VNB English School, Latur

VNB English School, Latur Quality Education

पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण, गौर द्वारा संचलितव्ही. एन. बी. इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस, लातूर यांच्या वतीने७७ वा प्र...
27/01/2026

पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण, गौर द्वारा संचलित
व्ही. एन. बी. इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस, लातूर यांच्या वतीने
७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

📍 संभाजी नगर, कव्हा रोड, लातूर
🗓️ दि. २७ जानेवारी २०२६

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण, गौर यांच्या वतीने संचलित व्ही. एन. बी. इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस, लातूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. विक्रम नामदेवराव बोरोळे (माजी सरपंच, गौर) हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री. अरविंद सावंत (तंटामुक्ती अध्यक्ष, गौर), सुभेदार श्री. माधव परगे सर (माजी सैनिक, भारतीय सैन्य दल) उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणून श्री. विठ्ठल डबडे काका, श्री. गणेश शहाणे काका, शितोळे काका, श्री. मधुकर जाधव काका यांची उपस्थिती लाभली.
याशिवाय प्रा. प्रमोद उबाळे सर, श्री. वैभव कल्लेकर सर, रामनारायण निषाद सर हे मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ध्वजवंदनाने करण्यात आली. ध्वजवंदन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. बालाजी बोरोळे सर यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बोरोळे मॅडम यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन रेखा वडतिले मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमास रोहित जाधव, वैशाली जाधव, ज्योती भोसले मॅडम, तसेच पालक, विद्यार्थी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
VNB English School
Rudra Classes, Latur

01/02/2025
पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण,गौर द्वारा संचलित, व्ही एन बी इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस, लातूर यांच्या वतीने 76 व्या प्...
01/02/2025

पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण,गौर द्वारा संचलित, व्ही एन बी इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस, लातूर यांच्या वतीने 76 व्या प्रजासत्ताक दिन व बक्षीस वितरण मोठया उत्सवात संपन्न..!

📍 संभाजी नगर , कव्हा रोड, लातूर.
🗓️ दि.26 जानेवारी 2025

आज दि.26 जानेवारी 2025 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाण, गौर द्वारा संचलित व्ही एन बी इंग्लिश स्कूल व रुद्रा क्लासेस लातूर यांच्या वतीने
प्रजासत्ताक दिन व मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पार्वतीनाम विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री विक्रम नामदेवराव बोरोळे माजी सरपंच, गौर व प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार श्री माधव परगे सर माजी सैनिक भारतीय सैन्य दल ज्येष्ठ नागरिक विठ्ठल डबडे काका, गणेश शहाणे काका, शितोळे काका,श्री वैभव कल्लेकर सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व झेंडावंदन करण्यात आले व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊ देण्यात आला व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री बालाजी बोरोळे सर व सूत्रसंचालन शुभांगी रेड्डी मॅडम यांनी केले तसेच संचालिका प्रणिता बोरोळे मॅडम व महानंदा चांमलवाड तथा नागरिक महिला
मोठया संख्येने उपस्थित होते.
VNB English School
Rudra Classes.

27/12/2024

Upcoming New Year 2025 Activity Made by VNB English School Students......... Happy New Year 2025.

03/12/2024

Today's Activity it's all about Balance & Concentration of Mind...........winer
Name - Abijit Darshane

02/12/2024

Today Activity Sangit Khurchi........
Winer Name - Arush Jadhav

Happy Diwali 🪔🪔🪔🪔🪔🪔
23/10/2024

Happy Diwali 🪔🪔🪔🪔🪔🪔

VNB English School , Latur ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग बैलपोळ्या निमित्त मातीची बैल स्पर्धा व गणेश उत्सवानिमित्त मातीची गणेश...
03/09/2024

VNB English School , Latur

ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग
बैलपोळ्या निमित्त मातीची बैल स्पर्धा व गणेश उत्सवानिमित्त मातीची गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
मातीचा बैल स्पर्धा
प्रथम क्रमांक
1) विराज कंटे
गणेश मूर्ती स्पर्धा
प्रथम क्रमांक
1) स्वराली शहाणे

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा संपन्न
28/08/2024

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा संपन्न

रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! VNB English School
21/08/2024

रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
VNB English School

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VNB English School, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category