Share Mkt For Beginners

Share Mkt For Beginners This page is meant to educate new entrants in Stock Mkt i a smoother and easier way.

We're meant to guide people from varied backgrounds with bare minimum educational qualification and Financial background

13/02/2019

सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट या प्रकारात आता आपण थोडेसे बँकिंगकडे वळूया
बँकिंग बद्दल बोलण्या सारखा खूप काही आहे
बँकिंग बद्दलच्या आपल्या अज्ञानामुळे आपण आपले खूप नुकसान करून घेतो . त्यातला एक प्रकार आज पाहूया . ज्याचं नाव आहे FD OD (fixed deposit over draft )
समजा एखाद्या बँकेत तुमची 50,000/ ₹ ची FD आहे
आणि काही कारणास्तव तुम्हाला २०००० ₹ लागणार आहेत . तर पहिला उपाय आहे पूर्ण ठेव मोडणे . पण सगळ्या पैशांची तर आपल्याला गरज नाही . अशा वेळी बँक मॅनेजर गोड बोलून आपल्याला आपल्याच पावतीवर कर्ज काढायला सांगतात यालाच FD OD असे म्हणतात
हा एक अत्यंत अजब प्रकार आहे . म्हणजे पाहा, पैसे आपलेच पण त्या साठी आपण बँकेला दोन टक्के व्याज द्यायचे.
जर त्यापेक्षा आपण पावती मोडून हवी तेवढी रक्कम काढली आणि उरलेल्या रकमेची परत पावती करून ठेवली तर आपल्याला हे एक्स्ट्रा दोन टक्के द्यावे लागणार नाहीत
इथे काही लोक असे म्हणतात की कर्जाऊ रक्कम घेतली तर परत फेड व्यवस्थित होते अन्यथा नाही . इथेच financial discipline चा अभाव दिसतो . बँक याचाच गैरफायदा घेते.
लक्षात घ्या 20000/ ₹ वार्षिक 2% म्हणजे साधारणतः 400/ चा भुर्दंड आपण सहन करतो (लक्षात घ्या 20000/ हे उदाहरणा दाखल घेतले आहे ही रक्कम जेवढी मोठी तेवढा भुर्दंडही मोठा ) . शिवाय संपूर्ण मुद्दल आणि व्याज परतफेड केल्याशिवाय ती रक्कम आपण काढू शकत नाही. म्हणजे रक्कम खर्च झाल्या सारखीच आहे नाही का ?
मग बँक हा पर्याय का सुचवते ?
२ कारणे
१ जुनी एफडी मोडून नवीन कमी रकमेची एफडी बनवणे यात बँकेला खूप कागदोपत्री काम करावे लागते
२ तुमच्या पैशावर बँक दोन टक्के एक्स्ट्रा कमवू शकते
याला quantum deposit हा अत्यंत चांगला पर्याय आहे
म्हणजे आपल्या ठेवीतील हवी तेवढी रक्कम हवी तेव्हा काढा (उरलेल्या रकमेवर व्याज चालू राहील ) आणि हवी तेव्हा त्यात रक्कम वाढवा . पण आपली बँकिंग प्रणाली अजून एवढी सक्षम झालेली नाही
त्यामुळे बँकेत एफडी करण्यापेक्षा debt based mutual fund मध्ये investment करणे कधीही श्रेयस्कर .
त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू

22/08/2018

सेव्हींग्ज आणि इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रात उतरताना सर्वप्रथम या दोन्हीतला मूलभूत फरक समजून घेणे आवश्यक आहे
आपण बोलीभाषेत बोलताना या दोन्ही शब्दांना समानार्थी शब्द म्हणून वापरतो
पण या दोन्ही मध्येही खूप खूप फरक आहे
सेव्हिंग्ज म्हणजे काय
समजा आपल्याला एक एलईडी टीव्ही घ्यायचा आहे
त्याची किंमत अंदाजे ३२०००/ रुपये आहे
तर आपण बारा महिने सुमारे २६००/ रुपये शिलकीला टाकून हा टीव्ही घेऊ शकतो
या ठिकाणी साठलेले पैसे आणि त्यावरील व्याज हे सर्व आपण खर्च करून टाकले आहे
म्हणजेच एका विशिष्ट उद्देशाने पैसे साठवणे याला सेव्हिंग्स असे म्हणतात
इन्व्हेस्टमेंट हा विषय मात्र अत्यंत वेगळा आहे
समजा आपण बँकेत दोन लाख रुपयांची fd केली तोच तर महिन्याला आपण त्यावरील व्याज घेऊ पण मूळ रकमेला आपण हात लावणार नाही
तीच गोष्ट एखाद्या आंब्याच्या बागेची त्यातून मिळणारे आंबे आपण खाऊ अथवा विकू पण बाग मात्र intact राहील
म्हणजेच इन्व्हेस्टमेंटमध्ये उत्पन्नाचा मूळस्रोत हा कायम राहतो
इन्व्हेसमेंट चे दोन प्रकार पडतात
१) रेग्युलर इन्कम आणि
२) capital appreciation
पहिल्या प्रकारात बँक एफडी,पोस्टल स्कीम्स, कसायला दिलेली शेती , घर किंवा दुकान गाळा भाड्याने देणे,
इत्यादी गोष्टी येतात तर दुसऱ्या प्रकारामध्ये सोने नाणे यांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॉट अथवा घर यामधील इन्व्हेस्टमेंट यांचा समावेश होतो
आज एवढंच पुरे

22/08/2018

सेव्हिंग्ज किंवा इन्व्हेस्टमेंट हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे
बचतीशिवाय कोणाचाही आर्थिक उत्कर्ष होऊ शकत नाही
पैशाचे योग्य व्यवस्थापन हे अत्यंत कौशल्याचे काम आहे
येणाऱ्या काही दिवसात या पेजवर सेव्हिंग आणि इन्व्हेसमेंट बद्दल काही आवश्यक माहिती दिली जाईल

Address

Kolhapur
416012

Telephone

+919049813290

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Share Mkt For Beginners posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category