Antar Bharti Vidyalaya kurduwadi

Antar Bharti Vidyalaya kurduwadi Antar Bharati Vidyalaya is dream of Sane Guruji

23/09/2024

आंतरभारती विद्यालय कुर्डवाडी व भाग शाळा कुर्डू येथील सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आपल्यापैकी ज्यांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्याख्यान देण्याची इच्छा व वेळ असेल त्यांनी आपली नावे कळवावी त ही विनंती.............मुख्याध्यापक

23/09/2024

साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन ग्रामोदय समिती कुर्डूवाडी संचलित आंतरभारती विद्यालयाची स्थापना 1959 साली झाली. साने गुरुजींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, त्याचबरोबर गोरगरीब, श्रीमंत , शहरातील, खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने आंतरभारती ची सुरुवात झाली. व संस्थेचा तो उद्देशही सफल झाला. आज मोठमोठ्या पदावरती प्रशालेतील माझी विद्यार्थी कार्यरत आहेत व काही विद्यार्थी कार्यमुक्त ही झाले असतील. देशात परदेशात त्यांनी आपल्या प्रशालेत शिक्षण घेऊन नोकरीही करत असतील किंवा ते सेवामुक्तही झाले असतील.या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याची सुरुवात देखील केली त्याचबरोबर घेतलेल्या शिक्षणावर त्यांनी मोठमोठ्या पदावरती कार्य केले. ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये आपण येऊन भेट द्यावी असे आम्हाला वाटते. सर्व माझी विद्यार्थ्यांना विनंती की आपण प्रशालेमध्ये यावे व भेट देऊन आपला अभिप्राय द्यावा ही विनंती....... मुख्याध्यापक

12/02/2023

आंतर भारती विद्यालयाचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश 💐💐
21 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे तब्बल 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी सात विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. समता दळवी यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. साथी पन्नालाल भाऊ सुराणा, सचिव मा.श्री. प्रकाश भाई शहा, संचालक मा.श्री.साळुंखे सर, श्री. राहुल शेंडे सर, मा.महादेव बापू डिकोळे ,मुख्याध्यापक मा.श्री. काळे सर, पर्यवेक्षक मा.डॉ. खुणे सर आणि पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले.

23/01/2023

आंतरभारती परिवारास खुप अभिमान वाटतो तो म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधलेली इमारतीस सहकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे.आंतरभारती विद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहाय्याने उभारण्यात आलेल्या वास्तूचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी शाळा माजी विद्यार्थ्यांना लवकरच निमंत्रण पाठविणार आहे. ज्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या संपर्कात येऊन इमारती बांधकामात सहकार्य केले आहे, तसेच जे संपर्कात आले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे. जर आपल्या माहितीत, शाळेशी संपर्कात नसलेले विद्यार्थी असतील त्यांचे नाव फोन नंबर शाळेस कळवावे. आपल्या माहितीतील इयत्ता दहावीच्या बॅचेसचे विद्यार्थी त्यांची नावे व फोन नंबर आपण कळवल्यास प्रशाला त्यांच्याशी संपर्क साधेल. लवकरच इमारती उद्घाटनाची तारीख आपणास कळविण्यात येईल.
मुख्याध्यापकः श्री. काळे एम. एम. 9518993263
पर्यवेक्षकः डॉ.श्री. खुणे बी.टी.7588163550

01/06/2022
आंतर भारती विद्यालयाचे माजी विद्यार्थी , माननीय रणजीत शिंनगारे साहेब यांनी , संस्थेचे अध्यक्ष माननीय पन्नालाल सुराणा यां...
28/02/2022

आंतर भारती विद्यालयाचे माजी विद्यार्थी , माननीय रणजीत शिंनगारे साहेब यांनी , संस्थेचे अध्यक्ष माननीय पन्नालाल सुराणा यांच्याकडे इमारत निधी साठी, 55 हजार रुपयांचा चेक सुपूर्त केला.

ग्रामोदय समिती संचलित, आंतरभारती विद्यालय कुर्डूवाडी .या प्रशालेची जुनी इमारत ,की जी जिनिंग प्रेस म्हणून उभा होती. त्याव...
25/02/2022

ग्रामोदय समिती संचलित, आंतरभारती विद्यालय कुर्डूवाडी .या प्रशालेची जुनी इमारत ,की जी जिनिंग प्रेस म्हणून उभा होती. त्यावेळेस आंतरभारती मध्ये असणाऱ्या झोपड्यांच्या शाळेस आग लागल्यानंतर, सर्व शाळा जळून गेली .नंतर ही जुनी जिनिंग प्रेस, यामध्ये शाळा भरवण्यात येत होती. परंतु ही इमारत जुनी झाली असून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवण्यासाठी नवीन तीन मजली इमारत बांधकाम चालू करण्यात आले आहे .या इमारतीला उभा करण्यासाठी ,एकूण पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रशाले मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी प्रशाला इमारत बांधण्यासाठी देणगी देऊन आपण अजूनही प्रशालेची जोडले गेलो आहोत ,आपल्याला आपल्या प्रशालेची आत्मीयता आहे, हे दाखविण्यासाठी देणगी स्वरूपात रक्कम किंवा शालेय इमारत बांधकाम साहित्य देऊन शालेय इमारत उभारणी आपला सहभाग नोंदवावा .प्रशालेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली, इमारत बांधकाम निधी देवुन सहकार्य केले आहे.आपणही व मित्र या मध्ये सहभागी व्हावे. आपला फोन नंबर द्यावा ही विनंती. आंतर भारती विद्यालय , कुर्डूवाडी. संपर्क ः मुख्याध्यापक
Ph. No.9518993263
Ph. No. 9834458481
BANK OF MAHARASHTRA KURDUWADI
Bank Acc.No.
60407424137
IFSC: MAHB0001954
चेकः ग्रामोदय समिती

23/07/2020

ग्रामोदय समिती चे उपाध्यक्ष माननीय प्रकाश भाई शहा यांच्या वाढदिवसानिमित्त , उद्या 24 /07/ 2020 रोजी डॉ. बाळासाहेब खुणे 20 नारळाची झाडे भेट देऊन त्यांना सन्मानित करणार आहेत. माननीय प्रकाश भाई शहा यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त भाग शाळा कुर्डू येथे 24/07/2020 रोजी दुपारी 4 वाजता वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

Student information google formकिती जणांनी भरला. बोट वर करा.आणि नसेल भरला तर लगेच भरा
18/11/2018

Student information google form
किती जणांनी भरला. बोट वर करा.
आणि नसेल भरला तर लगेच भरा

All Pass out Students from Antar Bharti Vidyalaya are requested to fill this form. It contain the information related student and school also . It will help to find out our classmates and afterwords we are going to arrange Alumni meet ..

Address

Kurduvadi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Antar Bharti Vidyalaya kurduwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category