25/06/2025
1969 च्या मॅट्रिक माजी विद्यार्थ्यांची एल.पी. प्रशालेस सदिच्छा भेट
आज बुधवार दिनांक 25/06/2025 रोजी 1969 च्या मॅट्रिक माजी विद्यार्थ्यांची शाळेमध्ये सदिच्छा भेट झाली यामध्ये दुबई स्थित व्यावसायिक श्री अभय पाटणे,शाळेचे माजी प्राध्यापक मुरलीधर लड्डा सर,श्री. रमेश पंदेरे भोसते, श्री विनायक तोडकरी,श्री कुमार तलाठी प्रसिद्ध खेड उद्योजक,श्री सुभाष पाटणे खेड या नामवंत मान्यवरांनी प्रशालेसाठी काहीतरी चांगले करण्याचा मानस घेऊन आज प्रशालेला भेट दिली त्याप्रसंगी यांनी प्रशालेच्या दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून रक्कम स्वरूप भेटवस्तू दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले याशिवाय या सर्व मान्यवरांनी प्रशालेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यासाठी वेळोवेळी जी मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत असे मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या या गुणगौरव समारंभ प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब भगत सर ,पर्यवेक्षक श्री. शिवाजी चव्हाण सर शिक्षक प्रतिनिधी श्री मसेकर सर, खेडेकर सर, निर्मळ सर सौ चिंगळे मॅडम आणि इतर सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.