Jagat Jagruti Shikshan Prasarak Mandal,Chakur

Jagat Jagruti Shikshan Prasarak Mandal,Chakur Esta. Year 1952
' न हि ज्ञानेनसदृश्यं पवित्रमिह विद्यते '

Jagat Jagruti Shikshan Prasarak Mandal,also known as JJSPM.

1.Jagat Jagruti Primary School,Chakur
2.Jagat Jagruti secondary School,Chakur
3.Jagat Jagruti Public Library,Chakur
4.Sane Guruji Boys Hostel,Chakur

28/04/2026

जगत जागृती विद्यामंदिर चाकूर येथे आज इयत्ता पाचवीसाठी प्रवेश घेण्यासाठी पूर्व प्रवेश परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

"राष्ट्रीय विज्ञान दिवस"      जगत जागृती विद्या मंदिर चाकूर येथे अटल टिकरिंग लॅब व विज्ञान विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय...
08/03/2026

"राष्ट्रीय विज्ञान दिवस" जगत जागृती विद्या मंदिर चाकूर येथे अटल टिकरिंग लॅब व विज्ञान विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम प्रार्थनेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांची माहिती सादर केली व भाषण केले. यावेळी अटल टिंकरिंग यांचेप्रमुख डॉ. चलवदे यू. एस.यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान विभाग प्रमुख श्री. आयतलवाड पी. आर. यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे पर्यवेक्षक श्री. उत्सुर्गे पी. एल.यांनी केले. विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपले प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कदम आर. एन.यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विज्ञान विभागातील श्री.पाटील सर, सूर्यवंशी मॅडम,समाधान तलवारे यांनी सहकार्य केले. विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. नारागूडे एस. एम. यांनी मोलाचे सहकार्य केले.

जगत जागृती माध्यमिक विद्यामंदिरच्या येथील विद्यार्थ्यांनी अटल टीकरिंग लॅब मध्ये बनवलेल्या प्रयोगाचे सादरीकरण जिल्हास्तरी...
08/03/2026

जगत जागृती माध्यमिक विद्यामंदिरच्या येथील विद्यार्थ्यांनी अटल टीकरिंग लॅब मध्ये बनवलेल्या प्रयोगाचे सादरीकरण जिल्हास्तरीय अटल स्टिकरिंग लॅब प्रदर्शनामध्ये करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे मनपूर्वक अभिनंदन.

08/03/2026

जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारा संचलित जगत जागृती माध्यमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रयोगाचे विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले त्याप्रसंगी विद्यालयाचा शिक्षक वृंद व सहभागी विद्यार्थी. सर्वांचे अभिनंदन.

जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ  चाकूर चे मार्गदर्शक व आधारस्तंभ आदरणीय श्री. शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या 90 व्य...
12/10/2025

जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर चे मार्गदर्शक व आधारस्तंभ आदरणीय श्री. शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त सर्व संचालक मंडळ, शिक्षक, कर्मचारी यांच्यावतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य व निरोगी स्वास्थ प्रदान करो ही प्रार्थना. 🙏💐

जगत जागृती विद्यामंदिर चाकूर च्या विद्यार्थी संघाचा आज दिनांक  24/9/2025 रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा संत तुकार...
26/09/2025

जगत जागृती विद्यामंदिर चाकूर च्या विद्यार्थी संघाचा आज दिनांक 24/9/2025 रोजी तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा संत तुकाराम देवंग्रा येथे झाल्या. त्या स्पर्धेत आपल्या शाळेचा संघ 17 वर्ष वयोगट मुले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभागाचे शिक्षक श्री चिटबोने सर यांचे हार्दिक अभिनंदन .💐

🌹 अभिनंदन !अभिनंदन !!अभिनंदन!!!🌹🌹 आखिल भारतीयराष्ट्रीय विज्ञान मेळावा 2025  मध्ये... *कु.गायत्री महालिंग स्वामी ची उत्तु...
26/09/2025

🌹 अभिनंदन !अभिनंदन !!अभिनंदन!!!🌹🌹
आखिल भारतीय
राष्ट्रीय विज्ञान मेळावा 2025 मध्ये...
*कु.गायत्री महालिंग स्वामी ची उत्तुंग भरारी*
**************************
"क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता आणि आव्हाने"
या विषयावर दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी गट साधन केंद्र , चाकूर येथे...विज्ञान परिसंवादामध्ये कुमारी गायत्री महादेव स्वामी हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.

