Kankubai Girls High School

Kankubai Girls High School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kankubai Girls High School, School, Chaware Line , KARANJA LAD , DIST WASHIM, M. S., Karanja.

24/08/2026

#आनंददायी #शनिवार...!
इयत्ता ६ वी बालभारती विषयांतर्गत..
#आला #पाऊस...
#साभिनय #कविता #सादर !

23/08/2026

कौतुक सोहळा २०२६
समारोपीय प्रार्थना (बालभारती इयत्ता ६वी)
कवी- जगदीश खेबुडकर
#ज्ञान #दिल्याने #ज्ञान #वाढते....!

 #कंकुबाई  #कन्या  #शाळेत  #बक्षीस  #वितरण  #समारंभ  #व  #कौतुक  #सोहळा  #साजरा     दिनांक - २० ऑगस्ट २०२६ गुरूवार रोजी ...
21/08/2026

#कंकुबाई #कन्या #शाळेत #बक्षीस #वितरण #समारंभ #व #कौतुक #सोहळा #साजरा

दिनांक - २० ऑगस्ट २०२६ गुरूवार रोजी कंकुबाई श्राविकाश्रम संस्थेचे अध्यक्ष आ. कीर्तीकुमार भोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इराणी महिलांच्या हक्कांसाठी आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या प्रसिद्ध कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांच्या White Torture या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक,अभ्यासू व्यक्तिमत्त्व, नावलौकिक प्राप्त #लेखिका #मा. #राजश्रीताई #शहा, #सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि कौतुक सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आ.श्री.संजीवभाऊ रूईवाले,
मुख्याध्यापिका कल्पना घोंगटे मॅडम उपस्थित होत्या.
सन २०२५-२६ मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेत आणि वार्षिक विविध परीक्षा,स्पर्धा, चित्रकला,खेळ,ग्रंथालय विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा यांमध्ये सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी मा. राजश्रीताई शहा यांनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कीर्तीभाऊ भोरे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच प्रमुख अतिथी मा. राजश्रीताई शहा यांनी वर्ग दहावीच्या विद्यार्थिनींसाठी दि. १९ ऑगस्टला Study Techniques Workshop घेऊन मुलींना अभ्यास करण्यासाठी सहज सोप्या शब्दांतून महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

         #मध्ये  #कंकुबाई  #कन्या  #शाळेचे  #सुयश           ब्रिलियंट ट्युटोरियल ऑनलाइन क्लासेस तर्फे घेण्यात येणाऱ्या  ...
17/08/2026

#मध्ये #कंकुबाई #कन्या #शाळेचे #सुयश

ब्रिलियंट ट्युटोरियल ऑनलाइन क्लासेस तर्फे घेण्यात येणाऱ्या ज्युनियर न्यूटन टॅलेंट सर्च एक्झाम (Junior Newton Talent Search Exam-2025-26) या परीक्षेत शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या परीक्षेत वाशिम जिल्ह्यातून प्रथम वर्ग नववीची विद्यार्थिनी कु.भाग्यदा अनंत रवणे तर कु. ऋतुजा ज्ञानेश्वर मुगवानकर ही द्वितीय आलेली आहे. तसेच इ. पाचवीची विद्यार्थिनी कु. शरयू विजय तोतला ही वाशिम जिल्ह्यातून द्वितीय आलेली आहे. प्रत्येकीला सर्टिफिकेट, मेडल व भेटवस्तू प्राप्त झाली आहे.त्याचबरोबर कु.दर्शनी गणेश गावंडे (इ. 6) कु. श्रावणी दिगंबर ठक (इ. 6),कु.रुचिका सुधाकर राठोड (इ. 5 ) यांना सर्टिफिकेट व मेडल प्राप्त झाले आहे.यशस्वी विद्यार्थिनींचे कंकुबाई परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

 #स्कॉलरशिप  #परीक्षेमध्ये  #कंकुबाई  #माध्यमिक  #व  #प्राथमिक  #शाळेतील  #विद्यार्थिनींचे   #उल्लेखनीय  #यश !   महाराष्...
12/08/2026

