Brilliant Mahavidyalaya, Latur

Brilliant Mahavidyalaya, Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Brilliant Mahavidyalaya, Latur, Education & Learning, Mayurban Colony, Ambajogai Road, Latur.

 #ब्रिलियंट  #मध्ये  #तृतीय  #वर्षातील  #विद्यार्थ्यांचा  #निरोप  #समारंभ  #कार्यक्रम  #संपन्नलातूर : लोकमाता अहिल्यादेव...
20/03/2025

#ब्रिलियंट #मध्ये #तृतीय #वर्षातील #विद्यार्थ्यांचा #निरोप #समारंभ #कार्यक्रम #संपन्न

लातूर : लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ब्रिलियंट महाविद्यालय,लातूर येथे संस्थाध्यक्ष प्राचार्य. एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि.18) रोजी बी.ए.,बी.कॉम.व बी.एस्सी. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे #प्रभारी #प्राचार्य #प्रा. #युवराज #बी. #अंधोरीकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून कै.प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय,लातूर येथील #प्रा. #संतोष #तोडकर हे लाभले होते तर गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे) महाविद्यालय,लातूर येथील #प्रभारी #प्राचार्य #डॉ. #सचिन #प्रयाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. प्रास्ताविक प्रा.प्रियंका गोमचाळे यांनी केले. यावेळी विद्यापीठ हिवाळी परीक्षा 2024 मधील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पदवी शिक्षणाचा काळ हा सुवर्ण काळ असतो, पदवी घेऊन जेंव्हा आपण बाहेर पडतो तेंव्हा स्पर्धा ही स्वतः सोबत असते त्यामुळे आपल्या कार्यात नेहमी सातत्य ठेवा असा कानमंत्र यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. संतोष तोडकर यांनी दिला. तर डॉ.प्रयाग यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचा वापर महाविद्यालयासाठी करावा असे मत व्यक्त केले. तसेच तृतीय वर्षातील विद्यार्थी व विद्यर्थिनींनी महाविद्यालयाविषयी आपल्या आठवणी सांगत भावनिक मत व्यक्त केले व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज बी.अंधोरीकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात सत्य, जिद्द, चिकाटी व प्रामाणिकता जवळ असेल तर यश संपादनासाठी वेळ लागणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी कार्य करावे असे मत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालया अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या पूर्व सत्र परीक्षेस व पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विद्यापीठ उन्हाळी परीक्षा 2025 साठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रा. सोनाली कांबळे तर आभार डॉ.अर्चना धनवे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास डॉ.शिवेश्वर मुचाटे,डॉ.जितेंद्र गायकवाड, प्रा.बळीराम मोठेराव,प्रा. ऋषिकेश साके,प्रा. मीना ढगे,प्रा.दिपक पाटे,प्रा.स्वप्नाली क्षीरसागर,प्रा.श्रद्धा पाडे, श्री.परशुराम तिवारी,श्री.परमेश्वर लवटे, श्री. दयानंद भारती,अजय सांडूर,गणेश लवटे,सर्व प्राध्यापक वर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

11/02/2025
 #अवयवदान  #ही  #काळाची  #गरज  #आहे -  #डॉ. #स्नेहल  #हाके- #पाटीललातूर (११/०२/२०२५) येथील ब्रिलियंट महाविद्यालय सायंकाळ...
11/02/2025

