Dr.Durande Gurukul ,korti,karmala

Dr.Durande Gurukul ,korti,karmala victory of symbol ✌🤗

🚀 🪩डॉ. दुरंदे गुरुकुलचा विद्यार्थी जाणार इस्रो सफरीवर! 🚀कोर्टी येथील परिवर्तन प्रतिष्ठान संचालित डॉ. दुरंदे गुरुकुलच्या ...
14/05/2026

🚀 🪩डॉ. दुरंदे गुरुकुलचा विद्यार्थी जाणार इस्रो सफरीवर! 🚀

कोर्टी येथील परिवर्तन प्रतिष्ठान संचालित डॉ. दुरंदे गुरुकुलच्या विद्यार्थ्याने पुन्हा एकदा शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. इयत्ता सातवीतील विद्यार्थी स्वराज गोवर्धन शिंदे याची प्रतिष्ठित इस्रो सेंटर सहलीसाठी निवड झाली आहे.

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीतून केवळ ३२ विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली असून, सोलापूर जिल्ह्यातून डॉ. दुरंदे गुरुकुलचा विद्यार्थी स्वराज गोवर्धन शिंदे याने एकमेव स्थान पटकावले आहे.

हा अभ्यास दौरा ४ जून ते ७ जून दरम्यान आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना गुजरात येथील इस्रो सेंटरला भेट देण्याची संधी मिळणार आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन प्रकल्प यांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. तसेच रॉकेट प्रक्षेपण प्रक्रिया पाहण्याची, विज्ञान विषयक कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याची आणि शास्त्रज्ञ व तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने अशा सहलींचे आयोजन करण्यात आले आहे असे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेच्या संस्थापकांनी सांगितले आहे. स्वराजच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे उपाध्यक्ष डॉ. विद्या दुरंदे व मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

स्वराजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यात तो विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 🌟

*📚 डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू 📚*परिवर्तन प्रतिष्ठान संचालित डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी (ता. क...
14/05/2026

*📚 डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू 📚*

परिवर्तन प्रतिष्ठान संचालित डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. “शिक्षणाबरोबरच गुणवत्तेला आकार देणारं संकुल” या ध्येयवाक्याने कार्यरत असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे.

विद्यालयामध्ये CBSE बोर्ड आधारित अभ्यासक्रमासह सेमी इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. नर्सरी ते इयत्ता सहावीपर्यंतच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू असून मर्यादित प्रवेश असल्याने पालकांनी लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी Phonics, Abacus, Cursive Writing यांसारख्या उपक्रमांची सुरुवातीपासूनच अंमलबजावणी केली जाते. तसेच स्वतंत्र संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, बालवाचनालय, बालसंस्कार वर्ग, मंथन, लक्षवेध, गुरुकुल, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि नवोदय व स्कॉलरशिप तयारीसाठी स्वतंत्र बॅचची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

RTE अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश सुविधा उपलब्ध असून, प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवून विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी बससेवाही उपलब्ध आहे.

पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रशालेचे अध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे, उपाध्यक्ष सौ .विद्या दुरंदे,व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी शिंदे मॅडम केले आहे.

*📍 पत्ता : डॉ. दुरंदे गुरुकुल, पारेवाडी रोड, कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर*

*📞 संपर्क : 9730320204,99608 68764,9960455946

11/05/2026
*🏆 लक्षवेध 2026 – अभिमानाचा सुवर्ण क्षण!*डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी येथील इयत्ता पहिली ते सातवी मधील चिमुकल्या विद्यार्थ...
11/05/2026

*🏆 लक्षवेध 2026 – अभिमानाचा सुवर्ण क्षण!*
डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी येथील इयत्ता पहिली ते सातवी मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी “मंथन,लक्षवेध , गुरुकुल राज्यस्तरीय सामान्य ज्ञान (प्रज्ञाशोध) परीक्षेमध्ये मिळवलेले यश हे केवळ गुणांचे नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा भक्कम पाया आहे. एवढ्या लहान वयात दाखवलेली जिद्द, मेहनत आणि अभ्यासाची आवड खरोखर प्रेरणादायी आहे.
या यशाच्या शिखरावर झळकणारी
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत.......

*उजळा आठवणींचा*💫💫🔴*सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न*🔴*11 एप्रिल 2026 रोजी कोर्टी येथील डॉ. दुरंदे ...
12/04/2026

*उजळा आठवणींचा*💫💫
🔴*सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न*🔴
*11 एप्रिल 2026 रोजी कोर्टी येथील डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी शाळेत इयत्ता* *सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व युकेजी क्लास ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कोर्टी गावच्या आदर्श सरपंच सौ भाग्यश्री मेहेर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.विद्या.दुरंदे तसेच दोन्हीही वर्गाचे आदर्श पालक उपस्थित होते.*
*कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.*
*प्रमुख पाहुण्यांनी 'आत्मविश्वास आणि चिकाटी' या विषयावर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या समारंभाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या..*✍️.

