J D Chaware Vidyamandir, Karanja Lad

J D Chaware Vidyamandir, Karanja Lad This is a official page of J. D. Chaware Vidyamandir, Karanja (Lad).

29/07/2026
जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राखली यशाची परंपरा फेब्रु.२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर...
13/07/2026

जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राखली यशाची परंपरा
फेब्रु.२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक जे.डी.चवरे विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत-अनुराग नागरे,नोमनउल्ला खान,कु.शर्वरी पाटील तर पूर्व माध्यमिक परीक्षेत-वीर बुटेकर, कु.यशदा मसाळकर,ऋतुराज सुरजुसे,समर्थ जमाले,मानस डाखोरे,विराट डावरे,कु.साक्षी लाड,प्रथमेश सुरळकर,कु.स्नेहल पाडेन या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादित केले.या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील शिक्षक श्री अनिल मसाळकर,श्री महेन्द्र धनस्कर,श्री अभिजित कोंडोलीकर,सौ शितल धामणकर,श्री अमोल भोरे,श्री चेतन घाटे,कु.प्रतिक्षा वऱ्हाडे,सौ कल्पना अमृते यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल व्यवस्थापक मंडळातील श्री प्रमोद चवरे,श्री उदय चवरे,श्री विनम्र चवरे,शाळा समितीच्या अध्यक्षा सौ.डॉ.लीनाताई चवरे तथा मुख्याध्यापक श्री श्रीनिवास जोशी,पर्यवेक्षक श्री कैलास सोनुले आणि सर्वं शिक्षकवृंदांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जे.डी.चवरे विद्यामंदिरचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल दि.८मे,कारंजा सत्र २०२५-२६ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या शालां...
10/05/2026

जे.डी.चवरे विद्यामंदिरचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल

दि.८मे,कारंजा
सत्र २०२५-२६ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेतील निकालात स्थानिक जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी १०० % निकाल देऊन नेत्रदीपक यश संपादित केले.या वर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १५१ विद्यार्थीं प्रवेशित होते, पैकी चार विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा अधिक तर १९ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण तसेच ७५% पेक्षा अधिक गुण ८४ विद्यार्यांनी प्राप्त केले आहे.
कु.संचिता दंडे हिने ९६.४० % गुण मिळवून शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवला. आयुष देशमुख(95.8) ,नैतिक राठोड (95.6), यश माटोडे (95),कु.अदिती जिरापुरे हिला संस्कृत विषयात तर नैतिक राठोडला गणित विषयात पैकीच्या पैकी १०० गुणांसह विशेष प्राविण्य प्राप्त झाले.

आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन तथा आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जे.डी. चवरे विद्या मंदिर येथे ध्वजारोहण व गुणवंत विद्...
01/05/2026

आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन तथा आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त जे.डी. चवरे विद्या मंदिर येथे ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
एन.एम.एम.एस.परीक्षेमध्ये स्कॉलरशिप प्राप्त 16 विद्यार्थी, डॉ. होमी भाभा परीक्षेमध्ये सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी, टेनिक्वाईट स्पर्धा (17 वर्ष वयोगट) मध्ये राज्यस्तरावर सुवर्णपदक प्राप्त शाळेची विजेती चमू, वर्गातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी या सर्वांचा गौरव चिन्ह व भेटवस्तू देऊन शाळेच्या व्यवस्थापक डॉ. सौ. लीनाताई चवरे, मुख्याध्यापक श्री श्रीनिवास जोशी,पर्यवेक्षक श्री कैलास सोनुले यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

NMMS परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश दि.२६एप्रिल२०२६,कारंजा नोव्हें २०२५ मध्ये पार पडलेल्य...
27/04/2026

NMMS परीक्षेत जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दि.२६एप्रिल२०२६,कारंजा
नोव्हें २०२५ मध्ये पार पडलेल्या NMMS परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जे.डी.चवरे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.एकूण ५२ विद्यार्थीं या परीक्षेत पास झाले असून यांपैकी १६ विद्यार्थीं प्रतिवर्षी १२०००₹ याप्रमाणे सलग चार वर्षे वर्ग ९ ते १२ पर्यंत मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी ते पात्र ठरले आहेत.
कु.स्नेहल पाढेन,समर्थ जमाले,इरफान गारवे, मो.रेहान,विधीना दोहपरे,हरीओम भोयर,तन्मय मेश्राम,सार्थक मोडक,मंथन पाटेकर,सोहम पुणेवार,रुद्र कडू,प्रथमेश सुरडकर,नव्य शेंदूरकर,कु.साक्षी लाड,आराध्य तांबट,अजिंक्य धुरट या विद्यार्थ्यांनी परीक्षेत बाजी मारली.
यापरीक्षेची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने शाळेत विशेष मार्गदर्शन वर्गांचे नियोजन करण्यात आले होते.श्री उदयभाऊ चवरे,श्री प्रमोदभाऊ चवरे,श्री विनम्रभाऊ चवरे व शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ.लीनाताई चवरे यांच्या उचित मार्गदर्शनात श्री अनिल मसाळकर,सौ.शितल धामणकर,श्री अभिजित कोंडोलीकर,श्री महेन्द्र धनस्कर व श्री प्रकाश उकळकर यांनी विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग आणि पेपरचा सराव करून घेतला.
सर्वांच्या अथक परिश्रमाचा परिपाक म्हणजे हे मिळालेले घवघवीत यश असून ही शाळेसाठी फार मोठी उपलब्धी आहे,अशा शब्दांत भावना व्यक्त करून सन्माननीय व्यवस्थापक मंडळाच्या सर्वं सदस्यांनी तथा मुख्याध्यापक श्री श्रीनिवास जोशी, पर्यवेक्षक श्री कैलास सोनुले, सर्वं शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकवृदांचे अभिनंदन केले.
शालेय स्तरावरील सर्वं स्पर्धापरीक्षांच्या यशाची विद्यार्थ्यांनी परंपरा कायम राखली असून या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

