शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा

  • Home
  • India
  • Kurkheda
  • शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार व सर्वांगीण विकासासाठी समर्पित आश्रमशाळा

9th class मध्ये 1 ट्यूबलाईट लावण्यात आला.
27/08/2026

9th class मध्ये 1 ट्यूबलाईट लावण्यात आला.

आज शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या वेळेत तसेच अभ्यासाच्या वेळेत शिस्त, उपस्थिती व सुरक्षेच्या दृष्टीने विशेष देखरेख ...
26/08/2026

आज शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या वेळेत तसेच अभ्यासाच्या वेळेत शिस्त, उपस्थिती व सुरक्षेच्या दृष्टीने विशेष देखरेख ठेवण्यात आली. भोजन व अभ्यास पाळीची जबाबदारी विरुटकर सर, मारबते सर व घुमरे सर यांनी पार पाडली. त्यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती, भोजनातील शिस्त, स्वच्छता तसेच अभ्यासाच्या वेळी शांतता व नियमित अभ्यास याबाबत आवश्यक देखरेख केली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भोजन करून नियोजित वेळेत अभ्यास केला.

26/08/2026
शाळेतील सिमेंट रोडवर शेवाळ साचल्यामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना घसरण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ...
25/08/2026

शाळेतील सिमेंट रोडवर शेवाळ साचल्यामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना घसरण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छता करण्यात आली.

मुलांच्या वसतिगृहातील तुटलेले नळ दिनांक 25/08/2026 रोजी नवीन नळ बसवून दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील पाणीपुरव...
25/08/2026

मुलांच्या वसतिगृहातील तुटलेले नळ दिनांक 25/08/2026 रोजी नवीन नळ बसवून दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

सायंकाळी शालेय समाप्तीच्या वेळी विद्यार्थ्यांकडून ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन घेण्यात आले. त्यानंतर शाळेच्या दैनंद...
25/08/2026

सायंकाळी शालेय समाप्तीच्या वेळी विद्यार्थ्यांकडून ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन घेण्यात आले. त्यानंतर शाळेच्या दैनंदिन कामकाजाची सांगता करण्यात आली.

25/08/2026

ग्रामपंचायत येंगलखेडा यांच्या वतीने शाळेतील दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दररोज कचरा संकलन वाहन (कचरा गाडी) शाळेत पाठविण्यात येत आहे. सदर वाहनामार्फत शाळेतील कचऱ्याचे नियमित संकलन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यास मदत होत आहे.

दिनांक 25/08/2026 रोजी विद्यार्थी आरोग्य उपचार नोंद :शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा येथील विद्यार्...
25/08/2026

दिनांक 25/08/2026 रोजी विद्यार्थी आरोग्य उपचार नोंद :

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा येथील विद्यार्थ्यांना दिनांक 25/08/2026 रोजी जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी नेण्यात आले.

1. आकाश रमेश हाडको, वर्ग 8 वी याच्यावर Tongue Tie (जिभेच्या समस्येसाठी) शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर व समाधानकारक असून त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या तो वसतिगृहात आहे.

2. इतर 3 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे USG तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची USG तपासणी सामान्य (Normal) आली असून आवश्यक औषधोपचार करण्यात आले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या समाधानकारक आहे.

कु. माही मडकाम, वर्ग – ३ री, रा. फाशीटोला, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांच्या पालकांशी संपर्क करण्यात आला. यावेळी कु. शिंद...
24/08/2026

कु. माही मडकाम, वर्ग – ३ री, रा. फाशीटोला, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांच्या पालकांशी संपर्क करण्यात आला. यावेळी कु. शिंदे मॅडम महिला अधिक्षीका यांनी आज भेट घेऊन पालक संपर्क साधला.

Address

YENGALKHEDA
Kurkheda
441209

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 12pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, येंगलखेडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category