Aneetta Bora

Aneetta Bora ARIHANT SUPER CLASSES
ANITA S BORA( M.com.) Navi peth Main Road Karjat

08/11/2025

पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावावा आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फुल देखील तेथे वाहवे आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणे

वाचताना काही जणांना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल..पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्या शिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी " पाणी" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले, आणि त्या नंतर चक्क काही धार्मिक पुस्तकां मध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले..

ते सोप्यात सोप्पे करून खाली देत आहे.. नक्की वाचा..

१)पाणी म्हणजे जीवन..पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते.

२)पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात, किंवा ज्या मानसिक स्थिती मध्ये आपण पाणी पितो,त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो.

३)पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या उर्जे प्रमाणे बदल होत असतात, आणि त्या बदला प्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते .

४)पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरीराचा जवळपास ७०-७५% भाग हा पाण्याने बनलेला आहे.म्हणजेच, शरीराचे कार्य कसे चालावे हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो, तेच ठरवत असते.

५)पाणी पितानाचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर, पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो.. आणि जे प्रत्यक्षात मायक्रो स्कोप खाली बघता सुध्धा येते.

६) तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल, आणि हातातील पाण्या विषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असाल, तर गढूळ किंवा दूषित पाणी देखील तुम्हाला काहीही अपाय करू शकत नाही; आणि तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असेल, आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्या विषयी बेफिकीर असाल तर अतिशय शुध्द पाणी देखील प्रचंड अपायकारक. ठरू शकते.

७)पाणी हे "जिवंत" असून, मानवाची मज्जासंस्था ज्या प्रमाणे कार्य करते, त्याप्रमाणे पाणी आणि त्याची "पेशिसंस्था" करू करते.

८) जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मना मध्ये आणल्या जातात, त्या पाण्याच्या पेशींचा किंवा कणांचा (molecule) आकार खूपच सुंदर असतो, आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात, त्या पाण्याच्या कणांचा आकार खूपच विचित्र आणि ओबड धोबड असतो.

९) ज्याप्रकारे पाणी पिताना तुम्ही पाण्याला "ट्रीट" करता, पाणी ते खूप जास्त काळापर्यंत " लक्षात ठेवते" आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते.

१०) पाण्याचा विचार सध्या " liquid computer" म्हणून देखील केला जात असून त्यामध्ये पाण्याचा " लक्षात ठेवणे(memory)" हा गुणधर्म वापरला जात आहे.

११) तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे, " तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे" या सारख्या विविध "Water Therapy सध्या पाण्याच्या याच गुणधर्मांचा वापर करून उदयास येत आहेत.

१२) ही सगळी वैज्ञानिक माहिती असून, ज्यांना अजून डिटेल माहिती पाहिजे असेल, त्यांनी नेट वरून डॉ. मासारू इमोटो यांचे पाण्यावरील संशोधन शोधून वाचावे.

तर आता..या पाण्याच्या दिव्य आणि शक्तिशाली क्षमतांची सांगड आपल्या संस्कृती आणि चालिरितींशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर जे काही हाती लागले, त्यावरून मी खालील गोष्टी. गेली सहा महिने करीत आहे.

१)पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवूनच साठवावे..आणि शक्यतो तांब्याच्या ग्लास ने च प्यावे. कारण तांबे हा धातू ऊर्जेचा "सुवाहक" आहे.

२)रोज रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे.

३)त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गळून भरावे.

४) यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फुल ठेवावे, आणि पाण्या विषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचे भाव आणून हात जोडावेत. (आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आभारी आहोत असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता.)

५) सकाळी उठल्या नंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.

६)पाणी पिण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे दोन हातांच्या ओंजळीत घेऊन पिणे.. परंतु ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे पाणी पिताना, ज्या भांड्यामध्ये, किंवा पेल्यामध्ये प्याल, तो दोन्ही हातांनी पकडून पाणी पिणे.

७) पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना आहेत याची खात्री करूनच पाणी प्यावे.

८) हीच गोष्ट कोणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठले पाणी पिण्याची वेळ आली तर जाणीव पूर्वक थोडी जास्त वेळ करावी.

९)केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे. सारखे सारखे विनाकारण पिऊ नये. 🥛

१०)आहारामध्ये पाणी जास्त प्रमाणात (८०-९०%) असलेल्या घटकांचा म्हणजेच फळांचा.. जास्तीत जास्त समावेश करावा..

या प्रकारे पाणी पिण्यामुळे आणि वर दिलेल्या सर्व गोष्टी गेले सहा महिने सलग केल्यामुळे "पहिल्या दिवसा पासून" झालेले फायदे.:

१) माझी लहान मुलगी, जी दर महिन्याला आजारी पडत होती, आणि तिला अँटिबायोटिक्स दर महिन्याला द्यावे लागत होते, ते पूर्ण बंद झाले.

२) माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले, जे काही महिन्यांपूर्वी प्रचंड बिघडलेले होते.

३) माझ्या घरातील लोकांचा acidity चा त्रास जवळपास बंद झाला आहे.

४)रोज सकाळी घरातील वातावरण खूपच छान, हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते .

५)माझा पाण्याकडे, आणि एकूणच स्वयंपाक घराकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रचंड बदलला आहे.

६)एखादे दिवशी दिवा लावायचा विसरला, तर पाण्याच्या चवीमध्ये जाणवण्या इतका फरक आहे.

हा लेख काँपी पेस्ट केलेला आहे.
हा लेख डॉ.गौरी कैवल्य गायकवाड यांचा आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

27/09/2025

नवरात्री के 9 दिन हर देवी का आशीर्वाद

झुबीन गर्ग: एका बंडखोर गायकाचा शोधमी खरं सांगतो, झुबीन गर्ग हे नाव मी पहिल्यांदा नीट ऐकलं ते त्यांच्या निधनानंतरच. सोशल ...
27/09/2025

झुबीन गर्ग: एका बंडखोर गायकाचा शोध

मी खरं सांगतो, झुबीन गर्ग हे नाव मी पहिल्यांदा नीट ऐकलं ते त्यांच्या निधनानंतरच. सोशल मीडियावर सतत लोकांच्या श्रद्धांजलीचे पोस्ट, व्हिडिओ आणि डोळ्यात पाणी आणणारे संदेश दिसत होते. कुतूहल म्हणून शोध घेतला, तर कळलं की १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्नॉकर करताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बातमी बाहेर येताच आसाममध्ये लोक अक्षरशः रस्त्यावर उतरले. लाखो चाहते त्यांच्या गाण्यांना, विचारांना आणि त्यांच्या कामाला श्रद्धांजली वाहू लागले.

गाणी आणि संगीताची दुनिया: जुबीन गर्गचं संगीत म्हणजे एक वेगळंच विश्व. त्याने तब्बल ३८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आणि ४० हून जास्त भाषा आणि बोलींमध्ये गायलं. ही आकडेवारीच थक्क करणारी आहे. त्याची शैलीही खूप वैविध्यपूर्ण होती. हिंदी पॉप, बॉलिवूडची हिट गाणी, आसामची लोकसंस्कृती, धार्मिक कीर्तनं, सूफी भावगीतं… सगळं काही त्याच्या आवाजात जिवंत झालं.

बॉलिवूडमध्ये “या अली” सारखं गाणं त्याचं सुपरहिट झालं, पण त्याने स्वतःला कधीही फक्त मुंबईच्या दुनियेत अडकवून ठेवलं नाही. उलट त्याने नेहमी आसामच्या मातीशी स्वतःला बांधून ठेवलं. त्याच्या Mission China आणि Kanchanjangha सारख्या चित्रपटांनी आसामी चित्रपटसृष्टीला नवा जीव दिला.

