Samartha Kala

Samartha Kala Samarthakala is an academy for drawing and painting. Here kids discover their art while adults disco

paintings,murals,waterfalls, grade exam,nameplate,decorations etc art related much more

13/04/2026
कोणत्यातरी व्यवस्थेने सांगितलेल्या , प्रचलित , प्रस्थापित केलेल्या विशिष्ट ठिकाणी स्वतःचा वेळ , पैसा खर्च खरुन कष्ट घेऊन...
13/04/2026

कोणत्यातरी व्यवस्थेने सांगितलेल्या , प्रचलित , प्रस्थापित केलेल्या विशिष्ट ठिकाणी
स्वतःचा वेळ , पैसा खर्च खरुन
कष्ट घेऊन
*कर्तव्य हाच धर्म* ही व्याख्या विसरून कर्तव्यावरुन सुट्टी घेऊन जाणे मला कधी पटले नाही.
शिवाय तेथे जाऊन तेथील अस्वच्छता , शोषण , गडबड , गजबजाट , भक्तिचा बाजार , विविध गोष्टीतिल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुकानदारी ( वाटमारी , वसूली ) साक्षात भगवंताच्या समोर त्याच्या नावाने चालू असलेला व्यवहार ( धंदा ) , त्याला बळी पडणारे श्रद्धा , भक्तिची , उपासनेच्या चुकीच्या व्याख्या शिकलेले हजारो सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत स्त्री पुरुष , देवाच्या दारातही रांगेत घुसने , इकडून टिकडून शिरकाव करून घेणे ,त्यासाठी भांडणे करणे ,अगदी देवापुढे जाईपर्यंत व तिथे गेल्यावरहि स्वतःच्या स्वार्थात , प्रपंचात आकंठ बुडालेले भाविक , *क्षेत्री धोंडा तीर्थे पाणी* हे तुकारमा महाराजांचे बोल विसरून मन्बाजिच्या भजनी लागलेले पथभ्रष्ट , देवाच्या दारात सुद्धा इतर वेळेपेक्षा थोड़ी विधायकता अंगी न येणारे भक्त
या सर्व गोष्टिमूले चिडचिड , निराशा , वैफल्य , वैताग येतो.

त्यापेक्षा जिथे *तो* निवांत असेल तिथे त्याला भेटायला , बघायला , बोलायला , गप्प बसायला आवडते.

कधी मि त्याच्याकडे जातो ( म्हणजे - तो मला नेतो !!! ) तर कधी तो माझ्याकडे येतो.

जसे या आठवड्यात अनेक जण माझ्याकडे आले आहेत.

त्यांचा ( निवांत , कोणतीही घाई गड़बड़ न करता , अगदी एकटयाने , कोणाच्याही व्यत्ययाविना , कोणी पुढे न ढकलता , अंगावर न खेकसता ) अभिषेक , श्रृंगार , पूजा अर्चा , अबोल गप्पा मारत , मनोमनीची इंटरेक्शन - भावनांची देवघेव करत , आनंदाची उधळण अनुभवत , समाधानाचे वरदान घेत करता आली.

असे दर्शन , अशी पूजा ,अशी महापूजा कधी कोणाला करायला मिळणार

आज सेवा विट्ठल रखुमाईची ........

समर्थ कला 9881211870

*( चुकभुल क्षमस्व ...... )*

अधिक फोटोसाठी कृपया स्टेटस पहावे

*Hat trick*सलग तीन वर्ष बजरंगबली त्याच्या बर्थडे च्या आधी मला बोलावून त्याचा नट्टापट्टा करून घेऊन बर्थडे साठी तयार रहातो...
13/04/2026

*Hat trick*

सलग तीन वर्ष बजरंगबली त्याच्या बर्थडे च्या आधी मला बोलावून त्याचा नट्टापट्टा करून घेऊन बर्थडे साठी तयार रहातो.