जे.डी.चवरे विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले इस्रोचे कार्यकारंजा लाड,दि.२१-एप्रिल इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक मा...
23/04/2026

जे.डी.चवरे विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले इस्रोचे कार्य

कारंजा लाड,दि.२१-एप्रिल
इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक मा.श्री दिनेशजी महाकाळ यांनी स्थानिक जे.डी.चवरे विद्यामंदिराच्या सदिच्छा भेटीत इस्रोतील संशोधन कार्य आणि नोकरीच्या संधींविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक श्री दिनेशजी महाकाळ-वरिष्ठ वैज्ञानिक इस्रो,तिरूवनंतपुरम-केरळ तसेच संस्थेचे सदस्य श्री आल्हादभाऊ चवरे,शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीनिवास जोशी आणि पर्यवेक्षक श्री कैलास सोनुले उपस्थित होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.महावीर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री आल्हादभाऊ चवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,पुस्तक व भेटवस्तू देऊन प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या ओघवत्या निवेदनातील पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविकानंतर श्री महाकाळ सरांनी विद्यार्थ्यांना इस्रोच्या अद्भुत जगताची सफर घडवून आणली.
रॉकेटच्या बांधणी पासून तर त्यांच्या लॉन्चिंग पर्यंतचे विविध टप्पे स्पष्ट करून आपल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यात इस्त्रोचे योगदान व महत्त्व अधोरेखित केले. थुंबा हे ठिकाण रॉकेटच्या उड्डाणासाठी कसे उपयुक्त आहे,त्याची भौगोलिक कारणमीमांसा सांगून अवकाश मोहिमांतील यशापयशाचीही उदाहरणे सांगितली.
स्लाईड शो च्या माध्यमातून तांत्रिक साधनांची निर्मिती व त्यांचे असेंब्लींग विद्यार्थ्यांना समजावून देत,अवकाश क्षेत्रात भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी या क्षेत्राचा जरूर विचार करावा असे त्यांनी आवाहन केले.
श्री आल्हादभाऊ चवरे यांचा श्री दिनेश महाकाळ यांच्याशी असलेल्या मित्रस्नेहामुळे या कार्यशाळेचा योगायोग घडून आला.
या प्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ.लीनाताई उदय चवरे,श्री विनम्रभाऊ चवरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री यशवंत गांभवा यांनी पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वं शिक्षक बंधुभगिनींनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शाळेतील वर्ग नववीचा विद्यार्थी चि.उत्कर्ष येळणे याने सन २०२२५-२६ च्या डॉ.होमी भाभा परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. म...
13/04/2026

शाळेतील वर्ग नववीचा विद्यार्थी चि.उत्कर्ष येळणे याने सन २०२२५-२६ च्या डॉ.होमी भाभा परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात त्याला सुवर्णपदक प्रदान करून त्याचा गौरव व कौतुक करण्यात आले.उत्कर्ष व त्याला मार्गदर्शन करणारे श्री गांभवा सर,श्री मोटघरे सर,श्री देशपांडे सर यांचे शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ.सौ.लीनाताई चवरे,श्री प्रमोदभाऊ चवरे श्री उदयभाऊ चवरे श्री विनम्रभाऊ चवरे , मुख्याध्यापक श्री श्रीनिवास जोशी व सर्वं शिक्षक-शिक्षकेतर बंधुभगिनिंनी अभिनंदन केले.

Address

Chaware Line
Karanja
444105

Opening Hours

Monday 7:15am - 5:15pm
Tuesday 7:15am - 5:15pm
Wednesday 7:15am - 5:15pm
Thursday 7:15am - 5:15pm
Friday 7:15am - 5:15pm
Saturday 7:15am - 2:15pm

Telephone

+917256222218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when J D Chaware Vidyamandir, Karanja Lad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to J D Chaware Vidyamandir, Karanja Lad:

Shortcuts

Share

Category