TPS-Triveni Pre- School,Latur

TPS-Triveni Pre- School,Latur Pre school with Prime location,least fees ,best Facilities and caring mother teachers at latur.

21/02/2026

TPS-TRIVENI PRE -SCHOOL,Ausa road , लातूर चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न!

अद्भुत शैक्षणिक परिसर अन् अल्प शुल्कात दर्जेदार प्री-प्रायमरी शिक्षण!*

"लहान मुलांचे भवितव्य घडविणारी, कर्तव्यदक्ष शिक्षकांची शाळा"

दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी TPS-TRIVENI PRE SCHOOL, लातूर यांच्या नवीन शैक्षणिक वाटचालीचा उद्घाटन सोहळा खर्डेकर स्टॉप,मेन औसा रोड, लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती माता, श्री गणराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर मा. तृप्ती आंधारे मॅडम (शिक्षणाधिकारी - प्राथमिक, लातूर), मा. श्वेताताई लोंढे, मा. वैशालीताई लोंढे, आदरणीय त्रिवेणी अंबादास देशमुख, तसेच टीपीएस च्या अकॅडमिक डीन मा. सोनल एन. सोमानी मॅडम आणि संचालिका मा.मोहिनी पवार मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी नव्याने साकारलेल्या शाळेला भेट दिली. अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज वर्ग आणि अतिशय कमी शुल्कातील दर्जेदार सुविधा पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

मान्यवरांच्या भावना:

· मा. तृप्ती आंधारे मॅडम (शिक्षणाधिकारी - प्राथमिक, लातूर) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "लहान मुले रडत नव्हे, तर आनंदाने शाळेत यावीत, अशा प्री-स्कूलची गरज आहे. केवळ शैक्षणिक नव्हे, तर अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये मुलांना सक्रिय केले पाहिजे. प्री-स्कूल हे ओझ्याशिवाय, मैत्रीपूर्ण शिक्षक आणि कमी स्क्रीन टाइम या तत्त्वांवर चालले पाहिजे. मुलांच्या भवितव्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे."
· मा. श्वेताताई लोंढे म्हणाल्या, "TPS-TRIVENI PRE SCHOOL म्हणजे तिन्ही नद्यांचा संगम (त्रिवेणी संगम) आहे. हे एक छोट रोपट आहे, आणि याला मोठे वृक्ष होण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण सहकार्य करू."
· मा. वैशालीताई लोंढे यांनी व्यवस्थापनाचा गौरव करताना सांगितले की, "TPS टीम शैक्षणिकदृष्ट्या खूप सक्षम आणि अत्यंत अनुभवी आहे. त्यामुळे या शाळेत मुलांच्या बालपणाला योग्य दिशा मिळेल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे."
· याप्रसंगी मा. बेळंबे सर यांनी टीपीएस च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या टीमवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
· शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक पद्धतीविषयी मा. सोनल एन. सोमानी मॅडम -डीन आणि मा. मोहिनी पवार मॅडम यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या अनोख्या पद्धतींची माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रचंड लोकांची गर्दी होती.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. नीमा बिरादार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले आणि पालकांच्या व समाजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

TPS-TRIVENI PRE SCHOOL
खरडेकर स्टॉप, मेन औसा रोड, लातूर.
(7020398710/9028871814)@

Address

Khardekar Stop, Near Kanade Hospital, Main Ausa Road , Latur
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TPS-Triveni Pre- School,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category