27/10/2023
मित्रहो नमस्कार .2012 मध्ये मा जिजाऊ आणि विवेकानंद जन्मदिनी औरंगाबादच्या सिडको N-1 मध्ये Quest Academy ची मुहूर्तमेढ रोवली .रमाकांत चौधरी 15 दिवसात रुजू झाला आणि त्याने सगळी जबाबदारी अंगावर घेतली . खूप प्रयोग केले अगदी पहिल्या बॅच पासून उत्कृष्ट निकालाची परंपरा निर्माण केली . AIIMS,IIT ,IISc ,IISER ya भारतातील नामवंत शिक्षण संस्थेत मराठवाड्यातील मुलांचा प्रवेश सुखकर केला .JEE/ NEET/ NDA/ KVPY या प्रवेश परीक्षेत वाखाणण्याजोगे यश मिळवले . या सगळ्या धावपळीत प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले . धंद्यात आर्थिक शिस्त महत्वाची असते .ती कधी जमलीच नाही . माता सरस्वती सतत प्रसन्न होती आणि वरदान देत होती .पण लक्ष्मी मातेने कधी उन्हाळा तर कधी पावसाळा दाखवला .धंद्यात एक निर्णय चुकला की त्याचे भयंकर परिणाम पुढील काही दिवस होतात . त्यातच नव्याने शाखा वाढवणे , अवाजवी गुंतवणूक करणे आणि अनाहूतपणे कोरोनाचे संकट त्याचवेळी उद्भवणे. सर्वस्व संपलं होत .नव्याने सुरुवात करण्याची उमेदही संपली होती .रमाकांत आणि सर्व टीम विखुरली गेली होती .वडिलांचं कृपाछत्र हरवलं होत. "उषा :काल होता होता काळरात्र झाली ". पन्नाशीत दुसऱ्याकडे चाकरी करावी लागणे यापेक्षा विपरीत काय घडू शकते ! पण हळू हळू सगळं अंगवळणी पडलं .किंबहुना स्वीकारावं लागलं ! नियतीच्या गर्भात काय काय दडलेले असते माहीत नाही . पुन्हा नव्याने "Quest Academy" पुनर्जीवन होते आहे . अगदी ,आकस्मिक ! आता आर्थिक शिस्त लावून घ्यायची आहे आणि विस्कटलेली घडी पुन्हा स्थापित करायची आहे.ज्यांनी आधार दिला ,धीर दिला त्यांचे ऋण फेडायचे आहे .नव्याने उभारी घ्यायची आहे . विद्या-दानाचा यज्ञ- कुंड परत पेटवायचा आहे .आता मात्र तो कायम तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे !आपले प्रेम आणि आशीर्वाद यापुढेही लाभावेत. पुणे विद्या-नगरीत COEP त ज्यांचे मार्गदर्शन लाभले अशा काही शिक्षण - क्षेत्रातील दिग्गजांबरोबर techno-foundation project सुरू करत आहोत.