कोणतीही मुर्ती रंगवताना मला इतके समाधान मिळते जे कुठल्याही मोठ्या , जागृत , प्रसिद्ध , प्रथितयश , नवसाच्या इत्यादी इत्यादी देवस्थानात जाऊन मिळत नाही. मुर्ती रंगवताना ती साफ करण्यापासुनच तिच्याशी माझे हितगुज सुरु होते . या मनीचे त्या मनी अलगद झिरपत जाते. गप्पा होत जातात. मी काही तक्रारी करत नाही पण आज चक्क बजरंगबलीच माझ्याकडे तक्रार करत होता ....... *बघ ना रे!! हे लोक मला इतक्या भरजरी कपडयात गुंडाळून ठेवतात. मला जाम उकडते. जाम उकडते मला. मला, (खरे तर आम्हा सर्वांनाच) मोकळे राहायला आवडते. त्यात मि तर पवनपुत्र, इकडून तिकडे मुक्त संचार करणे माझे काम.... या कपडयांचा खुप त्रास होतो शिवाय माझे सौष्ठव, माझी शरीरसंपदा , माझी पोज, डौल, रुबाब काही म्हणजे काहीच कोणाला दिसत नाही. तेच दिसले नाही तर माझ्याकडून कोणाला क़ाय स्फुर्ती मिळेल?????"* साक्षात भगवंत, तोहि बजरंगबली, असा केविलवाणा बनून कैफियत मांडताना बघुन क़ाय बोलावे ते समजेना.... शेवटी तुझा निरोप पोचवतो मि माझ्या परिने लोकांपर्यंत असे सांगून त्याची समजूत काढली.
अशाच गुजगोष्टी करत काम करताना मुर्तीला बरे वाटत असल्याची उगाचच भावना होते. तीचे रूप खुलत जाते.... मनात भरत जाते.... नवीन कल्पना सूचत जातात.... आणी त्या प्रत्यक्षात उतरतही जातात....
मी फक्त निमित्तमात्र उरतो....
फुकटचे श्रेय घेत फिरतो....
😊
आजही ही मस्त ,खुप सुंदर , बजरंगबली या नावाला साजेशी , बऱ्यापैकी मोठी मुर्ती रंगवली....

जन्मदिनाच्या एडवांसमध्ये खुपप्पप्पप्पप्प शुभेच्छा देवा

आणी आयुष्यात एकदाही तालमित , जिममध्ये किंवा इतरत्र तुझी खरी उपासना केली नाही त्याबद्दल क्षमायाचना ..........

( तरिहि तू अशी सेवा करून घेतो आहेस त्याबद्दल ............

समर्थ कला 9881211870

जुन्या मूर्तिंचा जीर्णोद्धार करताना खुप खुप समाधान मिळते आनंद होतो तोहि खुप आतून , खुप मनापासून ,अन्तरंगातुन होतो ....हो...
13/04/2026

जुन्या मूर्तिंचा जीर्णोद्धार करताना खुप खुप समाधान मिळते
आनंद होतो
तोहि खुप आतून , खुप मनापासून ,अन्तरंगातुन होतो ....
होत रहातो ....
काम पूरे होइतोवर ती कारंजी उडत राहतात ....
😇

