ICS College KHED

ICS College KHED Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ICS College KHED, Education, ICS College of Arts, Commerce and Science, Khed.

आय.सी.एस.वार्ता 👇*आय.सी.एस.महाविद्यालयात ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धा संपन्न.*      खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय...
07/12/2023

आय.सी.एस.वार्ता 👇
*आय.सी.एस.महाविद्यालयात ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धा संपन्न.*
खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विभागीय स्तरीय 18 व्या आंतर महाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा वर्गातून संशोधन वृत्ती जोपासण्याच्या, तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड लागावी या हेतूने प्रतिवर्षी मुंबई विद्यापीठाकडून अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रत्नागिरी विभागीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन आय.सी.एस.महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 13 महाविद्यालयांकडून 101 प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये 223 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत दापोली अर्बन महाविद्यालय (6), गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (5), सहयाद्री महाविद्यालय सावर्डे (2), लांजा महाविद्यालय (2) डी.बी.जे.महाविद्यालय, चिपळूण (1), आय.सी.एस.महाविद्यालय, खेड (1), एस.पी.हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी (1), आणि पाटपन्हाळे महाविद्यालय (1), अशी पारितोषिके देण्यात आली. विभागीय स्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक. डॉ.सुनील पाटील, रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ.सुरेन्द्र ठाकूर देसाई, सहसमन्वयक डॉ.साठे, सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्यां प्रो.डॉ.अनिता आवटी, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक, आय.सी.एस.महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक डॉ.अमोल पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्या डॉ.अनिता आवटी यांनी अविष्कारच्या आयोजनाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला. ॲड.आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानाबरोबरच संस्कारांची जपणूक केली पाहिजे असा सल्ला देत, आपण सर्वांनी या प्रकारच्या स्पर्धेतून संशोधनात्मक वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला यांनी मुंबई विद्यापीठाने अविष्कार स्पर्धेसाठी आय.सी.एस. महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल मान.कुलगुरू व डायरेक्टर या सर्वांचे आभार व्यक्त केले, तसेच महाविद्यालय पातळीवर चालणाऱ्या संशोधनाबाबत उपस्थितांना माहिती दिली. संचालक डॉ.सुनील पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या वतीने अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल तसेच या क्षेत्रातील मुंबई विद्यापीठाचे सातत्यपूर्ण यश याची उपस्थितांना माहिती दिली व अविष्कार मध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रकल्प असले पाहिजेत? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रेरणा दिली. समारोपाच्या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अंतिम स्पर्धा ही मुंबई येथे दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.आर.एस.भालेराव यांनी केले.

Live Streaming Mission Chandrayaan 3
15/07/2023

Live Streaming
Mission Chandrayaan 3

आय सी एस महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते...
25/01/2023

आय सी एस महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयात देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी हे या समूह गीत गायन स्पर्धेचे उद्दिष्ट होते.

नासाच्या अंतराळवीर आरती पाटील यांचे आय.सी.एस. महाविद्यालयात अनुभव कथन* खेड: येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस.कला,...
12/01/2023