त्याच्या गाण्यांत बिहू, बोरगीत, तोकारी सारख्या आसामच्या पारंपरिक संगीतप्रकारांना जागा होती. तो नामकीर्तनसुद्धा म्हणायचा आणि सूफी जिकीरलाही आवाज द्यायचा. म्हणजे कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माणसाला त्याच्या गाण्यांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं.

बंडखोर आवाज: पण झुबीन फक्त गायक नव्हता. तो समाजाचा आणि राजकारणाचा आवाजही होता. कोणत्याही पक्षाचा माणूस नसूनही तो CAA विरोधी आंदोलनात आघाडीवर दिसला. त्याचं गाणं Politics Nokoriba Bondhu हे २०१९ मधल्या आंदोलनांचं घोषवाक्य बनलं. तो उघडपणे म्हणायचा – “CAA आम्ही मान्य करणार नाही.”

आसाममधल्या आदिवासी, जमातींचे प्रश्न, पर्यावरणाचे मुद्दे, बेरोजगारी, गरीब कलाकारांची मदत… या सगळ्यावर तो सरळ भाषेत बोलायचा. “हे आदिवासी रे भैया मान” हे गाणं त्याने खास साद्री भाषेत गायलं आणि आदिवासी समाजाला आवाज दिला.

त्यामुळे लोक त्याला “त्यांचा गायक” मानायचे. सरकारला तो अनेकदा त्रासदायक होता, पण लोकांसाठी तो आधार होता.

जात-पात नाकारणारा कलाकार: जुबीनचा अजून एक पैलू मला फार भावला. तो जन्मला ब्राह्मण कुटुंबात, पण त्याने लहानपणापासूनच जातीय ओळख नाकारली. तो उघडपणे म्हणाला – “मी फक्त माणूस आहे. मला कोणत्याही जाती-धर्मात बांधून ठेवलं जाणार नाही.”

त्याने स्वतःला समाजवादी घोषित केलं. ब्राह्मण ओळख टाकून दिली. आणि लोकांनी त्याला त्याबद्दल अजिबात नाकारलं नाही. उलट त्याच्या या धाडसामुळे लोकांचं प्रेम अजून वाढलं. त्याच्या अंत्यसंस्कार सुरू होते, तेव्हा गर्दीतले लोक त्याचं प्रसिद्ध गाणं “मायाबिनी रातीर बुकत” मोठ्याने गात होते. हे पाहून जाणवलं की तो खरोखरच बंडखोर होता आणि लोकांनी त्याची ती ओळख जपली.

सर्वांना जोडणारा पूल: जुबीनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो सगळ्यांना जोडत होता. आसाममधल्या वेगवेगळ्या जमाती, भाषा, धर्म, गट – सगळ्यांना त्याने आपलं मानलं. “मी आसाम आहे” हे त्याचं विधानच त्याच्या आयुष्याचं घोषवाक्य होतं.

त्याच्या गाण्यांशिवाय विवाहसोहळा अपूर्ण वाटे, निदर्शने अधुरी वाटत, उत्सव ओसाड वाटत. एका ख्रिश्चन पत्रिकेनं लिहिलंय – “झुबीन गर्ग फक्त गायक नव्हता, तर तो एक सांस्कृतिक सेतू होता.”

स्थानिक संस्कृतीशी नातं: हिंदी गाणी हिट होऊनही झुबीन कधी स्वतःला बॉलिवूडचा स्टार मानला नाही. तो नेहमी म्हणायचा – “मी आसाम आहे. मी झुबीन दा आहे.”
एकदा बिहू महोत्सवात आयोजकांनी त्याला फक्त आसामी गाणी गा असा आग्रह केला. त्यावर त्याने हसतच उत्तर दिलं – “मी १६,००० गाणी गायलेला आहे, तू मला काय गाणार ते सांगणार नाहीस.” त्याच्या या बंडखोर वृत्तीमुळेच तो अधिक प्रिय झाला.

