15/01/2020
न्यु ज्ञानसागर प्री इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा..........
दि.12 - भगवानराव बारसोळे बहु.सेवाभावी संस्था लातुर द्वारा संचलित न्यु ज्ञानसागर प्री इंग्लिश स्कूल शाहु नगर लातुर येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास उदघाटन म्हणून लातुर शहराचे सन्मानिय महापौर मा.श्री.विक्रांत भैय्या गोजमगुंडे, प्रमुख पाहुणे उद्योजक तथा संचालक डि.एस.ग्रुपचे मा.श्री.तुकाराम भैय्या पाटील, नगरसेविका मा.सौ .वर्षाताई मस्के , दत्ता मस्के , प्रा डाॅ श्री अशोक पदमपल्ले, संस्थेचे अध्यक्ष श्री.परमवीर बारसोळे सर , उपाध्यक्ष श्री शरद दुधाळे, सचिव श्री आण्णाराव कानपुर्णे, श्री शिवाजी बारसकर, श्री.दगडु खैरमोडे , कोषाध्यक्ष श्री ओम लोणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री दिलीप कानगुले सर यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.गोपाल परगे, रमाकांत मोरे, सचिन जोकरे, बसवेश्वर स्वामी , प्राचार्य सौ.किरण बारसोळे मॅडम, साबळे मॅडम, यांनी प्रयत्न केले यावेळी परिसरातील सर्व नागरिक , पालकवर्ग, महिला वर्ग , विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. .....