यश करीअर अकँडमी

यश करीअर अकँडमी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from यश करीअर अकँडमी, Education, रघुनाथ पाटील कॉलनी, Lasur.

29/10/2016

शुभ दिपावली

31/10/2015

IPS Officer Vishwas Nangre Patil
यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू:-

कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू
आपल्या वाट्याला आला तर.?

१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"

Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..

"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"

Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)

ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?

Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)

तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)

(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?

या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.

Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)

उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?

Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..

‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?

‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.

उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"

Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?

त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.

तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.!

नक्की शेयर करा आणि आपल्या मित्रांनाही वाचू दया

09/10/2015

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2015 :

ऑक्टोबर 2015 महिन्यामध्ये या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. या लेखामध्ये आम्ही वैद्यकशास्त्रात मिळालेल्या नोबेल पुरस्काराची माहिती देत आहोत.



'गुणसूत्रांतील दुरुस्तीचा तांत्रिक अभ्यास' याविषयीच्या संशोधनासाठी स्वीडनचे संशोधक थॉमस लिंडाल, अमेरिकेचेपॉल मॉड्रीच व अमेरिकन-तुर्कीश शास्त्रज्ञ अझीज सॅंसरयांना या वर्षीचा रसायनशास्त्रातील "नोबेल" पारितोषिक जाहीर झाले आहे.
गुणसूत्रांतील दुरुस्तीच्या तांत्रिक अभ्यासामुळे जीवित पेशींच्या कार्यपद्धतीविषयीची मूलभूत माहिती जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
कर्करोगाच्या उपचारांसहित इतर बाबींमध्ये सुधारणा होण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे रॉयल स्विडीश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
लिंडाल (वय 77) हे फ्रान्सिस क्रीक इन्स्टिट्यूट या संस्थेचे प्रमुख व ब्रिटनस्थित क्‍लॅरे हॉल लॅबोरेटरीमधील कर्करोग संशोधन विभागाचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.
तर मॉड्रीच हे सध्या हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक असून, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना प्रांतातील ड्युरहॅममधील ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडीसीन येथे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
तसेच नॉर्थ कॅरोलीना प्रातांतील चॅपेल हिल भागातील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये सॅंसर (69) प्राध्यापक आहेत.

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2015 :

ऑक्टोबर 2015 महिन्यामध्ये या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. या लेखामध्ये आम्ही भौतिकशास्त्रात मिळालेल्या नोबेल पुरस्काराची माहिती देत आहोत.



न्यूट्रिनों कणांविषयी सखोल ज्ञान देणाऱ्या संशोधनासाठी जपानचे ताकाकी काजिता व कॅनडाचे आर्थर मॅकडोनल्ड यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.
न्यूट्रिनो कणांचे गुणधर्म रंग बदलणाऱ्या थॉमेलिऑन सरडय़ासारखे बदलत असतात व त्यांचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते, असे या अभ्यासकांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले.
काजिता व मॅकडोनल्ड यांनी अनुक्रमे सुपर कामियोकँडे डिटेक्टर (जपान) व सडबरी न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी (कॅनडा) येथे संशोधन केले आहे
विजेत्यांना 80 लाख क्रोनर म्हणजे 9 लाख 60 हजार अमेरिकी डॉलर्स विभागून मिळणार आहेत.

ताकाकी काजिता :

काजिता (वय 56) हे टोकियो विद्यापीठात प्राध्यापक असून 'इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मिक रे रीसर्च' या संस्थेचे संचालक आहेत.
1998 मध्ये काजिता यांनी न्यूट्रिनो कण पकडले होते व वातावरणामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला होता
2002 मधील नोबेल विजेते मासतोशी कोशिबा यांचे विद्यार्थी आहेत. कोशिबा यांचे संशोधनही न्यूट्रिनोवरच आहे.

