दहावीच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली असून तब्बल 128 विद्यार्थी 90% च्या पुढे गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे , संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष, श्री लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष श्री शैलेश लाहोटी, सचिव श्री आशिष बाजपाई, श्री राजेंद्रकुमार मालपाणी, श्री दिनेश इन्नाणी, श्री शरदकुमार नावंदर, श्री ईश्वर डागा, श्री लक्ष्मीकांत कर्वा, श्री आनंद लाहोटी, श्री डॉ. अनिल राठी, सौ कुमुदिनी भार्गव, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

Collector & District Magistrate, Latur Shri. Godavaridevi lahoti kanya pathshala , latur . Ministry of Education, Youth and Sport, of Cambodia

15/06/2023
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश :  90% पेक्षा अधिक  गुण घेणारे 111 विद्यार्थी !श्री मारवा...
02/06/2023

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश : 90% पेक्षा अधिक गुण घेणारे 111 विद्यार्थी !

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था , लातूर संचालित विविध मध्यामिक शाळांनी इयत्ता 10 वी च्या परीक्षेत मोठे यश प्राप्त केले असून संस्थेचा एकूण निकाल 98.28% लागला आहे. श्री राजा नारायणलाल लाहोटी CBSE स्कुल आणि श्री बंकटलाल लाहोटी CBSE स्कूलचा निकाल 100% आहे . तर श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाचा निकाल 96.20% आणि श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचा निकाल 98.87% आहे. सर्व शाळांचे एकूण 111 विद्यार्थी 90% पेक्षा अधिक गुण घेणारे असून यात मुलींची संख्या सर्वाधिक म्हणजे 61आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .याप्रसंगी संस्था विश्वस्त श्री लक्ष्मीरमण लाहोटी , अध्यक्ष श्री शैलेश लाहोटी , उपाध्यक्ष श्री राजेंद्रकुमार मालपाणी , सचिव श्री आशिष बाजपाई ,श्री शरदकुमार नावंदर , श्री लक्ष्मीकांत कर्वा , श्री सूर्यप्रकाश धूत ,श्री कमलकिशोर अग्रवाल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक उपस्थित होते.

छायाचित्र -श्याम भट्टड, लातूर Shyam Bhattad

Raja Narayanlal Lahoti English School Shailesh Lahoti Ministry of Education, Youth and Sport, of Cambodia Badminton Association of India Prithviraj B. P. - IAS, Collector & District Magistrate, Latur

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Marwadi Rajasthan Shikshan Sanstha, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category