18/01/2023
*"कृषीलांम" फॅमिली फार्मिंग ॲग्रीक्लिनिक आणि ॲग्रीबिझनेस सेंटर, कोल्हापूर*
कोल्हापूरच्या वैभवात पुन्हा मानाचा तुरा.. कोल्हापूरच्या ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस नोडल सेंटरचा देशात गौरव..
"कृषीलांम" फॅमिली फार्मिंग ॲग्रीक्लिनिक आणि ॲग्रीबिझनेस सेंटर, कोल्हापूर येथून प्रशिक्षित उद्योजक श्री. अक्षय गणपती पाटील यांनी टिशू कल्चर व्यवसायामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार - २०२२(प्रथम क्रमांक) तसेच सौ. अश्विनी गुरुप्रसाद पाटील यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खते व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल "राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार-२०२२" (तृतीय क्रमांक) प्राप्त झाला.
फॅमिली फार्मिंग प्रोडूसर कंपनी लिमिटेड,कोल्हापूर गेली ०९ वर्षे शेती आणि शेतकरी विकासात दिलेले योगदान आणि काळानुरूप त्यात बदल करीत शेती व शेतकरी विकासाला अधुनिकतेच्या मार्गाने नेण्यासाठी संशोधन, विस्तार व शेतकऱ्याला उद्योजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे दृश्य परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत.
देशातील कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठी महत्वाची मानली जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट अर्थात मॅनेज ही हैदराबादची सरकारी संस्था राष्ट्रीय स्तरावरील युवा कृषी उद्योजक जाहीर करते. त्यासाठी ही संस्था देशभऱात त्यांनी जे उद्योजक घडवण्यासाठी सेंटर मंजूर केलेले आहेत, त्यामधील प्रशिक्षणाचा दर्जा व त्यानुसार घडलेले उद्योजक यांचे मुल्यांकन करते. "कृषीलांम" फॅमिली फार्मिंग ॲग्रीक्लिनिक आणि ॲग्रीबिझनेस सेंटर, कोल्हापूर हे त्यापैकी एक महत्वाचे नोडल ट्रेनिंग सेंटर आहे.
सन २०२२ चा हे पुरस्कार असून या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून झाले. *दिल्लीतील आयसीएआर च्या कृषि विज्ञान भवनमध्ये (नॅशनल ॲग्रीकल्चरल सायन्स कॉम्प्लेक्स इंदरपुरी)* हा कार्यक्रम होणार पार पडला.
फॅमिली फार्मिंग प्रोडूसर कंपनी लिमिटेड कोल्हापूर सन २०१९ पासून शेतकऱ्यांना उद्योजक घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आजवर अशा १२ बॅचेस झाल्या. त्यामधून आजपर्यंत ४२० प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले. आजमितीस त्यापैकी २५७ हून अधिक उत्तम व यशस्वी व्यावसायिक , उद्योजक बनले आहेत.
हे दोन्ही युवा उद्योजक कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत अनुक्रमे ते स्वतः टिशू कल्चर लॅब तसेच शेतीपूरक औषधांचे व बी-बियाण्यांचे दुकान चालवतात. त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींहून अधिक आहे.
मा. *श्री. उदयसिंह आबासाहेब पाटील* , चेअरमन, फॅमिली फार्मिंग प्रोडूसर कंपनी लिमिटेड कोल्हापूर. शेतकऱ्यांनी आधुनिक काळाबरोबर चालायला हवे, हाच उद्देश घेऊन संस्थेने सातत्याने नवनवीन प्रयोगांचा, नवनवीन निर्णयांचा स्विकार केला व अधुनिक मंत्र शेतकऱ्यांना देऊन त्यांनी एकमेकांना प्रशिक्षित करावे हा उद्देश ठेवला. शेतकऱ्यांनी हातात हात घेऊन शेती व शेतकऱ्यांचा विकास साधावा हा ठेवलेला उद्देश आता साध्य होताना दिसू लागला आहे याचे समाधान आहे. श्री. अक्षय गणपती पाटील. व सौ. अश्विनी गुरुप्रसाद पाटील यांचे अभिनंदन.
मा. *श्री. योगेश वसंतराव पाटील*, नोडल ऑफिसर, "कृषीलांम" फॅमिली फार्मिंग ॲग्रीक्लिनिक आणि ॲग्रीबिझनेस सेंटर, कोल्हापूर - शेतीतील कोणत्याही संकल्पनांना मूर्त स्वरूप यावे, शेती व शेतकऱ्यांमधील उद्योजकतेचा प्रवास संस्थेच्या माध्यमातून अधिक सहजसोपा व्हावा यासाठी ही प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्याचा परिणाम चांगला दिसू लागला असून उद्योजक घडत आहेत, त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही चांगली घटना आहे.प्रशिक्षण समन्वयक श्री. श्रीकांत तानाजी पाटील, संचालक प्रवीण पाटील व अजित पाटील यांचे महत्वाचे योगदान लाभले.
FFPCL KOLHALAPUR
Mail : [email protected]
Web: Krushilam.in