आसामचं अश्रू: आणि मग जेव्हा तो गेला, तेव्हा आसाम अक्षरशः रडला. राज्यात तीन दिवस शोक जाहीर झाला, शाळा-कॉलेजं बंद राहिली. गुवाहाटीच्या स्टेडियममध्ये त्याचं पार्थिव दोन दिवस लोकांसाठी ठेवलं आणि लाखो लोक श्रद्धांजली द्यायला आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एका वेळी पंधरा लाख लोक एकत्र जमले होते.

लोक “जॉय झुबीन दा” असं ओरडत होते, हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन एकमेकांना देत होते, त्याची गाणी गुणगुणत होते. अखेर सरकारी सन्मानाने २१ तोफांच्या सलामसह त्याचं अंत्यदहन झालं. मुख्यमंत्रीदेखील मान्य करायला भाग पडले की, “जनतेच्या भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत.”

माझ्यासाठी
मी गैर-आसामी असूनही झुबीन गाण्यामुळे मला आसामची नवी ओळख दिसली. त्याच्या गाण्यांत मला त्या समाजाचा आत्मा दिसला. जातपात मोडून काढणारा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणणारा हा कलाकार खरोखरच वेगळा होता... आणि अशा प्रकारच्या गायकाला आपला मानणारी जनता ही कळली... आपल्याकडे मात्र सगळं विभागलेलं आहे... असा बांधुन ठेवणारा दुवा दिसत नाही... सगळेच विभाजक आजूबाजूला...

त्याच्या मृत्यूनंतर आसामनं केवळ एक गायक गमावला नाही, तर एक बंडखोर आवाज हरवला. पण त्याची गाणी, त्याचे विचार अजूनही जिवंत आहेत. लोकं अजूनही त्याच्या आठवणीत गातायत आणि म्हणतायत – “झुबीन दा अजून आमच्यासोबत आहे.”

सद्याच्या चाटूकारीतेच्या जगात, देशात इतर भाषेत असा कोणता गायक आहे का?

- SG

Extra: माझा आसामचा मित्र म्हणाल आम्ही तीन-चार दिवस घरात जेवलो नाही, कोणती घरातला व्यक्ती गेल्याचा अनुभव येतोय... रविश कुमारने पण कार्यक्रम केला... पण मला सगळ्यात ज्यास्त भावला तो डॉ माद्री काकोटी (Dr Medusa) यांचा रडत रडत अतिशय भावनिक व्हिडीयो... तो पाहतांना आपणही भावनीक होतो...

17/03/2025




16/03/2025
16/03/2025

🚩 *श्रमण संघ जयवंत हो* 🚩
*संथारा समाचार*
*आनंद - उज्वल - प्रमोद कुल* की ज्येष्ठ सतियाजी विदुषी उपप्रवर्तिनी *डाॅ पू श्री प्रियदर्शनाजी म सा*,(छोटे बाई म सा.) इन्हें महाराष्ट्र प्रवर्तक *प पू श्री कुंदनऋषिजी म सा* इनके मुखराविंद से आज सुबह 9:35 बजे संथारा व्रत के पच्चक्खान दिये गये है । महासतीजी कोथरुड जैन स्थानक (पुना) में विराजमान है। सभी दर्शन का लाभ लेवे।
🙏 अनुमोदना 🙏

16/03/2025

आमच्या आई / बाई च्या वाढदिवशी आपण सर्वांनी विवीध माध्यमातून शुभेच्छां चा वर्षाव केलात.खूप मोठं सौभाग्य आमचं सर्वांचं कि आपणा सर्वांचा प्रत्यक्ष,परोक्ष सहभाग लाभला.आपणा सर्वांचे प्रेम तर आहेच; ते असेच वृद्धिंगत होत रहावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आपणा सर्वांचे खुप खुप धन्यवाद। ✍️🤟🤘🙏🏼🙏🏼✨️✨️✨️

15/03/2025

Address

MAIN Road KARJAT
Karjat
414402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aneetta Bora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share