या २ मूर्तिंच्या वेळी ती अनुभूति थोडी जास्तच आली. त्याला अनेक कारणे होती -
मुख्य म्हणजे या मुर्ती कदाचित 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या असाव्यात. म्हणजेच मूर्तिकार देवधर यांच्या कडील मूळ साच्यातील होत्या. त्यामुळे जास्त सुबक , सौंदर्यपूर्ण होत्या. ( आजकाल मिळणाऱ्या बहुतांश मुर्ती या मूळ मूर्तिच्या कॉपीवरुन कॉपी कॉपीवरुन कॉपी अशा अनेक पिढ्यांच्या असतात. त्यामुळे त्यातील मूळ सौंदर्य , नजाकत तितकेसे उतरलेले नसते.) त्यामुळे यांचा जीर्णोद्धार म्हणजे त्या मूळ मूर्तिकाराला वाहिलेली आदरांजली , भावांजली , मानाचा मुजरा होता.
शिवाय या कामामुळे त्या मुर्तीन्चे , कलाकृतिंचे आयुष्य काही वर्षांनी वाढण्यास माझा हातभार लागला याचे समाधान होते.
याचबरोबर ज्यांच्या घरात या मुर्ती होत्या त्यांच्या अनेक वर्षांचा भावबंध त्यांच्याशी जोडलेले होते. कदाचित त्यांच्या लहानपणापासुन त्या मुर्ती त्या घरातील सदस्य असतील. कदाचित आधीच्या पिढीला या पिढीशी जोडून ठेवणारा हा एक धागा असेल.
त्या दॄष्टिने त्याचे मोल अनमोल असेल.
ते जपले जाण्यात माझा खारीचा वाटा असेल.

आणी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे
या मुर्ती उंचावर व उघड्यावर शोकेसविना असल्याने त्यावर खुप धूळ असुन तीही घट्ट बसली होती. मुर्ती जुन्या असल्याने पीओपी ही ठिसुळ झाले होते. त्यामुळे धूळ साफ करणे , मुर्ती स्वच्छ करणे इत्यादी प्राथमिक कामाला खुप च अडचणी येत होत्या. खुप वेळा काम थांबवावे लागत होते. अनेकदा काम शक्य नसल्याचे सांगून मुर्ती परत द्याव्यात असेही वाटून गेले.

पण .....

हो नाही करता करता शेवटी गड जिंकलाच ......
शेवटी पंढरी गाठलीच ....

जेव्हा शेवटी लय सापडली होती तेव्हा मूळ प्रायमर देताना एका मुर्तीचे काम करताना तिरप्या नजरेने दुसऱ्या मुर्तीकडे लक्ष जायचे तर उगाच ती हसत असल्यासारखे वाटत होते 😊

असो...
बाकी सरस्वतीच्या हाती फूल, विणेच्या तारा, मोराचा पिसारा मोठा करणे या नेहमीच्या गोष्टिंच्या बरोबर यावेळी देवीने तीच्या मागे प्रभावळ मागितली ...
त्यासाठीचे मटेरियलही लगेच हाताशी सापडले ....
तिही फर्माइश पुर्ण केली ...
प्रभावळ बनवण्यापेक्षा जास्त ती लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागले....

इतके सारे होईपर्यंत लक्ष्मी माझ्याकडे बघत असल्याचे तिरप्या डोळ्यातून दिसत होतेच ...
ती रूसायला नको म्हणून मग तीलाही प्रभावळ आणि तिच्यासमोर धनाचा घडा भरून ठेवला.

अशा रीतीने
आता दोन्ही देवी आनंदाने त्यांच्या नवीन घरात अजुन काही वर्ष वास करतील...
त्यांच्या भावबंधाचा भाग बनून राहतील ...
आशीर्वाद देत राहतील ....

समर्थ कला
9881211870

कलाकार चारचौघांप्रमाणेच नाक , डोळे हात पाय डोके असलेला प्राणी पण तरिहि तो असतो इतरांपेक्षा वेगळा ....आणी त्याला वेगळा बन...
13/04/2026

कलाकार
चारचौघांप्रमाणेच नाक , डोळे हात पाय डोके असलेला प्राणी
पण तरिहि तो असतो इतरांपेक्षा वेगळा ....
आणी त्याला वेगळा बनवते
त्याची नजर .....

जी शोधत असते नावीन्य , वेगळेपण , सौंदर्य

त्यामुळेच त्याचा भवताल , त्याचा परिसर , त्याच्या वस्तु , त्याची वास्तु सर्व काही वेगळी असते .... वेगळी भासते ......

