Aastha Skill India

Aastha Skill India AASTHA Centre is determined to bring this vision to the youth of Marathwada.

आस्था केशवराज संकुल येथे 2 आक्टोबर  महात्मा गांधी जयंतीनिमित्त आस्था केंद्रप्रमुख उमेशजी गाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन ...
02/10/2022

आस्था केशवराज संकुल येथे 2 आक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त आस्था केंद्रप्रमुख उमेशजी गाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व अभिवादन करण्यांत आले.यावेळी सर्व सहकारी वृंद उपस्थित होता

आस्था केशवराज संकुल येथे  17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आस्था संकुल व केशवराज ज्युनियर महाविद्यालय स्था...
17/09/2022

आस्था केशवराज संकुल येथे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आस्था संकुल व केशवराज ज्युनियर महाविद्यालय स्था.स.समिती अध्यक्ष मा.नितीनजी शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला ....यावेळी आस्था केंद्रप्रमुख उमेशजी गाडे ,विभागप्रमुख सौ.मनीषा टोपरे ,जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड,प्रकल्प समन्वयक अनीलजी गायकवाड व सर्व सहकारी वर्ग उपस्थित होते

आस्था केशवराज संकुल येथे लोकशाहीर ,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिम...
01/08/2022

आस्था केशवराज संकुल येथे लोकशाहीर ,साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनंम्र अभिवादन करण्यात आले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,नूतन आद्यक्ष मा.सुरेंद्रजी आलूरकर उपआदयक्ष जितेशजी चापसी नूतन कार्यवाह हेमंतजी वैद्य, भा.शी...
26/07/2022

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,नूतन आद्यक्ष मा.सुरेंद्रजी आलूरकर उपआदयक्ष जितेशजी चापसी नूतन कार्यवाह हेमंतजी वैद्य, भा.शी.प्र संस्था प्रशासकीय अधिकारी चंद्रकांतजी मुळे सर व संस्थेचे माजी कार्यवाह नितीनजी शेटे यांची आस्था संकुल येथे सदिच्छा भेट व मागील 5 वर्षातील आस्था प्रकल्प चा आढावा घेण्यात आला.व मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दिव्यांग मुलाशी संवाद साधून संगणक प्रशिक्षनासबंधी माहिती घेण्यात आली.

युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आस्था संकुल तत्पर    - नितीन शेटे    लातूर/प्रतिनिधी:युवकांनी उद्योग व्यवसायाच्...
15/07/2022

युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आस्था संकुल तत्पर
- नितीन शेटे

लातूर/प्रतिनिधी:युवकांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत.या प्रयत्नात मदत करण्यासाठी आस्था केशवराज शैक्षणिक संकुल सदैव तत्पर आहे,असे प्रतिपादन आस्था- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबाजोगाई, संयोजक नितीन शेटे यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित आस्था केशवराज शैक्षणिक संकुलात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आस्था कुशल युवा पुरस्कार २०२२ चे वितरण शुक्रवारी (दि.१५ जुलै )करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नितीन शेटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्रचे उपाध्यक्ष जितेश चापसी तर प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जनता बँकेचे संचालक विनोद कुचेरिया यांची उपस्थिती होती.केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष मनोज शिरुरे, संजय गुरव, ठाणे जनता सहकारी बँकेचे प्रबंधक श्रीनिवास जोशी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना नितीन शेटे म्हणाले की, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारे आस्था संकुल हे एक नामवंत केंद्र आहे.आजच्या युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.जे युवक उद्योग-व्यवसायासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना मदत करण्यासाठी आस्था संकुल सदैव तत्पर आहे,असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात कला क्षेत्रातून कल्याण वाघमारे,कृषी क्षेत्रातून अभिनव भोसले,कौशल्य क्षेत्रातून सौ.ज्योतीताई मार्कंडे,तंत्रज्ञान क्षेत्रासाठी राजू रेड्डी व आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी डॉ.सागर रसाळ यांचा गौरव करण्यात आला.प्रशिक्षण पूर्ण करून विविध व्यावसायिक क्षेत्रात उतरलेल्या ५२ प्रशिक्षणार्थ्यांना आस्था कुशल युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संस्था उपाध्यक्ष जितेश चापसी यांनी अध्यक्षीय समारोप केला. आस्था केशवराज संकुलाचे केंद्रप्रमुख उमेश गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आस्था संकुलाचे संचालक विवेक शिरसीकर, जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड,प्रकल्प समन्वयक अनिल गायकवाड,आदर्श गिरी, सुकेश सोनकांबळे,सुयोग जोगदंड,केशवराज विज्ञान महाविद्यालयाच्या विभागप्रमुख सौ.मनीषाताई टोपरे यांच्यासह संकुलातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था वर्धापनदिन विविध उपक्रमातून आस्था केशवराज संकुल लातूर येथे साजरा करण्यात आला Maharashtra Ce...
30/06/2022

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था वर्धापनदिन विविध उपक्रमातून आस्था केशवराज संकुल लातूर येथे साजरा करण्यात आला Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED)महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
लातूर आणि आस्था..यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Entrepreneurship Development Programme (EDP) चे उद्घाटन करण्यात आले
2..beauty therapist बॅच चा निरोप समारंभ घेण्यात आला
3.आस्था येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे फोटो बॅनर लावण्यात आला.

