Maharashtra Information Technology support center

Call Directions Website Contact the school

Maharashtra Information Technology support center Social Development through Youth & Women Empowerment

*लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘नाशिक जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा’ उत्साहात संपन्न*  *नाश...
03/09/2026

*लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘नाशिक जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा’ उत्साहात संपन्न*
*नाशिक, १ सप्टेंबर* *२०२६*
युवकांना करिअरच्या योग्य संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाशिक जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
नाशिक जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा मा. डॉ. संजय माधव सानप यांनी प्रमुख उपस्थित म्हणून मनोगत व्यक्त केले. तसेच नाशिक जिल्हा समन्वयक (तंत्रशिक्षण विभाग) व AI&DS विभाग प्रमुख मा. सीमा बाजी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रामध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष व ‘करिअर कट्टा’चे राज्य समन्वयक मा. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) मा. भूषण कोळेकर यांनी बँकिंग व वित्त क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यशाळेदरम्यान प्राचार्य व समन्वयकांसाठी आढावा बैठक तसेच विद्यार्थ्यांसाठी समांतर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि भविष्यातील पर्याय समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या मनोगत सत्रामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राचार्य, महाविद्यालयीन समन्वयक तसेच करिअर संसद मुख्यमंत्री यांनी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअरची निवड करता यावी, तसेच उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करता यावा, यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी आणि आयोजकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र झोळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

02/09/2026

*करिअर मॅपिंग | स्वप्नांना योग्य दिशा, भविष्यासाठी नवी वाट!* श्रीगोंदा जिल्हास्तरीय ‘करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा’ दि...
31/08/2026

*करिअर मॅपिंग | स्वप्नांना योग्य दिशा, भविष्यासाठी नवी वाट!*

श्रीगोंदा जिल्हास्तरीय ‘करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा’ दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. सतीशचंद्रजी सूर्यवंशी, अहिल्यानगर जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिग्विजय राजेंद्रदादा नागवडे, युवा नेते, श्रीगोंदा तालुका तसेच मा. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि मा. भूषण कोळेकर, माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM), स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, कौशल्य विकास, स्पर्धात्मक परीक्षा, बँकिंग, व्यवसाय, रोजगार आणि करिअर नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच कु. स्नेहल ताराचंद नेहुल आणि आयोजक महाविद्यालयाचे मुख्यमंत्री सार्थक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आजची योग्य दिशा… उद्याच्या यशाची नवी सुरुवात!

*करिअर मॅपिंग कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न!*  *मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर* जिल्हास्तरीय ‘करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्य...
30/08/2026

*करिअर मॅपिंग कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न!*

*मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर* जिल्हास्तरीय ‘करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा’ दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्व-ओळख, कौशल्य विकास, उद्योजकता, आर्थिक जागरूकता आणि मानवी मूल्ये याबाबत मार्गदर्शन मिळाले.

मा. रवींद्र साठे, प्रफुल्ल पाठक, शंकर जाधव, भूषण कोळेकर, यशवंत शितोळे, डॉ. दीपा वर्मा व सोनाली लोहार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत Entrepreneurship Assessment Test घेऊन विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.

*“ज्ञानाच्या आधारावर करिअर निवडा, कौशल्यांच्या बळावर ते घडवा आणि मानवी मूल्यांच्या माध्यमातून त्याला अर्थपूर्ण बनवा.”*

SkillDevelopment

पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक गतिशीलता व दिशा देण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले...
25/08/2026

पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक गतिशीलता व दिशा देण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली.
या उच्चस्तरीय बैठकीमध्ये तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे २०० महाविद्यालयीन प्राचार्य सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रापुढील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि धोरणात्मक बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही एकत्रित बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.
या बैठकीमध्ये केवळ औपचारिक चर्चा न करता शैक्षणिक सुधारणांच्या विविध महत्त्वाच्या पैलूंवर मुक्तपणे आणि सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने काही महत्त्वपूर्ण विषय होते, ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) चे चौथे वर्ष पूर्ण झाल्यामुळे आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला तसेच, पुढील टप्प्यातील नियोजनावर चर्चा झाली. याशिवाय AICTE आणि UGC एकत्रीकरणाचा प्राचार्यांवर व संस्थांवर होणारा परिणाम आणि सुलभतेबाबत सविस्तर मंथन झाले. विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी जोडून व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी इंटर्नशिपच्या संधी कशा वाढवता येतील यावर विचारविनिमय झाला. *’विकसित भारत’* च्या राष्ट्रीय संकल्पनेला साध्य करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षिणक धोरणाची भूमिका आणि त्यातून निर्माण होणारी कौशल्यसंपन्न युवा पिढी यावर विशेष भर देण्यात आला. तसेच, महाविद्यालयीन स्तरावर नॅक (NAAC) मानांकनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि दर्जेदार कशी बनवता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्षपणे येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे उपाय यावर उपस्थितांनी मनमोकळी चर्चा केली. या भव्य बैठकीला उच्च शिक्षण आणि धोरणनिश्चिती क्षेत्रातील अनेक नामवंत व वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीची उपयोगिता अधिक वाढली. बैठकीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक तथा उच्च शिक्षण संचालक सन्माननीय डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर, यूजीसी (UGC) चे सचिव माणिक जोशी, विशेष तज्ज्ञ व वक्ते विनायक जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता यांसारखे दिग्गज प्रशासकीय व शैक्षणिक नेतृत्व प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व प्रमुख वक्त्यांनी व प्राचार्यांनी उच्च शिक्षणातील नवनवीन बदलांवर प्रकाश टाकला.

Address

Mahila Seva Sankul, Near Khasbag Maidan, Mangalwar Peth
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 8am - 2pm

Telephone

+917507652555

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Information Technology support center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Maharashtra Information Technology support center:

Shortcuts

Share

Category