Kamala College.Official

Kamala College.Official Kamala College, Kolhapur, affiliated with Shivaji University, is a premier women's institution offering various U.G and P.G. programs. Voc.

These include B.A., B,Com., B.C.A., B. (Food & Retail), M.A.,& Yoga Therapy aligned with NEP and AICTE norms.

कमला कॉलेजमध्ये 'उद्योजकतेचा विकास' विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन 💡कमला कॉलेज, कोल्हापूर येथील वाणिज्य विभागांतर्गत कॉमर्स ...
22/07/2026

कमला कॉलेजमध्ये 'उद्योजकतेचा विकास' विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन 💡

कमला कॉलेज, कोल्हापूर येथील वाणिज्य विभागांतर्गत कॉमर्स फोरमच्या वतीने 'उद्योजकतेचा विकास' या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले. बी.कॉम. भाग II च्या विद्यार्थिनींनी स्टार्टअप्स, महिला उद्योजकता, शासकीय योजना व रोजगारनिर्मिती यांसारख्या विषयांवर प्रभावी पोस्टर्स सादर केली.

या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास प्रेरणा मिळाली.

🌸 विनम्र अभिवादन 🌸महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन...
22/07/2026

🌸 विनम्र अभिवादन 🌸
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आदर्श, समाजसेवेची प्रेरणा आणि जनहितासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील.
💐 भावपूर्ण अभिवादन! 💐
Inspiration

📢 कमला कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती व्याख्यानकमला कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूर येथे समाजशास्त्र विभाग व सामाजिक...
09/07/2026

📢 कमला कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती व्याख्यान

कमला कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूर येथे समाजशास्त्र विभाग व सामाजिक आरोग्य आणि सामाजिक समस्या जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने "अंमली पदार्थाविषयी माहिती आणि त्याचा सामाजिक व कुटुंबावर होणारा परिणाम" या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व याविषयी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

✨ व्यसनमुक्त युवा – सुदृढ समाजाची पायाभरणी!

YouthEmpowerment Education

कमला कॉलेजला रोटरी क्लबतर्फे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट! ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त)...
29/06/2026

कमला कॉलेजला रोटरी क्लबतर्फे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट!

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज, कोल्हापूर (स्वायत्त) येथे रोटरी क्लबतर्फे प्रदान करण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळीविषयी जागरूकतेला बळ मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यावेळी इनरव्हील क्लब, रोटरी परिवाराचे मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने रोटरी परिवाराचे या मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 🤝

✨ आरोग्यदायी, सशक्त आणि जागरूक विद्यार्थिनींसाठी एक प्रेरणादायी उपक्रम!

MenstrualHygiene SanitaryNapkinVendingMachine StudentWellbeing GratitudeCeremony TararaniUniversity Education SocialService Maharashtra

ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष क्रांतिवीर रंगराव दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादनथोर क्रांतिकारक, स्...
27/06/2026

ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष क्रांतिवीर रंगराव दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष कै. क्रांतिवीर रंगराव दादा पाटील यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त ताराराणी विद्यापीठाचे सेक्रेटरी श्री. प्राजक्त पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्य प्रा.डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य श्री.एम. एन. जाधव, ग्रंथपाल उर्मिला कदम, प्रा. ज्योती गावडे, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. विश्वनाथ तराळ, श्री. एम.एन चौहान,डॉ. तानाजी घागरे, प्रा. आर. पी.शिंदे, प्रा.एम.पी. माळी, प्रा.आर. बी. पाटील, पी. आर. माळी, प्रा. जरळीकर, श्री प्रताप रंगापुरे व श्री. संदीप गावडे यांच्यासह सर्व शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होते.

कमला कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न! राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ वी जयंतीनिमित...
26/06/2026

कमला कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न!

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ वी जयंतीनिमित्त माननीय प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

समाजसुधारणा, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.

🌼 "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या विचारांचा वारसा जपूया!

Maharashtra CollegeEvents

कमला कॉलेज, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी, प्...
22/06/2026

कमला कॉलेज, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले.
योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. निरोगी जीवनशैलीचा संकल्प करत सर्वांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
✨ "योग हा केवळ व्यायाम नसून, निरोगी आणि संतुलित जीवनाचा मार्ग आहे." ✨
HealthyLifestyle InternationalYogaDay2026 कमला_कॉलेज_कोल्हापूर योगदिन निरोगीजीवन 🧘🌿💚

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. डॉ. रजनीश कामत साहेब यांचा सत्कार व अभिनंदन करताना तारारा...
25/05/2026

शिवाजी विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. डॉ. रजनीश कामत साहेब यांचा सत्कार व अभिनंदन करताना ताराराणी विद्यापीठ संस्थेचे सचिव मा. प्राजक्त क्रांतिकुमार पाटील साहेब. यावेळी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर तसेच सहकारी उपस्थित होते.
Leadership Education

ताराराणी विद्यापीठाच्या उपाध्यक्षा, कै. सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा परमपूज्य काकीजी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्...
28/04/2026

ताराराणी विद्यापीठाच्या उपाध्यक्षा, कै. सौ. सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा परमपूज्य काकीजी यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न झाले. 🌸🙏

यावेळी उपस्थित मान्यवरांनी काकीजींच्या कार्याचा व आदर्शांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजकार्याची नवी ऊर्जा मिळत राहो, हीच विनम्र अभिवादन! ✨

कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🌸कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आ...
14/04/2026

कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 🌸

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. डॉ. सुजय पाटील, उपप्राचार्य एम. एन. जाधव, ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम, श्रीमती ज्योती लेंगरे, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. तानाजी घागरे, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. पूजा पाटील, प्रा. महेंद्र जरळीकर, श्रीमती जे. एल. देशपांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Address

Rajarampuri 1st Lane
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 7:30am - 5:30pm
Tuesday 7:30am - 5:30pm
Wednesday 7:30am - 5:30am
Thursday 7:30am - 5:30pm
Friday 7:30am - 5:30pm
Saturday 7:30am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kamala College.Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share