14/04/2026
्रियेटिव्ह_हँड_ऑफ_महाराष्ट्रा !!
राज्यस्तरीय पुरस्कार
----------------------------
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी आपल्या
ाबणाऱ्या_हातांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आमच्याकडे तात्काळ पाठवा...
----------------------------
कोणताही देश, प्रदेश हा माणसांच्या कष्टावर, घामावर व त्यागावर उभा राहात असतो. आपला महाराष्ट्र उभा करण्यामध्येही अनेकांचे हात कामी आले आहेत. आजही अनेक हात आपला महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. शेतकरी, शेतमजूर, विविध क्षेत्रातील संघटित-असंघटित कामगार, कारागीर, लहान-मोठे उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, लेखक, कवी, निवेदक, डॉक्टर, वकील, पत्रकार, कलाकार, राजकीय नेते, सामाजिक संस्था व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासह अनेकांच्या कष्टातून आपला महाराष्ट्र उभा राहिला आहे व राहत आहे. यात अनेक स्त्री-पुरुषांचा सहभाग राहिला आहे. दोघांनी मिळून महाराष्ट्र उभा केला व करत आहेत. अशाच राबणाऱ्या हातांचा सन्मान करण्यासाठी आम्ही...
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
निर्मिती फिल्म क्लब, यांच्यावतीने
!! क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा !!
राज्यस्तरीय पुरस्कार देऊन रविवार दि. 3 मे, 2026 रोजी दुपारी 12:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करणार आहोत.
---------------------------------
आपणास विनंती अशी की,
!! क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा !!
या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपल्या स्वतःच्या राबणाऱ्या हातांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी माहिती आमच्याकडे दि. 25 एप्रिल, 2026 पर्यंत 9322258008 या वॉट्सअप नंबरवर पाठवून आम्हाला आपल्या कार्याचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
सोबत दोन आयडेंटी साईज फोटोही पाठवावे.
---------------
नियम व अटी लागू.
---------------
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
निर्मिती फिल्म क्लब
-----------------
अंतिमा कोल्हापूरकर
आदित्य म्हमाने
9322258008