01/07/2026
राजे विक्रमसिंह घाटगे ॲकॅडमी कागलचा विद्यार्थी सार्थक कांबळे याची भारतीय नौदलाच्या (Indian Navy) SSR (Senior Secondary Recruit) पदासाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार श्री छ. शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी कर्नल माधव वेस्वीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी राजे ॲकॅडमीचे संचालक व टी एन सी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा तानाजी चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि तिरंग्याची शान वाढवण्यासाठी सार्थक कांबळे याची भारतीय नौदलात निवड झाल्याबद्दल राजे विक्रमसिंह घाटगे ॲकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन! हा क्षण आपल्या ॲकॅडमीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे.
जलसीमांचे रक्षण करणे हे अत्यंत जबाबदारीचे आणि खडतर काम आहे. समुद्राच्या लाटांशी मुकाबला करत देशाच्या सुरक्षेची ढाल बनावे लागणार आहे. यासाठी अफाट धैर्य, शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरपणा लागतो, तो त्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे.
हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. यासाठी त्याने कठोर मेहनत घतली होती. जिद्द ठेवली होती आणि शिस्त बाळगली होती, त्याचे हे फळ आहे.
या यशामध्ये सार्थकच्या आई वडीलांचे संस्कार, त्याच्या शिक्षकांचे मार्गदर्शन याचे ही मोठे योगदान आहे. देशाच्या रक्षणासाठी नौदलात जाण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले याचा आम्हाला विशेष आनंद आहे.
तो पूर्ण निष्ठेने त्याचे कर्तव्य बजावून आपल्या देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल या बद्दल आमच्या मनात शंका नाही.
सार्थकला उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशसेवेच्या प्रेरणादायी प्रवासाठी खूप खूप शुभेच्छा. अथांग समुद्रासारखे त्याचे कर्तृत्व आणि धैर्य विशाल होवो हीच सदिच्छा!