अशाच एका वास्तुत जायची संधी मिळाली
जिथे एक नव्हे तर सारेच कलाकार .... त्यामुळे तेथील चरचरात कलासक्ति , कलादृष्टी वसत होती , दिसत होती .....

अगदी तेथील तुळशीवृंदावन सुद्धा ....

जे रंगवून त्याच्या सौंदर्यात माझ्या परिने भर टाकायचा प्रयत्न करता आला ....

ज्याद्वारे माझा त्या कलासक्त वास्तुत अप्रत्यक्ष निवास राहील

😊😊

या क्षेत्रात असल्याचा एक फायदा म्हणजे अनेकदा नवनव्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळते .....जशी काल मिळाली .....एकांच्याक...
13/04/2026

या क्षेत्रात असल्याचा एक फायदा म्हणजे अनेकदा नवनव्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळते .....

जशी काल मिळाली .....

एकांच्याकड़े त्यांचे देवघर डेकोरेट करायचे होते .. नेहमीपमाणे आधी त्याचा फोटो मागवुन घेतला की जेणेकरून काम करण्याच्या आधी काही थोडाफार होमवर्क करून जाता येईल . अन्यथा एकदम साइटवर जाऊन कामाला सुरवात करायची म्हणले तर वेळ जातो , आणि अनेकदा काम सुरु झाल्यावर किंवा कधी कधी काम झाल्यावर , याच्याऐवजी दुसऱ्या प्रकारे करायला हवे होते , असे वाटते ... ज्याला काही उपाय नसतो . पुन्हा ते काम करायला मिळणार नसते .... एक संधी मिस झाल्यासारखे वाटते ......वाटत रहाते .....

पण फोटोवरुन फार काही सुचेना ....
शेवटी एक दोन दिवस पुढे मागे करून काम करायला गेलो ....

सुरुवातीला जे काही थोडेफार ठरवले होते त्यानुसार काम करायला सुरवात केली .....

आणि काम सूचत गेले ...
पूर्णत्वाला येत गेले ....

👍👍👍👍

*गोष्ट माहित असणे व ती प्रत्यक्ष आकळणे यात खुप फरक असतो* ......तोच फरक आज पुन्हा एकदा जाणवला पुन्हा एकदा याची अनुभूती आल...
04/12/2025

*गोष्ट माहित असणे व ती प्रत्यक्ष आकळणे यात खुप फरक असतो* ......

तोच फरक आज पुन्हा एकदा जाणवला
पुन्हा एकदा याची अनुभूती आली

आपले फोक फॉर्म , जुन्या , प्राचीन लोककला ....खास करून चित्रकला .... यांच्यामध्ये खुपशा गोष्टी अशा प्रकारे नियमबद्ध , आखीव रेखीव केलेल्या असतात की त्या फॉलो केल्या की किमान सुंदरता त्या कलाकृतिमध्ये उतरतेच उतरते .....

जशी या चित्रात उतरली आहे .....

( जेव्हापासुन हे चित्र समाजमाध्यमांवर जास्त प्रसारित झाले आहे तेव्हापासुनच ते चितारायची इच्छा होती .... ती आज पुर्ण झाली 😊)

( अजुन एक ...
अनेक दिवसांपूर्वी फाइनल झालेले काम अनेकविध कामांमुळे पुढे पुढे जात बरोबर आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी
क्लाएंटच्या नव्या व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी
पुर्ण झाले ......

त्यांच्या व्यवसायासाठी ही गोमाता कामधेनूपमाणे वरदायिनी ठरावी

हीच शुभेच्छा )

समर्थ कला
9881211870

( अधिकच्या फोटोंसाठी कृपया माझे स्टेटस पहावे ही विनंती )

08/09/2025

2025

Address

Kothrud

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919881211870

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samartha Kala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Samartha Kala:

Shortcuts

Share

Category