#स्कॉलरशिप #परीक्षेमध्ये #कंकुबाई #माध्यमिक #व #प्राथमिक #शाळेतील #विद्यार्थिनींचे #उल्लेखनीय #यश !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे तर्फे घेण्यात आलेल्या इ. 4 धी व 7 वी च्या 2025-26 च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन करून विद्यार्थिनींनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मानाचा तुरा रोवला आहे.विद्यार्थिनींच्या मेहनतीमुळे,,जिद्दीमुळे व सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच यश आपसूकच खेचून आले. पालकांचे प्रोत्साहन, शिक्षिकांचे मार्गदर्शन यांचाही विद्यार्थिनींच्या परिश्रमामध्ये मोलाचा वाटा आहे.मेहनत, चिकाटी, मार्गदर्शन व आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव श्री. संजीव रुईवाले,रत्नप्रभा मेहता बालविकास मंदिरच्या संचालिका उल्काताई रूईवाले,
मुख्याध्यापिका कल्पना घोंगटे व पर्यवेक्षिका मेघा उफाडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिता भोंगाडे तसेच संपूर्ण शिक्षिका वृंदांकडून कौतुक झाले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 #कंकुबाई   #माध्यमिक  #कन्या  #शाळेत  #राज्यस्तरीय  #बालचित्रकला  #स्पर्धेचे  #यशस्वी  #आयोजन !महाराष्ट्र राज्य कलाशिक्...
10/08/2026

#कंकुबाई #माध्यमिक #कन्या #शाळेत #राज्यस्तरीय #बालचित्रकला #स्पर्धेचे #यशस्वी #आयोजन !

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालचित्रकला स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या शाळेतील इयत्ता ७ वी आणि ८ वी च्या एकूण ७० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना व सर्जनशिलतेला वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .
स्पर्धेत दिलेल्या विविध विषयांवर मुलींनी सुरेख चित्र रेखाटलीत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका घोंगटे मॅडम ,पर्यवेक्षिका उफाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी
चित्रकला शिक्षिका मेहेत्रे मॅडम व शेंडेकर मॅडम यांनी परीश्रम घेतले.

 #कंकुबाई  #कन्या  #शाळेत  #सुप्रसिद्ध  #कवी  #व  #कथालेखक  #प्रवीण  #दवणे  #लिखित  #सूर्य  #पेरणारा  #माणूस  #या  #पुस्...
08/08/2026

#कंकुबाई #कन्या #शाळेत #सुप्रसिद्ध #कवी #व #कथालेखक #प्रवीण #दवणे #लिखित #सूर्य #पेरणारा #माणूस #या #पुस्तकाच्या #परिचयातून #विद्यार्थिनींना #प्रेरणादायी #मार्गदर्शन...

दिनांक - ७ ऑगस्ट २०२६
लौकिक शिक्षणासोबत विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासात स्वप्ने पाहणे, ध्येयनिश्चिती करणे, सकारात्मक दृष्टिकोन असणे, चिकाटी, शिस्त असणे इत्यादी अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण असतात आणि हाच उद्देश लक्षात घेऊन मार्गदर्शिका 'उल्काताई रूईवाले' यांनी सुचवलेले 'सुप्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे लिखित "सूर्य पेरणारा माणूस" या पुस्तकाद्वारे आमच्या शाळेतील 'शिक्षिका मनिषा त्रिकांडे' यांनी विद्यार्थिनींना प्रेरक मार्गदर्शन केले व मार्गदर्शनातून संघर्ष,अडचणी व्यक्तीला थांबवू शकत नाही हे पटवून दिले. ज्या समाजात आपण राहतो,त्या समाजाचे आपल्यावर ऋण असते,हा विचार विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवून त्यांच्या इच्छाशक्तीला बळ देण्याचा प्रयत्न मार्गदर्शनामधून करण्यात आला. पुस्तकातील अनेक मार्मिक प्रसंगांचे विवेचन विद्यार्थिनींसमोर करून विद्यार्थीदशेत अथवा जीवनात कोणताही कठीण प्रसंग, अपयश आले तरी ते पचविण्याचे सहज आणि सुलभ मार्गदर्शन केले. पुस्तकं केवळ वाचायची नसतात तर त्यातील विचार जीवनात उतरवून स्वतःला आत्मविश्वासी बनवायचे असते, ह्या विचाराने विद्यार्थिनी प्रेरित झाल्या.याच पुस्तकाच्या निमित्ताने "लेखक प्रवीण दवणे" यांच्या लिखाण शैलीचे, समृद्ध विचारांचे दमदार आणि भावूक वर्णन करण्यात आले."वाचाल तर वाचाल" ह्या उक्ती सोबतच "ऐकाल तरी वाचाल" असाही विचार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्या मनोगतामधून अपयश आले तरी यशाचीच पहिली पायरी मानून, खचून न जाता त्याकडे सकारात्मक दृष्टीतूनच बघू,हा विचार व्यक्त केला.