तसेच जिल्हास्तरावर
महात्मा बसवेश्वर कॉलेज लातूर(दि. 24 सप्टेंबर 2025) : येथे “राष्ट्रीय विज्ञान मेळावा 2025” हाही मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी “क्वांटम युगाची सुरूवात : शक्यता व आव्हाने” या आधुनिक विषयावर (06 मिनिट) विविध साहित्य वापरून आकर्षक सादरीकरणे केले.या परिसंवादा मध्ये विद्यार्थ्यांनी चार्ट, पोस्टर, संगणक स्लाईड इत्यादीचा वापर केला.

या स्पर्धेचे मुख्य आयोजक नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स, भारत सरकार (संस्कृती मंत्रालय) व नेहरू सायन्स सेंटर, मुंबई हे असून, राज्यस्तरीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार आज जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न झाला.

या स्पर्धेत जगतृ जागृती विद्यामंदिर चाकूर ची विद्यार्थीनी कुमारी गायत्री महालिंग स्वामी हिने द्वितीय क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर मजल मारली. व दिनांक 25 सप्टेंबर रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल *संस्थेचे सचिव श्री. नरेश जी पाटील चाकूरकर* साहेब,
*अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी काका* , उपाध्यक्ष अर्जुन जी मद्रेवार ,सहसचिव बाबुराव बिडवे, कोषाध्यक्ष धोंडीराम धोंडरे, सदस्य *ॲड‌ विक्रमजी पाटील चाकूरकर* साहेब, विठ्ठल रावजी सोनटक्के, एडवोकेट सुधाकरराव मोतीपवळे , शिव प्रसाद शेटे , महादेव काळोजी,सह विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नारागुडे एस.एम पर्यवेक्षक श्री. उस्तुर्गे पी.एल *विज्ञान विभाग प्रमुख श्री.ऐतलवाड पी.आर.*
तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन करण्यात आले.

या यशस्वी विद्यार्थिनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.🌹🌹

जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर ते ज्येष्ठ सदस्य संचालक व कोषाध्यक्ष श्री सोमनाथ स्वामी यांचे आज दिनांक 26 .7.2024 ...
26/07/2024

जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर ते ज्येष्ठ सदस्य संचालक व कोषाध्यक्ष श्री सोमनाथ स्वामी यांचे आज दिनांक 26 .7.2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. ईश्वर पुण्य आत्म्यास स्वर्गात स्थान देऊन शांती प्रदान करो ही साई चरणी प्रार्थना व हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना प्रदान करो ही प्रार्थना🙏. लोक म्हणतात की,
“एक जण गेल्याने दुनिया संपत नाही
किंवा थांबत नाही…
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख लोक मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…!

आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारे संचलित जगत जागृती माध्यमिक विद्याम...
21/06/2024

आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळ चाकूर द्वारे संचलित जगत जागृती माध्यमिक विद्यामंदिर व जगत जागृती प्राथमिक विद्यामंदिर चाकूर योगा विषयी मार्गदर्शन व *योगाच्या विविध आसनांची कृती* विद्यार्थ्यांना करून घेण्यात आली व योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

जगत जागृती विद्यामंदिर  चाकूरच्या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐
01/06/2024

जगत जागृती विद्यामंदिर चाकूरच्या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐

जगत जागृती विद्यामंदिर च्या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृद्धांचे मनपूर्वक अभिनंदन 💐
01/06/2024

जगत जागृती विद्यामंदिर च्या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृद्धांचे मनपूर्वक अभिनंदन 💐

Address

In Front Of Bus Stand, Main Road
Latur
413513

Opening Hours

Monday 10am - 4:30pm
Tuesday 10am - 4:30pm
Wednesday 10am - 4:30pm
Thursday 10am - 4:30pm
Friday 10am - 4:30pm
Saturday 10am - 1:30pm

Telephone

02381-252054

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagat Jagruti Shikshan Prasarak Mandal,Chakur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jagat Jagruti Shikshan Prasarak Mandal,Chakur:

Shortcuts

Share