आर्थर मॅकडोनल्ड :

मॅक्‌डोनाल्ड (72) हे कॅनडातील किंग्स्टनमधील क्विन्स विद्यापीठात "प्रार्टिकल फिजिक्‍स"चे प्राध्यापक आहेत

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2015 :

ऑक्टोबर 2015 महिन्यामध्ये या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे. या लेखामध्ये आम्ही वैद्यकशास्त्रात मिळालेल्या नोबेल पुरस्काराची माहिती देत आहोत.



मानवी शरीरामध्ये असलेल्या परजीवी कृमींवर उपचार शोधून काढणारे आर्यलडचे विल्यम कॅम्पबेल, जपानचे सातोशी ओमुरा आणि चीनच्या श्रीमती योउयू तू यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल यंदाच्या वर्षी (2015) जाहीर करण्यात आले आहे.
साडेनऊ लाख अमेरिकी डॉलर आणि सन्मानचिन्हअसे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ओमुरा आणि कॅम्पबेल यांनी परजीवींमार्फत होणारे संक्रमण रोखण्यासाठी उपचारपद्धती विकसित केली, तर युयु तू यांनी मलेरियावरील नव्या उपचारांवर संशोधन केले आहे.

युयु तू :

मलेरियासाठी तयार करण्यात आलेल्या आर्टेमिसाईनिन आणि हायड्रोआर्टेमिसाईनिन या औषधांची निर्मिती युयु तू यांनी केली आहे. या औषधांमुळे दक्षिण आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा झाली. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये तू यांच्या संशोधनाचा समावेश केला जातो. यासाठीच त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात येत आहे. तू यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल 2011 मध्ये लॅस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. विशेष म्हणजे चीनमधील पारंपरिक औषधी वनस्पतींच्या आधाराने त्यांनी संशोधन केले.
चिनी संशोधक असलेल्या यांनी बीजिंग वैद्यकीय विद्यापीठातून 1955 मध्ये पदवी मिळविली. त्या 1965 पासून 1978 पर्यंत चायना ऍकॅडमी ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये सहायक प्राध्यापक होत्या. त्यानंतर 2000 पासून त्या त्याच संस्थेत मुख्य प्राध्यापक आहेत.

ओमुरा :

ओमुरा हे बायोकेमिस्ट आहेत. त्यांनी व कॅम्पबेल यांनी परजीवींपासून होणारे संक्रमण रोखण्यासाठी औषधांमध्ये सूक्ष्मजीवांचा (मायक्रोऑरग्यानिजम) वापर करण्याची पद्धती विकसित केली. "रिव्हर ब्लाइंडनेस" (नदी पात्रात वाढणाऱ्या काळ्या माशा चावल्याने येऊ शकणारे अंधत्व) आणि "लिंफॅटिक फिलारिऍसिस" या दोन रोगांवरील औषधे तयार करण्यासाठीची पद्धती त्यांनी विकसित केली.
टोकियो विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्समध्ये पीएचडी मिळविणारे सतोशी ओमुरा यांनी 1965 ते 1971 या कालावधीत किटासातो इन्स्टिट्यूटमध्ये काम केले, तसेच किटासातो विद्यापीठात 1975 ते 2007 पर्यंत प्राध्यापकपदी काम केले. सध्या ते तेथेच मानद प्राध्यापक आहेत

कॅम्पबेल :

कॅम्पबेल यांचा जन्म 1930 मध्ये झाला. त्यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून "बीए"ची पदवी मिळविली. विस्कॉन्सिन्स विद्यापीठातून त्यांनी 1957 मध्ये "पीएचडी" पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी 1957 ते 1990 या कालावधीत मर्क इन्स्टिट्यूट फॉर थेरॅप्युटिक रिसर्चमध्ये काम केले. सध्या ते अमेरिकेतील ड्रू विद्यापीठात "रिसर्च फेलो एमिरेट्‌स" आहेत.

02/09/2015

पाहूया श्रीकृष्ण काय म्हणतो.

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला.
पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुध्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वताची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने फिरला.. त्याने पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा!!

भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच कराव लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं.

अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत अर्जुनातर्फे लढाई केली नाही. श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तर त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा driver बनला. अर्जुनाला स्वताची लढाई स्वतालाच करायला लावली.

ह्या कृतीतून संदेश दिला कि जर तुम्ही स्वताचा संघर्ष करायला स्वत सज्ज झालात तर मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा driver बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.

कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.

अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही... शस्त्र खाली टाकू नका

प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही.

तुमची स्वप्न फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वताची लढाई स्वत:च लढा !

02/08/2015

Important formulae

(α+в+¢)²= α²+в²+¢²+2(αв+в¢+¢α)
1. (α+в)²= α²+2αв+в²
2. (α+в)²= (α-в)²+4αв b
3. (α-в)²= α²-2αв+в²
4. (α-в)²= f(α+в)²-4αв
5. α² + в²= (α+в)² - 2αв.
6. α² + в²= (α-в)² + 2αв.
7. α²-в² =(α + в)(α - в)
8. 2(α² + в²) = (α+ в)² + (α - в)²
9. 4αв = (α + в)² -(α-в)²
10. αв ={(α+в)/2}²-{(α-в)/2}²
11. (α + в + ¢)² = α² + в² + ¢² + 2(αв + в¢ + ¢α)
12. (α + в)³ = α³ + 3α²в + 3αв² + в³
13. (α + в)³ = α³ + в³ + 3αв(α + в)
14. (α-в)³=α³-3α²в+3αв²-в³
15. α³ + в³ = (α + в) (α² -αв + в²)
16. α³ + в³ = (α+ в)³ -3αв(α+ в)
17. α³ -в³ = (α -в) (α² + αв + в²)
18. α³ -в³ = (α-в)³ + 3αв(α-в)

ѕιη0° =0
ѕιη30° = 1/2
ѕιη45° = 1/√2
ѕιη60° = √3/2
ѕιη90° = 1
¢σѕ ιѕ σρρσѕιтє σƒ ѕιn

тαη0° = 0
тαη30° = 1/√3
тαη45° = 1
тαη60° = √3
тαη90° = ∞
¢σт ιѕ σρρσѕιтє σƒ тαη

ѕє¢0° = 1
ѕє¢30° = 2/√3
ѕє¢45° = √2
ѕє¢60° = 2
ѕє¢90° = ∞
¢σѕє¢ ιѕ σρρσѕιтє σƒ ѕє¢

2ѕιηα¢σѕв=ѕιη(α+в)+ѕιη(α-в)
2¢σѕαѕιηв=ѕιη(α+в)-ѕιη(α-в)
2¢σѕα¢σѕв=¢σѕ(α+в)+¢σѕ(α-в)
2ѕιηαѕιηв=¢σѕ(α-в)-¢σѕ(α+в)

ѕιη(α+в)=ѕιηα ¢σѕв+ ¢σѕα ѕιηв.
» ¢σѕ(α+в)=¢σѕα ¢σѕв - ѕιηα ѕιηв.
» ѕιη(α-в)=ѕιηα¢σѕв-¢σѕαѕιηв.
» ¢σѕ(α-в)=¢σѕα¢σѕв+ѕιηαѕιηв.
» тαη(α+в)= (тαηα + тαηв)/ (1−тαηαтαηв)
» тαη(α−в)= (тαηα − тαηв) / (1+ тαηαтαηв)
» ¢σт(α+в)= (¢σтα¢σтв −1) / (¢σтα + ¢σтв)
» ¢σт(α−в)= (¢σтα¢σтв + 1) / (¢σтв− ¢σтα)
» ѕιη(α+в)=ѕιηα ¢σѕв+ ¢σѕα ѕιηв.
» ¢σѕ(α+в)=¢σѕα ¢σѕв +ѕιηα ѕιηв.
» ѕιη(α-в)=ѕιηα¢σѕв-¢σѕαѕιηв.
» ¢σѕ(α-в)=¢σѕα¢σѕв+ѕιηαѕιηв.
» тαη(α+в)= (тαηα + тαηв)/ (1−тαηαтαηв)
» тαη(α−в)= (тαηα − тαηв) / (1+ тαηαтαηв)
» ¢σт(α+в)= (¢σтα¢σтв −1) / (¢σтα + ¢σтв)
» ¢σт(α−в)= (¢σтα¢σтв + 1) / (¢σтв− ¢σтα)
α/ѕιηα = в/ѕιηв = ¢/ѕιη¢ = 2я

