01/04/2026
१३ वर्षांत माझ्या प्रैक्टिस मधे मी एक गोष्ट शिकले —
ऑटिझम असलेल्या मुलाला “बरं” करायचं नसतं.
त्याला समजून घ्यायचं असतं.
जेव्हा एखादा पालक माझ्याकडे येतो, डोळ्यांत प्रश्न घेऊन —
“डॉक्टर, माझं मूल ठीक होईल का?” —
माझं उत्तर असतं:
“तुमचं मूल आधीच ठीक आहे.
फक्त आपल्याला त्याची भाषा शिकायची आहे.”
लवकर निदान, योग्य थेरपी, आणि प्रेमळ कुटुंब —
हे तीन मिळाले की चमत्कार घडतात.
मी रोज ते पाहते. 💙
तुमच्या मुलाबद्दल काही वेगळं जाणवतंय?
वाट पाहू नका. आमच्याशी बोला