#अवयवदान #ही #काळाची #गरज #आहे - #डॉ. #स्नेहल #हाके- #पाटील
लातूर (११/०२/२०२५) येथील ब्रिलियंट महाविद्यालय सायंकाळचे व पी.पी.कॉलेज ऑफ नर्सिंग,लातूर च्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अवयवदान वर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील #भूलतज्ञ #डॉ. #स्नेहल #हाके #पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी अवयवदान या विषयावर संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील अवयवदाना मागील अंधश्रद्धा दूर करत अवयवदानाचे महत्व स्पष्ट केले. तसेच मरणोत्तर आपल्या शरीरातील अवयव दान केल्याने आठ जणांना त्याचा फायदा होतो आणि ५० पेक्षा जास्त लोकांना इतर प्रकारे त्याचा उपयोग होतो. त्यासाठी आपण स्वतःला सदृढ कसे ठेवायचे, त्यासाठी योग्य आहार कसा घ्यावा हेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी #संस्थाध्यक्ष #प्राचार्य. #एकनाथ #पाटील हे होते तर नर्सिंग कॉलेज चे #प्राचार्य #अनिल #वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकांमध्ये अवयवदानाबद्दल समज गैरसमज असल्यामुळे जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अवयवदान करणाऱ्याची संख्या इतर देशाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवदानाची जनजागृती करून अवयवदान करण्याचे आवाहन समाजातील लोकांना केले पाहिजे असे संस्थाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील यांनी यावेळी मनोगत मांडले. प्रास्ताविकामधे प्रभारी प्राचार्य #प्रा. #युवराज #बी. #अंधोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व महाविद्यालयात राबवले जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. या अवयवदान जनजागृती कार्यक्रमामध्ये उपस्थित #डॉ. #स्नेहा #भुटे व #डॉ. #पेट्रिक यांच्याकडे स्वतः संस्थाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील, प्र.प्राचार्य प्रा.युवराज बी.अंधोरीकर, प्रा.प्रियंका गोमचाळे, डॉ.अर्चना धनवे, प्रा.सोनाली कांबळे यांनी अवयवदान नोंदणी फॉर्म भरून इतरांनाही नोंदणी करण्याचे आव्हाहन केले. सूत्रसंचालन प्रा.सोनाली कांबळे तर आभार प्रा.प्रियंका गोमचाळे यांनी मानले. यावेळी नर्सिंग कॉलेज च्या उपप्राचार्या माधुरी
इळेकर, डॉ.जितेंद्र गायकवाड, प्रा.बळीराम मोठेराव, प्रा.ऋषिकेश साके, ट्यूटर वर्षा चाटे, ट्यूटर खाणपाटे शिवानंद, प्रा.स्वप्नाली क्षीरसागर, श्री.वृषल ढेपे, श्री.धनराज पडिले, श्री.परशुराम तिवारी, श्री.दयानंद भारती, श्री.परमेश्वर लवटे, अजय सांडूर, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 #ब्रिलियंटमध्ये " #वाचन  #संकल्प  #महाराष्ट्राचा"  #उपक्रम  #संपन्न*लातूर : (१७ जानेवारी २०२५) येथील लोकमाता अहिल्यादेव...
18/01/2025

#ब्रिलियंटमध्ये " #वाचन #संकल्प #महाराष्ट्राचा" #उपक्रम #संपन्न*
लातूर : (१७ जानेवारी २०२५) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित *ब्रिलियंट महाविद्यालय (सायंकाळचे), लातूर* येथे ग्रंथालय विभागाद्वारे ग्रंथपाल तथा * #प्रभारी #प्राचार्य #प्रा. #युवराज #बी. #अंधोरीकर* यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या *"वाचन संकल्प महाराष्ट्राचा"* या उपक्रमांतर्गत १ ते १५ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलामध्ये वाचनाची ओढ निर्माण व्हावी आणि मुलांना पुस्तकांचे महत्व समजावे यासाठी ग्रंथालय विभागात * #संस्थाध्यक्ष #प्राचार्य #एकनाथ #पाटील* यांच्या शुभहस्ते *ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन* करण्यात आले. यावेळी ग्रंथालय विभागाने अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तकांची सुरेख मांडणी केली होती. नामवंत लेखकांची पुस्तके मुलाना वाचनासाठी ठेवण्यात आली होती. या ग्रंथप्रदर्शनला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर *वाचन कार्यशाळा* पार पडली. या वाचन कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी सामूहिक वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी * #प्रा. #बळीराम #मोठेराव* यांनी विद्यार्थ्यांना वाचन करताना घ्यावयाची काळजी आणि वाचनाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. वाचन हा शब्द वचन शब्दापासून आला आहे. वाचन म्हणजे शपथ, श म्हणजे शंभर टक्के पथ म्हणजे मार्ग म्हणून शंभर टक्के यशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे वाचन होय असे प्रमुख पाहुणे * #डॉ. #जितेंद्र #गायकवाड* यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* प्रा.सोनाली कांबळे यांनी तर *आभार* प्रा.मीना ढगे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज बी.अंधोरीकर,कला विभागप्रमुख डॉ.अर्चना धनवे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.प्रियंका गोमचाळे, NSS कार्यक्रमाधिकारी प्रा.बळीराम मोठेराव, प्रा.ऋषिकेश साके,श्री.दयानंद भारती, श्री.परशुराम तिवारी,श्री.परमेश्वर लवटे, गणेश लवटे, अजय सांडूर यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

