13/06/2022
विनम्र आवाहन
*ही आवडते मज मनापासून शाळा*
*लाविते लळा ही जशी माऊली बाळा* !!
या उक्ती प्रमाणे
सुकळवाड -गावराई गावातील शिक्षण प्रेमी ,शिक्षणतज्ज्ञ,गावातील आजी माजी विद्यार्थि व शिक्षणाबद्दल आस्था असणा-या सर्व लोकानी एकत्र येऊन
सुकळवाड, गावराई गावातील विद्यार्थि ,पालक व ग्रामस्थ याना अभिमानास्पद वाटणारे *सरस्वती विद्यामंदिर गावराई- सुकळवाड* हे हायस्कूल *उर्जितावस्थेत* आणून पुन्हा नव्या *चैतन्यशील* वातावरणात सुरू करण्याचा संकल्प केला आहे..या शाळेतील इयत्ता *आठवी ते दहावी* चे वर्ग शैक्षणिक वर्ष *2022 -23* मध्ये दिनांक *13 जून* पासून *उत्साहवर्धक* वातावरणात सुरू करत आहोत.
त्या अनुषंगाने *31मे 2022* पासून या विद्यालयात *प्रवेश* देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.आपण सर्वांनीच आपल्या ज्ञानमंदिराला *गतवैभव* प्राप्त करून देण्यासाठीच *सुकळवाड गावराई* या गावातील व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील *आठवी ते दहावीपर्यंत* शिकणा-या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश घेण्यास प्रवृत्त करून सहकार्य करावे.
विद्यार्थि पालक व ग्रामस्थ याना अभिप्रेत असणारे *दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण* देण्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत. शाळेत प्रवेश घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना *श्री. ब्राह्मणदेव सेवा समिती सुकळवाड* व *ग्रामपंचायत सुकळवाड* यांच्या मार्फत सर्व *शैक्षणिक साहित्य* मोफत देण्यात येणार आहे.त्यामुळे कुणीही पालकांनी शैक्षणिक साहित्य विकत न घेता फक्त आपल्या पाल्याला या विद्यालयात दाखल करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी.
*आमचा मानस*
1) *दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बीएस्सी बीएड स्वयंसेवक शिक्षकांची स्वखर्चाने तातडीने नियुक्त करणे*.
2) *अत्यावश्यक व तातडीची शालेय डागडुजी करणे*
( *छप्पर दुरूस्ती,लाईट फिटींग ,सर्व वर्ग खोल्यात पंखे बसविणे,रंग रंगोटी* )
3) *अद्यावत काॅम्पुटर लॅब तयार करून शाळेत इंटरनेट सुविधा देऊ शाळा जागतिक दर्जाच्या शाळांना जोडणे*.
5) *संगणक तज्ज्ञ शिक्षकाची नियुक्ती करणे*.
6) *शाळा बाह्य परिक्षा ,शिष्यवृत्ती परीक्षा,एमपीएससी परीक्षा यांचे जादा मार्गदर्शन वर्ग आयोजित करणे*.
7) *चित्रकला, कार्यानुभव, शा.शिक्षण ,एन सी.सी यासाठीची मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे*.
यासारखे अनेक संकल्प केलेले असून शाळा हे *ज्ञान मंदीर* बनविण्यासाठी व आपले विद्यालय हे आपली *अस्मिता* समजून व ते *जागतिक किर्तीच* व ते *अभिमानस* पात्र ठरण्यासाठी आपल सर्वांचेच योगदान, दातृत्व व सहकार्य अपेक्षित आहे.असे आपणा सर्वानाच हात जोडुन विनम्र आवाहन करण्यात येत आहे
*आपले नम्र*
*सुकाणू समिती गावराई - सुकळवाड*