S. B. Khade Mahavidyalaya, Koparde

S. B. Khade Mahavidyalaya, Koparde

Share

A Reputed Senior college. Which is under Sangrul Edu. Society. affilated to Shivaji University, kop.

23/03/2026

स. ब. खाडे महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने दि. २४-३-२०२६ रोजी 'कलारंग 2k26' हा विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी ठीक ८.०० वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी झी मराठी, सोनी मराठी, कलर्स मराठी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री मा. कल्याणी गजगेश्वर-कोटारे व सुप्रसिद्ध रंगकर्मी, अभिनेते, निर्माते मा. प्रसाद जमदग्नी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयामध्ये सकाळी ठीक ८.०० वाजता आपल्या आवडीच्या पारंपरिक पोशाखामध्ये महाविद्यालयाच्या ओळखपत्रासह उपस्थित राहावे. आणि महाविद्यालयाच्या शिस्तीचे पालन करून कार्यक्रम यशस्वी करावा.





koparde

Photos from S. B. Khade Mahavidyalaya, Koparde's post 24/02/2026

🖋️ गुरुवर्य डी. डी. आसगावकर स्मृती विशेषांक 💐

मराठी विभागाच्यावतीने गुरुवर्य डी. डी. आसगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयामध्ये गुरुवर्य डी. डी. आसगावकर स्मृती विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. या विशेषांकाचे अनावरण मा. सौ. अनु आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. यशवंत ल. खाडे, सचिव मा. आमदार प्रा. जयंत आसगावकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मा. संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.








Photos from S. B. Khade Mahavidyalaya, Koparde's post 24/02/2026

रांगोळी प्रदर्शन

            विद्यार्थिनी कल्याण मंडळ व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य डी. डी. आसगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाविद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. यशवंत ल. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव मा. आमदार प्रा. जयंत आसगावकर तसेच मा. अनु आसगावकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.








23/02/2026

कै. स. ब. खाडे आणि संत गाडगे महाराज जयंती 💐

स. ब. खाडे महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सांगरुळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सदाशिव बळवंत खाडे उर्फ स. ब. खाडे आणि संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
           या कार्यक्रमाच्या निमित्ताने कै. स. ब. खाडे आणि संत गाडगे महाराज या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व पुष्पहारही अर्पण करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निशांत गोंधळी यांनी कै. स. ब. खाडे आणि संत गाडगे महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर सांगरुळ शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये असणाऱ्या कै. स. ब. खाडे यांच्या बहुमोल योगदानाबाबत विस्तृत व विशेष माहिती दिली.
             या जयंती कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभागाच्या सदस्य प्रा. शिल्पा कांबळे यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे इतर सर्व सदस्य प्राध्यापक तसेच सर्व विभागांचे प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.







Photos from S. B. Khade Mahavidyalaya, Koparde's post 08/02/2026

गुरुवर्य स्व. डी. डी. आसगावकर साहेब १९ वा स्मृतिदिन 💐🙏








Photos from S. B. Khade Mahavidyalaya, Koparde's post 06/02/2026

सेट/ नेट मार्गदर्शन कार्यशाळा

शुक्रवार दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी IQAC, अर्थशास्त्र विभाग व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेट/ नेट मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. गजानन राशिणकर (डायरेक्टर,आयपीआर सेल, शिवाजी विद्यापीठ) हे उपस्थित होते. त्यांनी सेट परीक्षेची तयारी कशी करावी, स्वरूप, अभ्यासाची विशेष पद्धती याविषयी उचित मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. डी. बी. माने यांनी केले. आभार प्रा. व्ही. आर. पाटील यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील व प्रा. अमृता पाटील यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






Photos from S. B. Khade Mahavidyalaya, Koparde's post 06/02/2026

औद्योगिक क्षेत्रभेट

मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थशास्त्र विभाग व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना येथे औद्योगिक क्षेत्रभेट देण्यात आली. साखर कारखान्याच्या एकूणच कार्यप्रणालीचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी करावे हा या क्षेत्रभेटीमागील हेतू होता आणि तो यशस्वी झाला. याप्रसंगी बी. ए., बी.कॉम., एम. ए. व एम. कॉम. चे विद्यार्थी, अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाचे प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते.






04/02/2026

Food Festival 🍝🥘🫕🍽😋

महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्यावतीने फूड फेस्टिव्हल चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध चविष्ट-स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या विद्यार्र्थी, प्राध्यापक यांच्या रसिकतेने कॅम्पस गजबजून गेला. अनेकविध पदार्थांचा उपस्थितांनी यथेच्छ आस्वाद घेतला.
फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते संपन्न झाले. स्वागत-प्रास्ताविक विद्यार्थिनी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. शिल्पा कांबळे यांनी केले. याप्रसंगी बोलताना मा. प्राचार्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले. आभार प्रा. सारिका कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. दिपाली ताडे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.








03/02/2026

सेट, नेट मार्गदर्शन कार्यशाळा

महाविद्यालयामध्ये आयक्यूएसी, अर्थशास्त्र विभाग, कॉमर्स विभागाच्यावतीने ‘सेट, नेट मार्गदर्शन कार्यशाळा’ आयोजन... 🎤








03/02/2026

फूड फेस्टिव्हल 🥘🫕🍽️☕️सर्वांनी नक्की या आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या 😋🤟







Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


At Post Koparde, (Gaganbavda Road) Tal. Karveer, Dist. Kolhapur
Kolhapur
416205

Opening Hours

Monday 7am - 1pm
Tuesday 7am - 1pm
Wednesday 7am - 1pm
Thursday 7am - 1pm
Friday 7am - 1pm
Saturday 7am - 1pm