D K Mahila Mahavidyalaya Kurkheda

D K Mahila Mahavidyalaya Kurkheda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from D K Mahila Mahavidyalaya Kurkheda, Campus Building, Kurkheda.

 #सुवर्णसंधी    #सुवर्णसंधीडि.के.महिला महाविद्यालय, कुरखेडायेथे प्रवेश देणे सुरू आहे.१२ वी पास विद्यार्थिनींना सुवर्णसंध...
21/08/2021

#सुवर्णसंधी #सुवर्णसंधी
डि.के.महिला महाविद्यालय, कुरखेडा
येथे प्रवेश देणे सुरू आहे.
१२ वी पास विद्यार्थिनींना सुवर्णसंधी
शैक्षणिक सत्र 2021 - 22
बी.एस्सी. गृहविज्ञान शाखेत
प्रवेश देणे सुरू आहे.

डि. के. महिला महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.दि. ०८ मार्च २०२१ रोज सोमवारला डी. के. महिला महाविद्य...
11/03/2021

डि. के. महिला महाविद्यालय मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

दि. ०८ मार्च २०२१ रोज सोमवारला डी. के. महिला महाविद्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला महिला दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींच्या आरोग्याविषयी बॉडी मास इंडेक्स चाचण्या करण्यात आल्या आणि विद्यार्थिनीसाठी वक्तृत्व स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्या डॉ. पल्लवी एल. तागडे मॅडम व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीतर्फे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. तागडे मॅडम , प्रा. सांगोळे मॅडम, डॉ. शेंडे मॅडम, प्रा. कठाणे सर, प्रा. घाटबांधे सर, प्रा. शेंडे सर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कु. अश्विनी मेश्राम यांना प्रमुख पाहुण्या तर्फे पदवीप्रदान करण्यात आली. महाविद्यालयातर्फे स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. पिंकी तरार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले , तर आभार प्रदर्शन श्री. अनिल बोरकर सर यांनी केले. जागतिक महिला दिन महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिन व संत  रविदास महाराज  जयंती उत्साहात साजरी     आज दि. 27 फेब्रुवारी 2021 रोज शनिवारला  डी. कॆ. महिला...
27/02/2021

मराठी भाषा गौरव दिन व संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी
आज दि. 27 फेब्रुवारी 2021 रोज शनिवारला डी. कॆ. महिला महाविद्यालय, कुरखेडा येथे मराठी भाषा गौरव दिन तसेच संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक निर्देशक प्रा. कॆ. एम. कठाणे सर यांच्या हस्ते जेष्ठ कवी कुसुमाग्रज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कायक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. एल. तागडे मॅडम, प्रा.एस. बी. शेंडे सर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी     आज दि. 23 फेब्रुवारी 2021 रोज मंगळवारला डी. कॆ. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे...
23/02/2021

संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी
आज दि. 23 फेब्रुवारी 2021 रोज मंगळवारला डी. कॆ. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी एल. तागडे यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कठाणे सर, प्रा. सांगोळे मॅडम. प्रा. शेंडे सर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

२६ जानेवारी २०२१  प्रजासत्ताक  दिन साजरा करण्यात आला.डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक  दिन...
26/01/2021

२६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यकारी प्राचार्य डॉ. पल्लवी एल. तागडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरेकर मॅडम, खान मॅडम उपस्थित होते. प्रा. डॉ. शेंडे मॅडम , प्रा. कठाणे सर , प्रा. घाटबांधे सर , व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात पार पाळण्यात आला.

स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या थोर समाज सुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त !! विनम्र अभिवादन !!   ...
03/01/2021

स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या थोर समाज सुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त !! विनम्र अभिवादन !!

15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच ध्वजार...
15/08/2020

15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याप्रसंगी महाविद्यालयाचे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यकारी प्राचार्य डॉ. पल्लवी एल. तागडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. आरेकर मॅडम उपस्थित होते. प्रा. डॉ. शेंडे मॅडम , प्रा. कठाणे सर , प्रा. घाडबांधे सर , प्रा. शेंडे सर , सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्वतंत्र दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करून ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात पार पाळण्यात आला.

डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे ग्रंथालय दिन  डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील ग्रंथालय विभ...
13/08/2020

डी. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे
ग्रंथालय दिन डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील ग्रंथालय विभाग अंतर्गत डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजन करण्यात आली. ग्रंथालय विभागांतर्गत कार्यक्रम घेण्यात आले. त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कार्यकारी प्राचार्य डॉ. पल्लवी एल तागडे यांनी ग्रंथालय आणि डॉ. एस आर रंगनाथन यांच्याबद्दल सुरेख माहिती सांगितली. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. सुरज शेंडे सर यांनी ग्रंथालय आणि डॉ. रंगनाथन यांचे पाच पंचसूत्र याबद्दल सविस्तर माहिती सांगितले या कार्यक्रमास प्रा. डॉ. शेंडे मॅडम प्रा. कठाणे सर , प्रा. घाटबांधे सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

कारगिल विजय दिवसडि. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे २६ जुलै २०२० २१वी वर्षगाठ कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. तरी...
28/07/2020

कारगिल विजय दिवस

डि. के. महिला महाविद्यालय कुरखेडा येथे २६ जुलै २०२० २१वी वर्षगाठ कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. तरी उपस्थित सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शहीद जवानांना मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्याप्रसंगी स. प्राचार्य डॉ.तागडे मॅडम, प्राध्यापिका डॉ. शेंडे मॅडम, प्राध्यापक कठाणे सर, प्राध्यापक घाटबांधे सर, ग्रंथपाल शेंडे सर, शिक्षकेतर कर्मचारी अनिल बोरकर , संदीप लांजेवार , हेमकृष्ण कापगते, सूर्यकांत सोनवाणे, शीलवंत खोब्रागडे कार्यक्रमास कर्मचारी उपस्थित होते.

डी.के.महिला महाविद्यालय कुरखेडा जिल्हा - गडचिरोलीप्रवेशाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन/ऑफ़लाइन संपर्क कराप्रिय, विद्यार्थी मैत्रि...
27/07/2020

डी.के.महिला महाविद्यालय कुरखेडा जिल्हा - गडचिरोली

प्रवेशाच्या नोंदणीसाठी ऑनलाइन/ऑफ़लाइन संपर्क करा

प्रिय, विद्यार्थी मैत्रिणिनो

इयत्ता १२ वी च्या (HSC) परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐🌹

१२ वी नंतर पुढे काय?
कोरोना महामारीच्या काळात Admission कसे करायचे?
मुलींनी सुरक्षित वातावरणात उच्च शिक्षण कुठे घ्यायचे?
असे प्रश्न आपल्या व पालकांना भेडसावत आहेत. मात्र, काळजी करु नका. आपल्याच परिसरात B.Sc (Home Science) याचे गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणारे व विद्यार्थीनीच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने मागील सण २०१३ वर्षापासुन विविध उपक्रमाचे आयोजन करणारे फक्त महिलांसाठी एकमेव अनुदानित महाविद्यालय म्हणजे डि.के. महिला महाविद्यालय आहे. आपण B.Sc (Home Science) प्रवेशासाठी इच्छूक विदयार्थीनी ऑनलाइन नोंदणी केल्यास आपल्याला पुढे प्रवेशाची प्रक्रिया करणे अधिक सोईचे होईल. आपण आपली माहिती खाली दिलेल्या लिंकवर Online भरुन पाठवावी.

https://forms.gle/Ss1JQoJ4Ry4MTjr58

डॉ. पल्लवी एल. तागडे
कार्यकारी प्राचार्य
डि.के.महिला महाविद्यालय कुरखेडा
तालुका = कुरखेडा जिल्हा = गडचिरोली

प्रवेश संपर्कासाठी =
डि.के. महिला महाविद्यालय वडसा रोड कुरखेडा जिल्हा-गडचिरोली.
Email- [email protected]
मोबाईल नं. -
डॉ. पल्लवी एल. तागडे - 77670 50619
श्री. संदीप एन. लांजेवार - 90496 68334
श्री. अनिल एम. बोरकर - 75881 91947
श्री. सूर्यकांत ए. सोनवाने - 7744993351

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

23/07/2020

Address

Kurkheda
441209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when D K Mahila Mahavidyalaya Kurkheda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to D K Mahila Mahavidyalaya Kurkheda:

Shortcuts

Share