 #कंकुबाई  #प्राथमिक  #कन्या  #शाळेचे  #आंतरराष्ट्रीय  #प्रतिभा  #खोज  #परीक्षेत  #सुयश         'सावित्री स्किल डेव्हलपम...
03/08/2026

#कंकुबाई #प्राथमिक #कन्या #शाळेचे #आंतरराष्ट्रीय #प्रतिभा #खोज #परीक्षेत #सुयश
'सावित्री स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट दिल्ली' यांच्या सहकार्याने आयोजित 'इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन' ( ITSE ) २०२५-२६ मध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.
ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME ) सोबत प्रशिक्षण भागीदार ( Training Partner) म्हणून कार्यरत आहे. तसेच या संस्थेचे सिंगापूर,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथेही सहकार्यालय आहेत.
इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ( ITSE ) ही भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एक राष्ट्रीय स्तरावरील स्कॉलरशिप आणि ऑलिम्पियाड परीक्षा आहे. ही परीक्षा इ. १ ली ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, इंग्रजी,हिंदी, सामान्य ज्ञान,संगणक या विषयांमध्ये घेतली जाते. परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता, शैक्षणिक गुणवत्ताआणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे हा आहे.
या परीक्षेमध्ये इ.१ ली ते ४ थी च्या १७२ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये
१) शर्वरी सतीश ठाकरे इ.१ ली - ₹ 1000 + Gold medal+ Certificate
२) गीतांशी संतोष टाके इ.२ री - Scientific Calculator + Gold medal+ Certificate
३) ओवी विजय ढाकुलकर इ. ३ री - Smart Watch+ Gold medal + Certificate
तसेच २६ विद्यार्थिनींना Gold medal
१९ विद्यार्थिनींना Silver medal
२५ विद्यार्थिनींना Bronze medal
प्राप्त झाले असून सहभागी सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र मिळाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे कंकुबाई परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व कौतुक.....

 #निबंध  #स्पर्धेत  #कंकुबाई  #कन्या  #शाळेचे  #सुयश      शिक्षण विभाग जिल्हा परिषद,वाशिम व पंचायत समिती,कारंजा (लाड) तर...
30/07/2026

#निबंध #स्पर्धेत #कंकुबाई #कन्या #शाळेचे #सुयश

शिक्षण विभाग जिल्हा परिषद,वाशिम व पंचायत समिती,कारंजा (लाड) तर्फे "शाहू विचारांचा जागर" या अंतर्गत छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर शालेय ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.या विद्यार्थिनींची तालुकास्तरावर निवड झाली असून यामध्ये वर्ग ८ ते १० मधून कु. हर्षना राहूल शिंदे (वर्ग ९) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर ५ ते ७ मधून कु. कृष्णाली अमोल चौधरी (वर्ग ७) हिने द्वितीय क्रमांक आणि कु.माही निलेश राजेधर (वर्ग ६ ) हिने चवथा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल कंकुबाई परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!

 #एचपीव्ही    #लसीकरण  #जनजागृती व  #लसीकरण  #शिबिराचे  #आयोजनदि. २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी कंकुबाई माध्यमिक कन्या शा...
27/07/2026

#एचपीव्ही #लसीकरण #जनजागृती व #लसीकरण #शिबिराचे #आयोजन

दि. २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेत *एचपीव्ही* (Human Papilloma Virus) लसीकरणाबाबत जनजागृतीपर सभा व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी माता-पालकांना एचपीव्ही विषाणू, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे गांभीर्य, लसीकरणाचे महत्त्व व फायदे तसेच महिलांचा आहार, आरोग्य आणि लसीकरणाबाबत समाजात असलेले गैरसमज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांच्या शंकांचे समाधान करून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली.
यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात शाळेतील १४ ते १५ वर्षे वयोगटातील पाच विद्यार्थिनींना एचपीव्ही लस देण्यात आली.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका घोंगटे मॅडम, पर्यवेक्षिका उफाडे मॅडम, मार्गदर्शिका उल्काताई रुईवाले तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. या उपक्रमास माता-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Address

Chaware Line , KARANJA LAD , DIST WASHIM, M. S.
Karanja
444105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917256224522

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kankubai Girls High School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kankubai Girls High School:

Shortcuts

Share

Category