DYP College of Agri. Engg. & Tech, Talsande

DYP College of Agri. Engg. & Tech, Talsande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DYP College of Agri. Engg. & Tech, Talsande, School, A/P Talsande, Tal. Hatkanangale, Dist. Kolhapur, Kolhapur.

डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरामहाविद्यालयाच्य...
11/11/2025

डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे चा २३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
महाविद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास उजळला

ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे या प्रतिष्ठित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व अ दर्जा प्राप्त महाविद्यालयाचा २३ वा वर्धापन दिन सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. संजय डी. पाटील, अध्यक्ष, डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. ए. के. गुप्ता, कार्यकारी संचालक, डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर तसेच कुलगुरू, डी. वाय. पाटील अ‍ॅग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी (DYP-ATU), तळसंदे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पाटील, डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे चे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस चे डायरेक्टर, डॉ. एस आर पावसकर, हेड, फार्म ऑपरेशन्स, डी वाय पी कोल्हापूर चे इंजि. ए बी गाताडे, डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, श्री. डी. एन. शेलार, डी. वाय. पाटील कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य, श्री पी. एस. पाटील, डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उप प्राचार्य, इंजि. पी डी उके, डी वाय पाटील कॅम्पस तळसंदे चे कॅम्पस इंजिनियर श्री. विश्वनाथ पाटील, डी वाय पाटील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय व कृषी तंत्रनिकेतन चे सीनियर ऑफिस सुप्रीटेंडेंट, श्री. आर पी शिंदे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डी वाय पाटील ग्रुप चे आराध्य दैवत श्री. गजानन महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या गेल्या २३ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे, उपलब्धींचे आणि सुवर्णक्षणांचे दर्शन घडविणारा विशेष व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. या व्हिडिओमधून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा, संशोधनातील कामगिरीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा प्रेरणादायी आढावा सादर झाला.

यानंतर वर्धापन दिनाचा केक कापून उत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.

Address

A/P Talsande, Tal. Hatkanangale, Dist. Kolhapur
Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5am
Tuesday 9am - 5am
Wednesday 9am - 5am
Thursday 9am - 5am
Friday 9am - 5am
Saturday 9am - 5am

Alerts

Be the first to know and let us send you an email when DYP College of Agri. Engg. & Tech, Talsande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category