14/10/2024
K H College,(B.A.B.ED.) Garagoti
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from K H College,(B.A.B.ED.) Garagoti, College & University, MURLIDHARNAGAR GARAGOTI, Kolhapur.
14/10/2024
14/10/2024
*कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये महा-टीईटी कार्यशाळा संपन्न*
10 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ घातलेल्या महा-टीईटी परीक्षेसंदर्भात आज कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी येथील बी.ए.बी.एड. विभागातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, कार्यशाळेची एकूण चार सत्रे आयोजित केली होती, पहिल्या सत्रामध्ये कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.एस.चव्हाण सर यांनी केले आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी विद्यार्थ्यांनसाठी या प्रकारची मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल स्पर्धा परीक्षा विभागाच्या कामाचे कौतुक करून, TET परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे पंधरा हजार रुपयाची पुस्तक देण्याचे जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक करताना कार्यशाळेचे समन्वयक ,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा डॉ. एन.टी. जाधव सर यांनी महा-टीईटी परीक्षेचे स्वरूप, कार्यशाळा आयोजन करण्यासंदर्भात विद्यार्थी हिताचा आढावा घेतला , या कार्यशाळेमध्ये आजी-माजी असे एकूण 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशा आजी माजी विद्यार्थ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुप मध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत.या कार्यशाळेनंतर त्या ग्रुपमध्येच विविध शैक्षणिक साहित्य लेखी ,ऑडियो - व्हिडिओ साहित्य, जुने प्रश्नपत्रिका संच पाठविले जाणार असून दर शनिवारी गुगल फॉर्म द्वारे सराव परीक्षा घेतली जाणार याबद्दल सविस्तर माहिती दिली . कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा BABEd विभाग आपल्या विद्यार्थ्यांसाठी नियमित अविरत प्रयत्न करणार अशी ग्वाही देऊन प्रा डॉ जाधव यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले.
द्वितीय सत्राची सुरुवात ही टीईटी परीक्षेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा.पी.बी. पाटील सर व प्रा. एस.एस. पाटील मॅडम यांनी अनुक्रमे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकाची माहिती देत केली, त्यामध्ये त्यांनी विविध मानसशास्त्रीय व अध्यापन शास्त्रीय संकल्पना, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व प्रश्नांची ओळख करून दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. द्वितीय सत्राचे आभार प्रा. संतोष कांबळे सर यांनी मांडले व विद्यार्थ्यांना पंधरा मिनिटांचा ब्रेक देऊन अल्पोपहार करण्यास सांगितला.
तृतीय सत्राची सुरुवात प्रा.संतोष कांबळे सर यांनी भाषा या घटकातील हिंदी भाषा घेऊन जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल याचे विश्लेषण करत असताना हिंदी भाषेचे अध्यापनशास्त्र व व्याकरण यांचे स्वरूप व प्रश्नपत्रिका याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रा. शिवाजी देसाई सर यांनी मराठी भाषेचे महत्व पटवून देताना मराठी भाषेतील भाषा कौशल्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत सविस्तरित्या मांडत असताना अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तृतीय सत्राचे आभार प्रा. सुशांत शिंदे सर यांनी मांडले व विद्यार्थ्यांना दहा मिनिटाच्या ब्रेक मध्ये चहापान करण्यास सांगितले.
चतुर्थ सत्राची सुरुवात प्रा. जी.व्ही. कांबळे मॅडम यांनी समाजशास्त्र या घटका अंतर्गत येणाऱ्या भूगोल या उपघटकातील विविध प्रश्नांची ओळख करून देत केली व विद्यार्थ्यांना भूगोलाची महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर प्रा. सुशांत शिंदे सर यांनी समाजशास्त्रातील दुसरा घटक इतिहास याची सविस्तर माहिती देताना इतिहासाच्या विविध संकल्पना, अध्यापनशास्त्र व प्रश्न यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. शेवटी चतुर्थ अशा अंतिम सत्राचे व कार्यशाळेचे आभार प्रा. संतोष कांबळे सर यांनी मांडताना कार्यशाळेचे समन्वयक प्रा डॉ. एन.टी. जाधव सर, प्र. प्राचार्य डॉ.चव्हाण सर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रामुख्याने कार्यशाळेला उपस्थित असणारे बी.ए.बी.एड. चे आजी व माजी विद्यार्थी तसेच आजची कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी बी.ए.बी.एड.तृतीय व चतुर्थ वर्ष विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांचे आभार मानताना सर्वांना महा-टीईटी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यशाळा संपन्न झाली असे जाहीर केले.
30/08/2024
कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामार्फत 'ऐतिहासिक पर्यटन' या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आज महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉक्टर चव्हाण एस एस आणि अन्य मान्यवर प्राध्यापक वर्ग यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा जाधव एन टी यांनी अभ्यासक्रमाची रूपरेषा सांगून त्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले.
याप्रसंगी इतिहास विभागा प्रमुख प्रा विशाल आहेर यांनी इतिहास विभागामार्फत भविष्यातील सर्व उपक्रमांची थोडक्यात माहिती देऊन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
21/08/2024
सांस्कृतिक विभाग मार्फत २१/०८/२०२४ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला .
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
MURLIDHARNAGAR GARAGOTI
Kolhapur
416209