» α = в ¢σѕ¢ + ¢ ¢σѕв
» в = α ¢σѕ¢ + ¢ ¢σѕα
» ¢ = α ¢σѕв + в ¢σѕα
» ¢σѕα = (в² + ¢²− α²) / 2в¢
» ¢σѕв = (¢² + α²− в²) / 2¢α
» ¢σѕ¢ = (α² + в²− ¢²) / 2¢α

» Δ = αв¢/4я
» ѕιηΘ = 0 тнєη,Θ = ηΠ
» ѕιηΘ = 1 тнєη,Θ = (4η + 1)Π/2
» ѕιηΘ =−1 тнєη,Θ = (4η− 1)Π/2
» ѕιηΘ = ѕιηα тнєη,Θ = ηΠ (−1)^ηα

1. ѕιη2α = 2ѕιηα¢σѕα
2. ¢σѕ2α = ¢σѕ²α − ѕιη²α
3. ¢σѕ2α = 2¢σѕ²α − 1
4. ¢σѕ2α = 1 − ѕιη²α
5. 2ѕιη²α = 1 − ¢σѕ2α
6. 1 + ѕιη2α = (ѕιηα + ¢σѕα)²
7. 1 − ѕιη2α = (ѕιηα − ¢σѕα)²
8. тαη2α = 2тαηα / (1 − тαη²α)
9. ѕιη2α = 2тαηα / (1 + тαη²α)
10. ¢σѕ2α = (1 − тαη²α) / (1 + тαη²α)
11. 4ѕιη³α = 3ѕιηα − ѕιη3α
12. 4¢σѕ³α = 3¢σѕα + ¢σѕ3α

» ѕιη²Θ+¢σѕ²Θ=1
» ѕє¢²Θ-тαη²Θ=1
» ¢σѕє¢²Θ-¢σт²Θ=1
» ѕιηΘ=1/¢σѕє¢Θ
» ¢σѕє¢Θ=1/ѕιηΘ
» ¢σѕΘ=1/ѕє¢Θ
» ѕє¢Θ=1/¢σѕΘ
» тαηΘ=1/¢σтΘ
» ¢σтΘ=1/тαηΘ
»

28/07/2015
25/07/2015

" यशाचे फॉर्मुले"

१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे !!
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल

*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ??
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. सदगुरु , गुरु ,आईवडील इत्यादी
५) नाष्टा, जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर ,अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) टी.व्ही. व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा. विचार करा...
पटले तर कृती कर

23/07/2015

" कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते."
"जीवनात अनंत अडचणी असतात,पण ओठांवर हास्य ठेवा, कारण...
कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे..."
🌹🌹 शुभ प्रभात 🌹🌹

20/07/2015

# गणित : महत्त्वाची सूत्रे=>
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.
दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.
E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या
प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.
गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/५
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/५
D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २
सरासरी
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २
सरळव्याज
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>
नफा-तोटा
A)नफा =विक्री- खरेदी,
B)विक्री = खरेदी + नफा,
C)खरेदी = विक्री+ तोटा,
D)तोटा = खरेदी - विक्री
E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
G)विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००
H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)
==============================

30/06/2015

Address

रघुनाथ पाटील कॉलनी
Lasur
431110

Telephone

9595044789

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when यश करीअर अकँडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to यश करीअर अकँडमी:

Shortcuts

Share

Category