Latur College of Science, Latur

Latur College of Science, Latur One of the best college for 11th and 12th science education, all over India.

श्री भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण  स्पर्धा         श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक...
08/08/2024

श्री भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर,राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक लातूर, आणि लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयांमध्ये पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये विविध विषया मधील १०२ पोस्टरांचा सहभाग नोंदवला गेला. या कार्यक्रमाला पंच म्हणून डॉ प्रताप भोसले चन्नाबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर, डॉ जयदीप यादव प्राचार्य डी बी फार्मसी महाविद्यालय म्हालंग्रा, डॉ.सुनील गरड महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, श्री सी.जी पाटील माजी उपप्राचार्य कुमार स्वामी महाविद्यालय औसा, डॉ. सुचित्रा भालचंद्र स्त्रीरोगतज्ञ, ,डॉ.जे सी राठोड शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन महाविद्यालय लातूर हे प्रमुख पाहुणे लाभले. प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मामचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे ,नंदकिशोर बावगे, सौ. माधुरी बावगे तसेच प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, प्राचार्य संतोष मेदगे, प्राचार्या योगिता बावगे, प्राचार्य राजशेखर चौधरी, प्रा.शुभम वैरागकर तसेच पोस्टर सादरीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

13/06/2024

26/05/2024
लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर महाविद्यालयाचा 100% निकाल
26/05/2024

लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर महाविद्यालयाचा 100% निकाल

युवा रंग 2024
07/04/2024

युवा रंग 2024

Admission Open
22/03/2024

Admission Open

स्त्री कडून स्त्रीचा सन्मान व आदर करायला पाहिजे. -सौ मीनल शिवराज मोटेगावकर            शिस्त, वेळेचे नियोजन सातत्य ,आत्मव...
10/03/2024

स्त्री कडून स्त्रीचा सन्मान व आदर करायला पाहिजे. -सौ मीनल शिवराज मोटेगावकर

शिस्त, वेळेचे नियोजन सातत्य ,आत्मविश्वास, दूरदृष्टी, इच्छाशक्ती, सृजनशीलता,वर्तमान काळाचा विचार यासूत्राचा अवलंब प्रत्येकाच्या जीवनामध्ये तंतोतंत पालन केल्यानंतर यश हमखास मिळते असे प्रतिपादन रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस लातूरचे संचालिका सौ मीनल शिवराज मोटेगावकर यांनी सांगितले. श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,आणि लातूर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सौ मीनल शिवराज मोटेगावकर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, सौ माधुरी बावगे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला ,प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, प्रभारी प्राचार्य शुभम वैरागकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ मीनल शिवराज मोटेगावकर पुढे बोलत असताना "मुलींनी शिक्षण घेत असताना आपल्या आई-वडिलांची शरमेने मान कधीच खाली होऊ देऊ नका प्रामाणिकपणे अभ्यास आणि अभ्यास करा" असे सखोल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
"प्रत्येक पुरुषाच्या यशामागे आपल्या धर्मपत्नीच्या सिंहाचा वाटा असतो "असे प्रतिपादन सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केले. तसेच नंदकिशोर बावगे मनोगत व्यक्त करताना"प्रत्येक मुलीच्या मनगटामध्ये बळ असायला पाहिजे कसलाही समोर पाषाण आला तरी फोडून काढू अशी धाडस मुलीमध्ये असायला पाहिजे असे "असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.अक्षता लासुरे तर आभार प्रदर्शन नंदकिशोर बावगे यांनी केले या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद मुली मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

Address

Hasegaon
Latur
413531

Telephone

9860777105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Latur College of Science, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Latur College of Science, Latur:

Shortcuts

Share

Category