"आस्था केशवराज संकुल"येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित एकदिवसीय युवक कार्यशाळा संपन्न लातूर शहरातील...
17/04/2022

"आस्था केशवराज संकुल"येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित एकदिवसीय युवक कार्यशाळा संपन्न लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला अतिशय उत्स्फूर्तपणे ही कार्यशाळा संपन्न झाली विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभले उदघाटन सत्र : विवेकानंद रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन चे अध्यक्ष आनीलजी आंधोरीकर ,स्था. स. समिती कार्यवाह जितेशजी चापसी ,महात्मा बसवेश्वर महा.समाजकार्य विभाग प्रमुख दिनेशजी मौने, केंद्रप्रमुख उमेशजी गाडे जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती सत्र दुसरे:प्रमुख वक्ते प्राचार्य कमलाकर कांबळे, अध्यक्ष:प्राचार्य अझहर शेख सत्र तिसरे: प्रमुख मार्गदर्शक:प्रा गिरजाप्पा मुचाटे ,सत्र चोथें:प्रमुख वक्ते उद्धवजी फड,अध्यक्ष प्रा.दिनेशजी मौने, सत्र पाचवे: प्रमुख वक्ते :प्रा संजयजी गवई ,अध्यक्ष :सुनीलजी वसमतकर मुख्यध्यापक केशवराज मा.शाळा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सत्र सहावे:प्रमुख उपस्थिती:सुनीलजी वसमतकर,प्रा.संजयजी गवई ,प्रा.नागेशजी जाधव, ऍड.धम्मपाल कांबळे ,उमेशजी गाडे अनीलजी गायकवाड प्रकल्प समन्वयक, राहुल गायकवाड, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .विशेष सहकार्य:सुकेश सोनकांबळे,सुयोग जोगदंड, आदर्श गिरी, व समाजकार्य विभागाचे विद्यार्थी यांनी या कार्यशाळे साठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक राहुल गायकवाड यांनी केले भारतीय युवकानी डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे.आजचा युवक समाजामध्ये आपले स्थान टीकवण्यासाठी धडपडत आहे समाजमान्य जीवनात जगण्यासाठी अनेक समस्या त्याच्यासमोर उभ्या आहेत अनेक आव्हाने आहेत त्यांना सामोरे जाण्याची ताकद भारतीय संविधान देते संविधान हे भारताची ताकद आहे.संविधान व युवक यांचा मेळ घालण्याची व भारतीय संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाज जीवनात रुजवण्यासाठी आपण सर्व युवकानी एकत्रित येऊन विचारमंथन करण्याची गरज आहे असे विविध मान्यवरांनी मते व्यक्त केली युवक हा भारतीय समाजमनाचा आरसा आहे. असे प्रतिपादन या कार्यशाळेतुन विविध मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यशाळेत निबंध स्पर्धेतील स्पर्धकाना प्रमाणपत्र व विजय चिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच विवेकानंद रिसर्च ऍण्ड फाऊंडेशन चे अध्यक्ष आनीलजी आंधोरीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आस्था संकुल मार्फत विशेष सन्मान करण्यात आला व या कार्यशाळे मध्ये एकूण 145 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आस्था संकुल तर्फे भारत माता प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भारतीय श...
10/03/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आस्था संकुल तर्फे भारत माता प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीनजी शेटे, आस्था केशवराज संकुलचे संचालक किरणजी भावठाणकर,स्था. समन्वय. समिती कार्यवाह जितेशजी चापसी,केंद्रप्रमुख उमेश गाडे, जनसंपर्क अधिकारी राहुल गायकवाड, प्रकल्प समन्वयक अनिलजी गायकवाड, सुकेश सोनकांबळे,सुयोग जोगदंड,

जागतिक महिला दिनानिमित्त आस्था केशवराज संकुल व केशवराज मा.विद्यालय यांच्या वतीने महिला संवाद आयोजित करण्यात आला यामध्ये ...
09/03/2022

जागतिक महिला दिनानिमित्त आस्था केशवराज संकुल व केशवराज मा.विद्यालय यांच्या वतीने महिला संवाद आयोजित करण्यात आला यामध्ये मार्गदर्शन करताना विभागप्रमुख सौ. मनिषा ताई टोपरे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.सुरेंद्रजी आलूरकर यांनी आस्था केशवराज संकुल येथे सदिच्छा भेट दिली व आस्था संकु...
22/02/2022

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा.सुरेंद्रजी आलूरकर यांनी आस्था केशवराज संकुल येथे सदिच्छा भेट दिली व आस्था संकुल येथील विविध कोर्सेस,कौशल्य योजनांचा आढावा घेतला Beauty Therapist या बॅचमधील प्रशिक्षनार्थ्यांना त्यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले.

आस्था केशवराज संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त आभिवादन करण्यात आले💐💐💐
19/02/2022

आस्था केशवराज संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त आभिवादन करण्यात आले💐💐💐

Address

AASTHA KESHWARAJ SANKUL IT PARK OLD MIDC Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919657664846

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aastha Skill India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aastha Skill India:

Shortcuts

Share

Category