New English School Irali

New English School Irali New English School Irali

Note: This account is set up by a new English school irali and not the school authorities.

Any views and discussions posted here are those of the author and do not necessarily represent the official position and stand of the sch

13/05/2025

न्यु इंग्लिश स्कुल,इरळीचा दहावीचा 100% निकाल. सर्व यशस्वी विद्याथ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रथम क्रमांक-जयवर्धन तानाजी पाटील 91.60%
द्वितीय क्रमांक-वेदिका सुनिल लवटे 89.40%
तिसरा क्रमांक-वर्षा बाळासो खरात 88.80%
चौथा क्रमांक -रुतुजा काकासो पाटील 84%
पाचवा क्रमांक-तनुश्री वैभव संकपाळ 82.40%

इरळी आणि परिसरातील एक  पिढी घडवणारे न्यू इंग्लिश स्कूल इरळीचे सहाय्यक शिक्षक श्री विनायक मारुती गुरव सर व अशोक नामदेव पा...
31/05/2024

इरळी आणि परिसरातील एक पिढी घडवणारे न्यू इंग्लिश स्कूल इरळीचे सहाय्यक शिक्षक श्री विनायक मारुती गुरव सर व अशोक नामदेव पाटील सर आज प्रदिर्घ सेवेनंतर वयोमानानूसार सेवानिवृत होणार.

इरळी हायस्कूल ची स्थापना 1992 साली झाली आणि या शाळेचा पाया असणारे दोन किर्तीमान शिक्षक म्हणजे अशोक नाना आणि गुरव सर....
मराठी कशी शिकवली जावी आणि मराठी सारख्या भाषा विषयाला ज्यावेळी 80 गुण पडणे म्हणजे खुप मोठी गोष्ट होती अश्या वेळी आपल्या विद्यार्थी मुलांना बरोबर पैज लागणारे अनोखे शिक्षण अशोक नाना ...
मराठीतील प्रत्येक धडा किंवा कविता शिकवत असताना त्याचा पंढरपूराशी संदर्भ घालणारा वारकरी संप्रदाय जपणारा शिक्षक म्हणजे आमचे गुरुवर्य नाना

वर्गात हिंदी विषय आणि ग्राउंड वर चॅम्पियन शिक्षक असणारे आमचे गुरव सर....तितकाच कडक इरळी आणि आसापाच्या ग्रामीण भागातील जवळपास 50-60 मुलाच्या आर्मी आणि पोलिस भरतीमध्ये योगदान असणारे.....
नॅशनल लेव्हल पर्यंत खेळाडू घडवणारे क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांची स्वतची ओळख असणारे आमचे गुरू.... पैलवान मुलांवर विशेष प्रेम करणार शिक्षक ...

हातातील छडी पूर्ण झोकात उचलून मारणारा शिक्षक आता काळाच्या ओघात आणि पालकांच्या रोखात बाजूला गेला पण छडी आणि विद्यार्थी मध्ये तितकीच अभ्यासाची गोडी निर्माण करणारे शिक्षक आता हळू हळू कमी होत आहेत......

छडी वाजे छमछम विद्या येई घमगम ही पिढी आणि त्यांचे शिक्षक आता आपल्या आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू करत आहेत त्यांना न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेल्या आणि शिकणाऱ्या तमाम विद्यार्थीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
शिक्षक श्री विनायक मारुती गुरव सर
श्री अशोक नामदेव पाटील सर

दिगंबर पाटिल.
सॉफ्टवेअर इंजिनिअर

27/05/2024

दहावी निकाल
1. पूजा संभाजी खरात 83.60%
2. श्वेता विशाल बंडगर 80.00 टक्के
3. आकांक्षा जनार्दन पाटील 77.00%

Congratulations 🎉👏🎉
16/09/2023

Congratulations 🎉👏🎉

ज्यांच्यामुळे आम्ही सर्व घडलो.
05/09/2021

ज्यांच्यामुळे आम्ही सर्व घडलो.

29/07/2020

✍️💐💐💐💐💐💐💐
न्यू इंग्लिश स्कूल इरळी। हायसकूल

Result 2020

1) बालिका हणमंत ओलेकर 87.20%
2) जोती विलास माने 81%
3) प्रतिक पांडुरंग पाटील 80%

वरीलप्रमाणे पहिले तीन क्रमांक आहेत
शाळेचा निकाल 92.85% लागला
28 पैकी 26 पास
Congratulation 😘✍️✍️💐💐💐💐💐💐💐

19/03/2020

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आमच्या शाळेचा गुणवंत माजी विद्यार्थी कु. सत्यशील जयवंत पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत फौजदार (पोलिस उपनरीक्षक ) पदी राज्यात १५ व्या क्रमांकाने निवड झाले बद्दल आज आमच्या शाळेचे संस्थापक माननीय बळवंत बापू यमगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळची उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आमच्या शाळेचा गुणवंत  माजी विद्यार्थी कु. सत्यशील जयवंत पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ...
19/03/2020

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐आमच्या शाळेचा गुणवंत माजी विद्यार्थी कु. सत्यशील जयवंत पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत फौजदार (पोलिस उपनरीक्षक ) पदी राज्यात १५ व्या क्रमांकाने निवड झाले बद्दल आज आमच्या शाळेचे संस्थापक माननीय बळवंत बापू यमगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळची उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

09/02/2020

*जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे*

येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.

शिक्षण हक्क कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसलेआहे . शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.

*म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची.* विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. *शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात.* *मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो.* विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही. असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. *आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते. मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.*

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . *ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो.* स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. *ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.*

. *जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात* आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत आहे .

शाळेचे वार्षिक स्नेह -संमेलन 2019-2020काही क्षण -चित्रे
07/02/2020

शाळेचे वार्षिक स्नेह -संमेलन 2019-2020
काही क्षण -चित्रे

शाळेचे वार्षिक स्नेह -संमेलन 2019-2020काही क्षण -चित्रे
07/02/2020

शाळेचे वार्षिक स्नेह -संमेलन 2019-2020
काही क्षण -चित्रे

Address

Irali , Kavathe Mahankal
Kavathe-Mahankal
416405

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School Irali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to New English School Irali:

Shortcuts

Share

Category