 #ब्रिलीयंटमध्ये  #भारतरत्न  #डॉ. #बाबासाहेब  #आंबेडकर  #यांना  #अभिवादन लातूर :- येथील ब्रीलीयंट महाविद्यालय (सायंकाळचे...
06/12/2024

#ब्रिलीयंटमध्ये #भारतरत्न #डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर #यांना #अभिवादन

लातूर :- येथील ब्रीलीयंट महाविद्यालय (सायंकाळचे),लातूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताला प्रगतीशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयाचे #प्रभारी #प्राचार्य #प्रा. #युवराज #अंधोरीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बळीराम मोटेराव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ.शिवेश्वर मुचाटे, डॉ.अर्चना धनवे, प्रा.प्रियंका गोमचाळे, प्रा.मनाली आगलावे, प्रा.ऋषिकेश साके,प्रा.मीना ढगे, प्रा.धनराज मस्के, श्री धनराज पडिले,श्री.परमेश्वर लवटे,श्री.अजय सांडूर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 #संविधानाचे  #जतन  #करणे  #हे  #भारतीय  #नागरिकाचे  #कर्तव्य  -  #डॉ.  #जनार्दन  #वाघमारे* लातूर :  येथील * #विद्यार्थी...
28/09/2024

#संविधानाचे #जतन #करणे #हे #भारतीय #नागरिकाचे #कर्तव्य - #डॉ. #जनार्दन #वाघमारे*

लातूर : येथील * #विद्यार्थी #सहाय्यक #मंडळ, #लातूर* व अभिनव ग्रामीण विकास सेवाभावी संस्था शिवनखेड संचालित * #ब्रिलियंट महिला वाणिज्य #महाविद्यालय, लातूर* यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात एक दिवसीय " *भारतीय संविधान" या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.* या चर्चासत्राचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे माजी कुलगुरू, *माजी खासदार मा. डॉ. जनार्दन वाघमारे* यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *संस्थाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील* , स्वागताध्यक्ष *सी.ए संभाजी सरडे* होते. यावेळी मंचावर थोर विचारवंत *डॉ.नागोराव कुंभार,* शैक्षणिक संचालक *प्राचार्य.डॉ.पी.एन.सगर* विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव *डॉ.नागनाथ मोठे* यांनी केले.तर अध्यक्ष पद मा. प्राचार्य .एकनाथ पाटील यांनी भूषवले कार्यक्रमास प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार , संस्थेचे सचिव सी .ए संभाजी सरडे, शैक्षणिक संचालक डॉ.पी .एन .सगर, *प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज अंधोरिकर* व विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे डॉ. मन्मथ भातांब्रे, प्रा. बालाजी पळसकर, प्रा. अनिरुद्ध साळुंखे, डॉ.सुनिता गिरवलकर, प्रा. फ.मु.शहाजिंदे ,श्री. विक्रम कदम , प्रा.ओमप्रकाश होळीकर ,ग्रंथ मित्र पांडुरंग अडसुळे व इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. *प्रास्ताविक* विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ.नागनाथ मोठे यांनी केले. जगामध्ये भारतात सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतीय संविधान हे लोकशाही, न्याय आणि समानतेचा आधारस्तंभ असल्यामुळे संविधानाचे जतन करणे हे भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहेअसे मत यावेळी उदघाटक डॉ.जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले. चर्चासत्राच्या *पहिल्या सत्रात* "भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार" या विषयावर प्राध्यापक *डॉ. राजशेखर सोलापुरे* यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर या सत्राच्या अध्यक्षा *प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे* या होत्या. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात "भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे" या विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर चे *प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे* यांच्या अध्यक्षतेखाली *डॉ. संतोष पाटील* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप सत्र शैक्षणिक संचालक डॉ. पी .एन .सगर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.नागोराव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. चर्चासत्रात सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .तसेच कुमारी सोमवंशी मोनिका, कल्याणकर ऋषिकेश, प्रज्वल जाजे ,अजय राऊत ,अंबादास कोकाटे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* प्रा. बळीराम मोठेराव, प्रा.सोनाली कांबळे,प्रा.प्रियंका गोमचाळे व प्रा.मीना ढगे यांनी केले तर *आभार* प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज अंधोरीकर यांनी मानले.या कार्यक्रमास डॉ.अर्चना धनवे,डॉ .जितेंद्र गायकवाड ,प्रा. ऋषिकेश साके,डॉ .शिवेश्वर मुचाटे ,प्रा.मनाली आगलावे ,प्रा.ज्योती तांदळे,श्री.धनराज पडिले ,श्री.सिद्धार्थ जवळेकर, श्री.वृषल ढेपे, श्री.प्रशांत तिवारी , श्री.परमेश्वर लवटे,दयानंद भारती,अजय सांडूर ,दत्ता लवटे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 #ब्रिलियंटमध्ये  #आचार्य  #चाणक्य  #कौशल्य  #विकास  #केंद्राचा"  #शुभारंभलातूर : (२० सप्टेंबर २०२४) येथील लोकमाता अहिल्...
20/09/2024