नासाच्या अंतराळवीर आरती पाटील यांचे आय.सी.एस. महाविद्यालयात अनुभव कथन*

खेड: येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात, महाविद्यालयाच्या सायन्स फोरम अंतर्गत, नासा अंतराळवीर आरती पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून चलचित्र स्वरूपात विद्यार्थ्यांना अंतराळ संदर्भातील विविध प्रकारची माहिती दिली. अंतराळात जाताना फिजिकल फिटनेस ची आवश्यकता, विविध स्पेस सूट आणि त्यांची बनावट, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, त्यात स्पेस शॉट ट्रेनिंग, झिरो ग्रॅव्हिटी ट्रेनिंग, सरफेस वॉटर ट्रेनिंग, अंडरवॉटर ट्रेनिंग, रॉकेट डिझाईनिंग याबाबत सविस्तर माहिती दिली व तेथील आपले अनुभव कथन केले.
याच वेळी एक मंगळ मोहिमेचा व्हिडिओही त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवला आणि त्याच वेळी त्याची सविस्तर माहितीही दिली. एखादे अंतराळ यान चालवताना बाराशे बटनांची माहिती असावी लागते. त्याच बरोबर अंतराळ प्रवासात उभ्या स्थितीत 2 तासांची झोप कशी घ्यावी लागते? तेथील वातावरण कसे असते? आणि तो प्रवास कसा असतो? हे सविस्तर सांगितले. स्वर्गीय कल्पना चावला यांच्या यानाला पृथ्वीवर येण्यासाठी केवळ 5 ते 7 सेकंद असताना झालेला अपघात, त्याची कारणे सविस्तरपणे सांगितली. हा सर्व थक्क करणारा प्रवास ऐकताना सर्व श्रोते काही काळ स्तब्ध झाले होते. तुमची स्वप्नं तुम्ही पुर्ण करू शकता, फक्त त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, सहजीवन शिक्षण संस्थेचे खजिनदार श्री. विलासभाई बुटाला, आराधना चाळके, मिनू प्रभाकरन, मोहन पाटील, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.ए.एम.शेख, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एच.पी.थोरात यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होईल व यातून आमचे विद्यार्थी प्रेरणा घेतील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल पाटील यांनी केले.

Lecture on Personality Development for NSS Students at Koregaon
05/01/2023

Lecture on Personality Development for NSS Students at Koregaon

Celebration of constitution day
26/11/2022

Celebration of constitution day

*आय.सी.एस.च्या वाचन कट्ट्यावर 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा*
15/10/2022

*आय.सी.एस.च्या वाचन कट्ट्यावर 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा*

*आय.सी.एस.मध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार*खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयात आज माजी सैनिकांच...
02/10/2022

*आय.सी.एस.मध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार*
खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयात आज माजी सैनिकांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य व कंपनी कमांडर, कॅप्टन डॉ.एच.पी.थोरात यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व देशातील आपले संरक्षण करणारे सैनिक यांचे ऋण व्यक्त केले आणि या सत्कार समारंभाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. यावेळी नुकतेच सेवानिवृत्त झालेले सी.एच.एम.संतोष मोरे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. 19 महा.बटालियन एन.सी.सी., कराड येथे कार्यरत असताना या महाविद्यालयाच्या एन.सी.सी छात्रांना त्यांनी यापूर्वी प्रशिक्षण दिले होते. त्यांचे बंधू सेना मेडल विजेते बजरंग मोरे यांचाही सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सकाळ समुहातर्फे उत्कृष्ट चेअरमन हा पुरस्कार प्राप्त खेड येथील मुरली मनोहर पतसंस्थेचे चेअरमन श्री.संजय मोदी यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहजीवन शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक अध्यक्ष सुधीर भोसले, सत्कार मूर्ती संतोष मोरे. संस्थेतर्फे संस्था चेअरमन ॲड.आनंदराव भोसले त्याचबरोबर संस्था सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये त्यांनी सहजीवन शिक्षण संस्थेचा सैनिकांप्रती असणारा आदरभाव व्यक्त केला. तसेच सैन्यामध्ये काम करणाऱ्या मोरे कुटुंबीयांतील तीनही भावंडांचे व त्यांच्या वडिलांचे कौतुक केले. संजय मोदी यांनी सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य व महाविद्यालयाच्या सर्व घटकांचे मनापासून आभार मानले आणि देशभक्तीपर गीतातून सैन्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी एन.सी.सी.छात्र, एन.एस.एस.स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी एन.सी.सी. छात्रांनी केलेले संचलन लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.सी.सी.विभागाचे सदस्य डॉ.अमोल पाटील, डॉ.सचिन सागर, अधीक्षक संतोष सकपाळ व मुख्य लिपिक डी.एम.शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी व वरिष्ठ प्राध्यापक डॉ.संजय पाटोळे यांनी केले.

Celebtarion of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti
02/10/2022

Celebtarion of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti

Celebration of NSS Day...
26/09/2022

Celebration of NSS Day...

One Day National Level Workshop Organized by Department of IT and BMS.
20/09/2022

One Day National Level Workshop Organized by Department of IT and BMS.

आय.सी.एस महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न
16/09/2022

आय.सी.एस महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न

Address

ICS College Of Arts, Commerce And Science
Khed
415709

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICS College KHED posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ICS College KHED:

Shortcuts

Share

Category