02/08/2020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=135958594845745&id=103536294754642
दि.१ आॅगस्ट २०२०
प्रति,
माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
माननीय श्री.एकनाथजी शिंदे साहेब
मंत्री,नगर विकास, महाराष्ट्र राज्य
मान.प्रा.वर्षाताई गायकवाड महोदया
मंत्री,शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य
विषय:- कोविड कामकाजाच्या नावाखाली सुरु असलेली शिक्षकांची पिळवणूक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविणे बाबत.
महोदय,महोदया,
आदरपूर्वक नमस्कार.
आज मितीस ठाणे,नवी मुंबई, भिवंडी, कल्याण या दाट लोकवस्ती असलेल्या महापालिका क्षेत्रांमध्ये रस्त्यांवर व दारोदार कोविडचे काम करणारा फक्त एकच घटक दिसत आहे तो म्हणजे “शिक्षक”! शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 24 जून 2020 च्या परिपत्रकान्वये कोविड कामकाजावरील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असतानाही शिक्षकांना कार्यमुक्त तर केले नाहीच उलट आणखी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना “लोकशाही” संकल्पना शिकवणाऱ्या शिक्षकांना हाच प्रश्न पडला आहे की लोकशाही राज्यात शासन मोठे की प्रशासन?
दि.24 जून 2020 च्या परिपत्रकानुसार शासन निर्देश देत आहे की, शिक्षकांनी वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचे काम करा. तर प्रशासनातील अधिकारी म्हणतात की, शिक्षणापेक्षा कोविडचे काम महत्त्वाचे आहे ते करा. शासन आणि प्रशासनाने एकदा ठरवा की शिक्षण महत्त्वाचे की सर्वेक्षण?
कोविड कामकाजाकरिता सेवा अधिग्रहीत करून शासनाने शिक्षकांना कामाला जुंपण्याचे केलेले नियोजन म्हणजे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे उदाहरण आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत काम करणारे अनेक शिक्षक व शिक्षिका केविलवाण्या अवस्थेत काम करीत आहेत. शिक्षक बंधू,भगिनींच्या काही कौटुंबिक, आजारांसंबंधी शारीरिक व प्रवासाच्या अडचणी आहेत. पण कोणीही त्या ऐकून घेत नाही. या शिक्षकांना कामकाजा करिता कोणतीही सुरक्षेची साधने नाहीत.
साथ नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता यांची कलमे दाखवून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली की शिक्षक बरोबर हजर होतात ही प्रशासनाची मानसिकता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात किती शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता किती प्रमाणात शिक्षक घ