*🏆 डॉ. दुरंदे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा राज्यभर झळकलेला यशाचा झेंडा! 🏆*सोलापूर जिल्ह्यातील डॉ. दुरंदे गुरुकुल या शैक्ष...
12/04/2026

*🏆 डॉ. दुरंदे गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा राज्यभर झळकलेला यशाचा झेंडा! 🏆*

सोलापूर जिल्ह्यातील डॉ. दुरंदे गुरुकुल या शैक्षणिक संस्थेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यस्तरीय विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर राज्यात मानाचे स्थान मिळवत संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.

श्रेया वैजनाथ दुरंदे (इयत्ता पहिली) हिने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात सहावा क्रमांक मिळवून अत्यंत लहान वयात मोठे यश संपादन केले.

स्वराज गोवर्धन शिंदे यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.

लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत देखील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली—
सार्थक सागर हजारे – राज्यात चौथा, जिल्ह्यात दुसरा
आर्वी शिवाजी झाकणे – राज्यात पाचवी, जिल्ह्यात तिसरी
राजवीर श्रीकांत साखरे – राज्यात सहावा, जिल्ह्यात चौथा
शिवराज विशाल जगताप – राज्यात सहावा, जिल्ह्यात चौथा
स्वराली हनुमंत पाडुळे – राज्यात नववी

या यशामागे विद्यार्थ्यांची अथक मेहनत, डॉ. दुरंदे गुरुकुलच्या शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि पालकांचे भक्कम पाठबळ आहे. ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावर यश मिळवणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.

डॉ. दुरंदे गुरुकुल आज केवळ शिक्षण देत नाही, तर गुणवत्तापूर्ण, स्पर्धात्मक आणि उज्ज्वल भविष्य घडवणारे विद्यार्थी तयार करत आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि परिवर्तन प्रतिष्ठान व डॉ. दुरंदे गुरुकुल संकुलाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल दुरंदे व उपाध्यक्ष डॉ. विद्या दुरंदे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छ दिल्या. 🌟

*गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत डॉ. दुरंदे गुरुकुलचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.**प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रज्ञ...
26/03/2026

*गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत डॉ. दुरंदे गुरुकुलचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.*

*प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.* *विद्यार्थी राज्य , जिल्हा व तालुका केंद्राच्या यादीमध्ये आहेत. इयत्ता तिसरी ते आठवी 300 गुणांची परीक्षा तसेच इयत्ता पहिली दुसरी 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली*
*यामध्ये*
✨*स्वराज गोवर्धन शिंदे (254 गुण) राज्यात 3रा*
✨*श्रेया वैजनाथ दुरांदे 92 राज्यात 5वी*
✨ *समर्थ नवनाथ अभंग (7वी) 142 करमाळा तालुक्यात पहिला*
✨*सुरज विठ्ठल दुरंदे केंद्रात तिसरा*
तसेच
*शिवराज विशाल जगताप( 1ली)*
*राजवीर श्रीकांत साखरे*(1ली)
*शरण्या विशाल चव्हाण* (1ली)
*श्रेयस वैजनाथ दुरंदे*( 3री)
*शौर्या अजित पाटील*(3री)या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे..
*प्रशालेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.*
सर्व विद्यार्थ्यांनाचे खूप खूप अभिनंदन*💐💐💐💐🥳

"🎶 *Celebrating 79 Years of Freedom! 🇮🇳DR DURANDE GURUKUL KORTI Our school's Interclass Patriotic Song Singing Competiti...
16/08/2025

"🎶 *Celebrating 79 Years of Freedom! 🇮🇳
DR DURANDE GURUKUL KORTI
Our school's Interclass Patriotic Song Singing Competition was a grand success! 🎶 Students from all classes showcased their singing talent and love for the country, filling the atmosphere with emotion and reverence.

Through melodious voices and synchronized rhythms, our young patriots celebrated unity in diversity and honored the sacrifices of our freedom fighters. 🙏

A heartfelt tribute to our great nation! 🌟

16/06/2025

Welcome to school # # # # #
Dr.Durande Gurukul Korti
Ay 2025-26🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳

*National Science Day Celebration in School*Witness the enthusiasm radiating from the National Science Day celebration a...
01/03/2025

*National Science Day Celebration in School*

Witness the enthusiasm radiating from the National Science Day celebration at Dr Durande Gurukul Korti

Students embraced a day of discovery, diving into hands-on experiments, engaging activities, and captivating demonstrations. The event was a vibrant showcase of curiosity, wonder, and the sheer joy of exploring the wonders of science in a fun-filled atmosphere!

*Admissions Open

Address

At-post Korti, Tal-Karmala, Dist-solapur
Karmala
413203

Telephone

+919960455946

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Durande Gurukul ,korti,karmala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share