21/06/2026
आज (२१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिन...
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाने झाली. संयुक्त राष्ट्रांनी तो मान्य करून पहिला योग दिन २१ जून २०१५ रोजी साजरा केला. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून, तो आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. भारताच्या प्राचीन परंपरेत आणि संस्कृतीमध्ये योगाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
योगाचे अनेक फायदे आहेत — नियमित योगासने केल्यामुळे शरीर लवचीक बनते, मन शांत राहते, तणाव कमी होतो, झोप सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो. योग दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे हे फायदे जगभर पोहोचवणे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत थीम “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) आहे. आयुष मंत्रालयाच्या (Ministry of Ayush) मते, वाढत्या वयासोबत होणारे आजारपण, सांधेदुखी आणि मानसिक थकवा यांवर योग हा अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे.
या संकल्पनेचा मुख्य उद्देश वृद्धावस्थेतही ऊर्जावान, सक्रिय आणि निरोगी राहणे, शारीरिक लवचिकता, ताकद आणि मानसिक संतुलन वाढवणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांगीण तंदुरुस्तीचा प्रसार करणे या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा आहे. योग हे भारताने जगाला दिलेले आरोग्य व शांतीचे अमूल्य देणं मानले जाते. दररोज योग करू या, सकारात्मक जीवनशैली अंगीकारूया..!
•
#योगआणिआरोग्य #आंतरराष्ट्रीय_योग_दिवस #योगशक्ती