Dayanand Law Alumni Association,Latur

Dayanand Law Alumni Association,Latur Dayanand Law Alumni Association,Latur

16/08/2025
दयानंद विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्नदयानंद विधी महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२३ मंगळवारी मान्यवर अतिथीं...
06/09/2023

दयानंद विधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
दयानंद विधी महाविद्यालयात ५ सप्टेंबर २०२३ मंगळवारी मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला . दयानंद विधी महाविद्यालय तथा माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा.आर.वाय.शेख सर हे उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॅा.पूनम नाथानी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर दयानंद विधी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी ॲड.तेजस्वी जाधव(अध्यक्षा),ॲड.नरेश कुलकर्णी( उपाध्यक्ष),ॲड.निलेश मुचाटे (सचिव),ॲड. राजेंद्र लातूरकर (सहसचिव) ,ॲड.ओम पेन्सलवार (कोषाध्यक्ष ) , लातूर जिल्हा विधीज्ञ मंडळाचे सचिव ॲड.प्रदीपसिंह गंगणे आणि मार्गदर्शक समन्वयक प्रा.डॅा. एन.डी.जाधव हे उपस्थित होते.या समारंभात दयानंद विधी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची न्यायाधीश, सहाय्यक सरकारी वकील,विधी सेवा प्राधिकरण, बालकल्याण समिति ,प्राचार्य, विद्यापीठ सिनेट सदस्य , जिल्हधिकारी स्वीस सहायक व विविध संस्थांवर कायदेविषयक सल्लागार आदी क्षेत्रात निवड झाल्यामुळे त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बुके, शाल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या समारंभाचे प्रमुख अतिथी माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. आर. वाय .शेख यांनी आपल्या भाषणात दयानंद विधी महाविद्यालय , महाविद्यालयातील भूतकालीन प्राध्यापक,तत्कालीन शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांची जडणघडण या बाबतीतील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्या डॅा. पूनम नाथानी यांनी दयानंद विधी महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेचे महाविद्यालयाच्या प्रगतीशील वाटचालीतील अनुबंध अघोरेखित केला. या समारंभाचे प्रास्ताविक सचिव ॲड. निलेश मुचाटे यांनी केले. समारंभात संघटनेचे पदाधिकारी ॲड. तेजस्वी जाधव ,ॲड नरेश कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली . माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा.डॅा.एन.डी.जाधव यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यात्मक प्रगतीचा सविस्तर लेखाजोखा मांडला.ॲड.प्रदीपसिंह गंगणे यांच्या ऋणनिर्देशानंतर समारंभाची सांगता झाली.सूत्रसंचालन ॲड. राजेंद्र लातूरकर यांनी केले.

05/09/2023

दयानंद विधी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://youtube.com/live/zeoKHi4t8pY?feature=share

04/09/2023

Address

Latur
413512

Telephone

+919764124125

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dayanand Law Alumni Association,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share