#ब्रिलियंटमध्ये #आचार्य #चाणक्य #कौशल्य #विकास #केंद्राचा" #शुभारंभ
लातूर : (२० सप्टेंबर २०२४) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित *ब्रिलियंट महाविद्यालय (सायंकाळचे)* येथे आज महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाच्या " *आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे"* #मा. #प्रधानमंत्री #श्री. #नरेंद्र #मोदी यांच्या #शुभहस्ते तसेच मा.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मा. #मुख्यमंत्री #श्री. #एकनाथ #शिंदे, मा.केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, श्री.अजित पवार व कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाचे मंत्री श्री.मंगलप्रभा लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत #ऑनलाईन #प्रणालीद्वारे #उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. लोकप्रतिनिधी,संचालक मंडळ, प्राध्यापक, सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी कार्यक्रमाचे सेमिनार हॉल मध्ये मोठ्या स्मार्टबोर्ड वर थेट प्रक्षेपण केले. कार्यक्रमासाठी निरीक्षक म्हणून लातूर जिल्हा कौश्यल्य केंद्राच्या वरिष्ठ लिपिक सौ.देशमुख बबिता व लातूर तहसील कार्यालयातून सौ.अकोले ए.एन या उपस्थित होत्या.यावेळी संस्थाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील, सचिव सी.ए संभाजी सरडे, सी.ए दिगंबर साके, शैक्षणिक संचालक डॉ.पी.एन सगर, महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य प्रा.युवराज बी.अंधोरीकर,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.बळीराम मोटेराव, डॉ.अर्चना धनवे, प्रा.प्रियंका गोमचाळे, प्रा.ऋषिकेश साके, प्रा.मनाली आगलावे, प्रा.सोनाली कांबळे, प्रा.मीना ढगे, प्रा.दीपाली लहाने, प्रा.वर्ष चाटे, श्री.धनराज पडिले, श्री.दयानंद भारती, श्री.परशुराम तिवारी,प्रा.परमेश्वर लवटे, श्री.गणेश लवटे, अजय सांडूर, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

* #ब्रिलियंट  #महाविद्यालयामध्ये #  #शिक्षक  #दिन  #साजरा  #लातूर #: (५ सप्टेंबर २०२४) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेब...
05/09/2024

