ज्ञान प्रबोधिनी,बाचणी

ज्ञान प्रबोधिनी,बाचणी न हीं ज्ञानात परम चक्षु:

https://youtu.be/jft4PeQPYBQ?si=fJDs_wuAuTiLv5jPज्ञान प्रबोधिनी बाचणी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्...
28/01/2025

https://youtu.be/jft4PeQPYBQ?si=fJDs_wuAuTiLv5jP

ज्ञान प्रबोधिनी बाचणी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतात बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या 12 भाषांमधून प्रजासत्ताक दिनाचा संदेश दिला. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक करा.

ज्ञान प्रबोधिनी बाचणी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यां....

प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक सारखा नसतो. म्हणूनच काही विद्यार्थी अभ्यासात पुढे जातात, आणि काही विद्यार्थी अभ्यासात...
31/05/2024

प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक सारखा नसतो. म्हणूनच काही विद्यार्थी अभ्यासात पुढे जातात, आणि काही विद्यार्थी अभ्यासात मागे राहतात. अभ्यासात पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शाळेमध्ये, क्लास मध्ये, कॉलेज मध्ये ॲडमिशन मिळते. प्रसिद्धीस आलेल्या बऱ्याच शाळा विद्यार्थ्याला प्रवेश घेताना प्रवेश परीक्षा घेतात. त्या मध्ये पात्र असलेल्याच विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होतो. मग अभ्यासात सर्वसाधारण असलेल्या किंवा अभ्यासात खूपच मागे असलेल्या विद्यार्थ्यांचं काय..?
अशा मुलांसाठी आमची *ज्ञान प्रबोधिनी* प्रशाला अभ्यासात अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे अभियान राबवत आहे.
पहिली ते आठवी पर्यंत च्या वर्गातील कोणत्याही माध्यमातील अप्रगत विद्यार्थी प्रगत बनवण्याची क्षमता घेऊन आमचा शिक्षक वर्ग वैयक्तिक लक्ष देऊन अल्प काळात विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणतो.
पाठ्यक्रमा बरोबर वक्तृत्व, कथाकथन, एकपात्री, नाट्य, खेळ, योगा अशा कला प्रकारात विद्यार्थ्याला प्राविण्य करून त्याची संस्कारक्षम जडणघडण व्हावी यासाठी आमचे शाळा व्यवस्थापन कार्यरत आहे.
मान्यतप्राप्त शाळा, राहण्याची व जेवणाची उत्तम सुविधा, विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची विश्वास पूर्ण हमी दिली जाते.
आपल्या लाडक्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंतित असलेल्या पालकांनी *ज्ञान प्रबोधिनी* मध्ये एक वेळ अवश्य भेट द्या!

*ज्ञान प्रबोधिनी*
बाचणी, ता. कागल, जिल्हा - कोल्हापूर.
अधिक माहिती साठी संपर्क - 8149182944, 7218768835

विविध स्पर्धा परीक्षेत आमच्या ज्ञान प्रबोधिनी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. अशा यशवंत विद्यार्थ्यांचे  आणि मार्ग...
14/04/2024

विविध स्पर्धा परीक्षेत आमच्या ज्ञान प्रबोधिनी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. अशा यशवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!!

30/03/2024

Holi Celebration

21/03/2024

आठवडा बाजार आणि पालक प्रतिक्रिया

आठवडा बाजार
21/03/2024

आठवडा बाजार

*आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या ज्ञान प्रबोधिनी स्कूल मध्ये ह.भ. प. मा. बाबुराव पाटील (येवती) यांचे शुभ ह...
26/01/2024

*आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या ज्ञान प्रबोधिनी स्कूल मध्ये ह.भ. प. मा. बाबुराव पाटील (येवती) यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.*
संस्थेचे पदाधिकारी, इतर सन्माननीय मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या रंगभरण,चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हास्तरीय क्रीडा तसेच वक्तृत्व स्पर्धेतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडक विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्वरा पाटील व कु. प्राची सरवळे या विद्यार्थ्यांनी केले. स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

https://youtu.be/E02m69OUEUA?si=wOKR3ZZ5JOBLF-1nज्ञान प्रबोधिनी बाचणी च्या बालकलाकारांनी सादर केलेली राम भक्त हनुमान ही ...
22/01/2024

https://youtu.be/E02m69OUEUA?si=wOKR3ZZ5JOBLF-1n

ज्ञान प्रबोधिनी बाचणी च्या बालकलाकारांनी सादर केलेली राम भक्त हनुमान ही लघु नाटिका जरूर पहा.

ज्ञान प्रबोधिनी बाचणी प्रशालेच्या वतीने दिंडनेर्ली येथे हनुमान मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करून रामभक्त हनुम....

https://youtu.be/HFoaWpuTAFI?si=xoJEVitM1znHmOmr14 वर्ष वनवासातून श्रीराम, सीता,लक्ष्मण यांचे आयोध्येत आगमन झाले. आणि आय...
22/01/2024

https://youtu.be/HFoaWpuTAFI?si=xoJEVitM1znHmOmr

14 वर्ष वनवासातून श्रीराम, सीता,लक्ष्मण यांचे आयोध्येत आगमन झाले. आणि आयोध्या वासियांनी सर्वत्र दिवे लावून त्यांचे जल्लोषी स्वागत केले. हाच देखावा आमच्या ज्ञानप्रबोधिनी बाचणी च्या विद्यार्थ्यांनी दिंडनेर्ली गावी केला. गावातील लोकांनी आयोध्या वासियांच्या त्याच भक्तीने या यात्रेचे स्वागत केले.

ज्ञान प्रबोधिनी बाचणी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्री राम सीता लक्ष्मण यांची आयोध्या आगमन यात्रा चे आयो...

वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ. आज वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला....
05/01/2024

वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ. आज वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शिक्षण विस्तार अधिकारी मा. सौ. सारिका कासोटे मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी मा. गावडे साहेब,
मा. विलास पाटील (संस्था कार्यवाह)
मा. राजेंद्र पाटील (संस्था अध्यक्ष) मा. पै. कुलदीप खोत,मा.डॉ. निशा पाटील, मा. प्रवीण पाटील,
मा. अशोक मगदूम आदी मान्यवरांचे हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्या मुलांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन शर्वरी आळवेकर आणि श्रावणी घोटणे या विद्यार्थिनींनी केले. पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय श्री. झंजे सर यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा प्रमुख अजित पाटील यांनी केले. मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी पारितोषिक वितरण चे सूत्रसंचलन केले. सान्वी मगदूम, शिवण्या नलवडे,तन्वी पाटील, आराध्या पाटील, सई घाटगे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी भाषणे सादर केली.

वार्षिक क्रीडा महोत्सव...
04/01/2024

वार्षिक क्रीडा महोत्सव...

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917218768835

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञान प्रबोधिनी,बाचणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category