Sharada Semi English School Latur

Sharada Semi English School Latur s

Freedom fighter, socialist thinker, social activist, Marathi literary Shri. Today is the memorial day of Pandurang Sadas...
11/06/2024

Freedom fighter, socialist thinker, social activist, Marathi literary Shri. Today is the memorial day of Pandurang Sadashiv Sane (Sane Guruji)... Humble salute to them on that occasion...!

11/05/2024
राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटग...
06/05/2024

राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🙏

राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते, शाहू महाराजांना 'राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुम क्षत्रिय समाजाने दिली.

६ मे १९२२ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे निधन. शाहू महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजी राजांच्या अकाली मृत्यूनंतर १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. शाहू महाराजांनी १९१७ साली आपल्या संस्थानात सक्तीचा मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि अंमलात आणला. तसेच शाहू महाराजांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्यांना अर्थसहाय्य केले. मुंबई येथे
वयाच्या ४८व्या वर्षी शाहू महाराजांचे हृदयविकाराने झाले.

# Sharada Semi-english School

Sharada Semi-english School Respected* Dr.M.R . Patil Sir giving their speech (Guidance) to the students, on the occasio...
05/05/2024

Sharada Semi-english School

Respected* Dr.M.R . Patil Sir giving their speech (Guidance) to the students, on the occasion of prize distribution program of Blockly games and Java script program

शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण गुणवंताचे कौतुक *********************...
03/05/2024

शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण गुणवंताचे कौतुक
*****************************
लातूर :: शारदा सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एम.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येते.या परीक्षेत शारदा सेमी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यामध्ये प्रथम शौर्य अरुण धाराशिवे द्वितीय अवधूत गोविंद जाधव तृतीय अभिजीत बालाजी बिराजदार तसेच पात्र ठरलेले विध्यार्थी सुदर्शन सुधाकर लकडे, तन्वी संजय चव्हाण, सिध्दी विजयसिंह बोराडे, रुद्रानी गंगाधर पाचेगावकर, श्रवण श्रीकांत केंद्रे, स्नेहल दत्तात्रय रामरुळे, साद रफिक सय्यद, यश बाबुराव घाडगे असे एकुण अकरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम.आर.पाटील यांच्या हस्ते कॉक्सिट कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले.याव़ेळी शारदा सेमी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य लक्ष्मण पुरी पालक प्रतिनिधी सुचिता तांबोळकर आदी पालक विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक रोहित जाधव सर, मुख्य समन्वयिका अनघा पाटील, दर्शना बोराडे, मीनाक्षी सूर्यवंशी,समरजीत ढगे, लिंबराज गायकवाड, किरण क्षिरसागर यांची उपस्थिती होती.डॉ एम.आर.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवावे चिकाटी ठेवावी व उज्ज्वल यश संपादन करावे असे आवाहन केले . पुढे ते म्हणाले पालक आणि शिक्षक यांनी जागरूक राहुन गुणवता वाढीकडे लक्ष दयावे अशा सुचनाही दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दर्शना बोराडे यांनी केले

*शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा* ***********************************************************...
03/05/2024

*शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा*
**************************************************************************
दिनांक ०१ मे २०२४ बुधवार, रोजी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम .आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन रेडेकर पी .एस.आय. पोलीस स्टेशनरेणापूर, तसेच अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य प्रा. लक्ष्मण पुरी सर , प्रमुख उपस्थिती मुख्य समन्वयिका अनघा पाटील, माध्यमिक विभागाच्या समन्वयिका मानसी पाटील , तसेच स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक रोहित जाधव व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका आश्विनी पवार मॅडम तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रेणुका समुद्र मॅडम तसेच परीक्षाविभाग प्रमुख उषा गुडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले; त्यानंतर ध्वजवंदना व राष्ट्रगीत झाले. यानिमित्त कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले पी.एस.आय.सचिन रेडेकर यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कदम यांनी तर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितल नडगिरे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी वृंद, विद्यार्थी तसेच पालक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता उषा गुडदे ,अनघा पाटील व वर्षा कांबळे यांनी *महाराष्ट्र* *गीताचे* सादरीकरण करून केली .
अशा पद्धतीने, अतिशय उत्साहात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कार्यक्रम शाळेमध्ये पार पडला .

रॉयल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय. डॉ. एम आर पाटील सरांना वाढदिवसाच्या हार्दि...
14/04/2024

रॉयल एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय. डॉ. एम आर पाटील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी... प्रार्थना!!!!

आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने संत तुकाराम...
18/07/2023

आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल ,लातूर येथे आयोजित सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये शारदा सेमी इंग्लिश स्कूल, लातूर मधील वयोगट 17 वर्ष मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी शाळेचे प्राचार्य लक्ष्मण पुरी सर आणि क्रीडा शिक्षक बालकिशन देवडे सर यांनी विजयी संघातील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले त्यावेळी शाळेचे समन्वयक मानसी पाटील, अनघा पाटील, अश्विनी पवार ,रेणुका समुद्रे ,रोहित जाधव व तसेच अन्य शिक्षक साधना भेटे ,मीनाक्षी सूर्यवंशी, मीरा जाधव, रोहिणी कदम, उषा गडदे ,दर्शना देशमुख, लिंबराज गायकवाड समरजीत ढगे ,गीतांजली गिरी अश्विनी सुनापे ,वर्षा कांबळे, अनिता रायमल ,शारदा नागभट्टी, ऐश्वर्या बागल , शितल नडगिरे, वैष्णवी मुंडे, जटाळ मॅडम ,प्रियल गोखले आदि शिक्षक उपस्थित होते.

🚩🙏🏻ताल वाजे, मृदुंग वाजे,वाजे हरीचा वीणा,माऊली निघाले पंढरपूर,मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,जय जय राम कृष्ण हरीआषाढी एकादशी ...
29/06/2023

🚩🙏🏻ताल वाजे, मृदुंग वाजे,
वाजे हरीचा वीणा,
माऊली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला,
जय जय राम कृष्ण हरी
आषाढी एकादशी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻

Address

Near Ambajogai Bridge
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919850457287

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharada Semi English School Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category