* #ब्रिलियंट #महाविद्यालयामध्ये # #शिक्षक #दिन #साजरा

#लातूर #: (५ सप्टेंबर २०२४) येथील लोकमाता अहिल्यादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट महाविद्यालय लातूर येथे महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक प्राचार्य #डॉ. #पी. #एन #सगर* यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी प्राचार्य * #प्रा. #युवराज #बी. #अंधोरीकर* यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कै. प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख #प्रा. #भगवान #सुरकुटे हे लाभले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते #डॉ. #सर्वपल्ली #राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य युवराज बी. अंधोरीकर यांनी केले. प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दांनी ज्ञान वाढवणारा तत्त्वातून मूल्य फुलणाऱ्या शिक्षकांचा आजच्या विद्यार्थ्यांनी आदर करावा तसेच विद्यार्थ्यांनी आपले प्रथम गुरू आई व वडील यांचा नेहमी आदर करावा. मोबाईल चा योग्य वापर करावा तसेच आजची वेळ नंतर येत नसते त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा असे मत प्रमुख पाहुणे प्रा. भगवान सुरकुटे यांनी मांडले. डॉ.पी.एन सगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शिक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक असून, विद्यार्थ्यांना अखंड ज्ञानाची सुदृढ देणारा गुरु असतो असे मत मांडून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे #सूत्रसंचालन* प्रा. सोनाली कांबळे व बी.कॉम तृतीय वर्षातील विद्यार्थीनी उजगिरे स्नेहा, धुमनसुरे निकिता* यांनी तर #आभार शेख मासूम या बी.कॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने मानले.या कार्यक्रमास वाणिज्य विभागप्रमुख प्रा. प्रियंका गोमचाळे, कला विभागप्रमुख डॉ.अर्चना धनवे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. मनाली आगलावे, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. बळीराम मोटेराव, आयक्युएसी सेल समन्वयक डॉ.शिवेश्वर मुचाटे, डॉ.जितेंद्र गायकवाड, प्रा. ऋषीकेश साके, प्रा. ज्योती तांदळे,प्रा.मीना ढगे, प्रा. धनराज मस्के, श्री.परशुराम तिवारी, श्री.दयानंद भारती, श्री. परमेश्वर लवटे, गणेश लवटे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिने  १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या "मिशन पॅरिस"ची दमदार सुरूवा...
29/07/2024

भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या "मिशन पॅरिस"ची दमदार सुरूवात केली. नेमबाजीत ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू म्हणून मनू भाकरने रचलेला इतिहास तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
अभिनंदन..!

 #ब्रिलीयंटमध्ये  #लोकमान्य  #टिळक  #जयंती  #साजरीलातूर : ( २३ जुलै २०२४) येथील अभिनव ग्रामीण विकास सेवाभावी संस्था, शिव...
23/07/2024

#ब्रिलीयंटमध्ये #लोकमान्य #टिळक #जयंती #साजरी
लातूर : ( २३ जुलै २०२४) येथील अभिनव ग्रामीण विकास सेवाभावी संस्था, शिवनखेड संचलित ब्रिलीयंट महिला वाणिज्य महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागाच्या वतीने "स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून देणारे, गणेशोत्सवाचे जनक, थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्र.प्राचार्य प्रा. युवराज बी.अंधोरीकर, विज्ञान विभागप्रमुख प्रा. मनाली आगलावे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. प्रियंका गोमचाळे, डॉ.अर्चना धनवे, प्रा.बळीराम मोटेराव, प्रा. ऋषीकेश साके, प्रा. दीपक पाटे, प्रा. मीनल ढगे, श्री.दयानंद भारती, श्री.परमेश्वर लवटे आदी कर्मचारी उपस्थित होते.

19/07/2024
          : 2024-25.    on following mobile numbers Mr.Eknath Patil (President) : 9423347200Dr.P.N Sagar (Academic Direc...
02/06/2024

: 2024-25.

on following mobile numbers

Mr.Eknath Patil (President) : 9423347200

Dr.P.N Sagar (Academic Director): 8999482960

Mr.Yuvraj B.Andhorikar (I/C Principal): 8208248593

Mr.Vrushal Dhepe (Clerk): 8999512112

Address

Mayurban Colony, Ambajogai Road
Latur
413531

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918208248593

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brilliant Mahavidyalaya, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Brilliant Mahavidyalaya, Latur:

Shortcuts

Share