ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प , लातूर

  • Home
  • India
  • Latur
  • ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प , लातूर

ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प , लातूर एक शाळा चैतन्याने आरपार बहरलेली । प्रार्थनेच्या हातांमधून ज्ञानसूर्य धरलेली ।।

16/08/2026
*ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प सामाजिक परिवर्तनाचे उत्तम माध्यम*         ह.भ.प. मा.श्री.दत्तात्रय पवार (माजी आदर्श राज्य ...
15/08/2026

*ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प सामाजिक परिवर्तनाचे उत्तम माध्यम*
ह.भ.प. मा.श्री.दत्तात्रय पवार (माजी आदर्श राज्य शिक्षक,महाराष्ट्र राज्य)
ज्ञानप्रकाश शैक्षणिक व सामाजिक प्रकल्पात आज 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण मा.श्री.दत्तात्रय पवार (आदर्श शिक्षक), यांच्या हस्ते तर मा.श्री.अंगद कोतवाडे ( सेवानिवृत्त BSNL,लातूर) मा.श्री.सतीश नरहरे (प्रकल्पप्रमुख,ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प,लातूर) व मा.सविता नरहरे (मुख्याध्यापिका तथा संचालिका,ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प,लातूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रकल्पप्रमुख सतीश नरहरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना प्रकल्पातील मुले आणि पालक म्हणून आपण समाजाप्रती व देशाप्रती काय काय करू शकतो याविषयी भावना व्यक्त केल्या.
मा.श्री.अंगद कोतवाडे यांनी शुभेच्छा दिल्या आणि पालकांना संदेश दिला . प्रत्येक मूल स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे आहे.पालक म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचा विद्यार्थी विशेष आणि सरस दिसतो. तसेच प्रकल्पप्रमुख नरहरे सरांच्या जडणघडणी विषयीचे अनुभव त्यांनी मुलांना सांगितले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.अभिमान्यू पवार यांचे वडील आणि आदर्श शिक्षक 90 वर्षीय मा.श्री.दत्तात्रय पवार आपले मनोगत करताना म्हणाले,उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात.ज्ञानप्रकाश प्रकल्प मावळत्या सूर्याला नमस्कार करणारा एकच...
परिवर्तन हा सृष्टीचा नियम..ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प हा सामाजिक परिवर्तनाचे उत्तम माध्यम आहे.
स्वतः वारकरी असलेले मा.श्री.पवार म्हणाले मी ज्ञान पंढरीचाही वारकरी आहे. आणि शिक्षक म्हणून अजून निवृत्त झालो नाही .
सेवानिवृत्ती नंतर 12 वर्ष आदिवासी मुलांना शिकवण्याचे काम केले.ज्ञानाशी अतूट नाते खूप महत्त्वाचे आहे अशी निखळ भावना व्यक्त केले.
प्रकल्पाचे कौतुक करताना ते म्हणाले, ज्ञान मिळवून त्याचा प्रकाश ही पाहावयास मिळाला.
यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.मोबाईल वापराविषयी ते म्हणाले,आधुनिक तंत्रज्ञान चांगले आहे पण त्याचा वापर कसा करावा अधिक महत्त्वाचे आहे.
ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. सर्वांचा सन्मान करा,सन्मान मिळेल..तसेच गेलेली वेळ ही महत्त्वाची असते कारण त्यातून अनुभव मिळालेला असतो.
त्यांनी प्रश्न आणि समस्या यातील सूक्ष्म फरक ही सांगितला.
आपल्या मनोगताचा समारोप करताना त्यांनी इयत्ता 10 वी तून मुलात आणि मुलीत प्रथम येणाऱ्यास 10000 रु बक्षीस जाहीर केले.
आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने बालनाट्य स्पर्धेतील कलाकार व कलाकारांचे,देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे,ज्ञानप्रकाश टॅलेंट सर्च परीक्षेतील व शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता 9 वी तील कु.प्रतीक्षा धपाटे व कु.प्राची पोतदार यांनी केले.
यावेळी उपमुख्याध्यापक श्री.राऊत सर,पर्यवेक्षक अशोक सर,श्री.प्रभाकर हिप्परगे सर ,विभाग प्रमुख माधवी मिरजकर व वसुधा हुंडेकरी , संपदा पांडे ,शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Address

Dnyanprakash Balvikas Kendra, Near Narhare Classes , Prakash Nagar East , Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 2pm
Saturday 9am - 12am

Telephone

02382224599

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प , लातूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share