श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूर ता.कराड जि. सातारा

  • Home
  • India
  • Karad
  • श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूर ता.कराड जि. सातारा

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूर ता.कराड जि. सातारा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूर ता.कराड जि. सातारा, Education, A/p -malkapur Tal- karad dist -Satara, Karad.

(स्थापना वर्ष -1984)Official page of Shri Malaidevi Shikshan Sanstha's Kanyashala Malkapur. श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर अधिकृत फेसबुक पेज.

🟣 N.M.M.S, सारथी शिष्यवृत्ती उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा. राज्याबाहेर सहल आयोजन.

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!​मलकापूर:येथील रिलाय...
13/07/2026

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!
​मलकापूर:
येथील रिलायन्स Jio मोबिलिटी लि. (Jio-bp) मलकापूर-कराड आणि श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स (Jio-bp) च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी कन्याशाळा मलकापूर येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला.
​ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स बीपी चे एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार साहेब लाभले होते. त्यांच्या शुभहस्ते आणि कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र,नोटबुक व पेन , आकर्षक कॅप, की-चेन आणि चॉकलेट देऊन गौरविण्यात आले. बक्षिसे मिळताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
​याप्रसंगी रिलायन्स जिओ बीपी चे ऑपरेटर मा. संदीप जाधव, तसेच मा. राजेंद्र खबाले, मा. सोमनाथ माळी, मा. महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार यांनी रिलायन्स कंपनी आणि तिच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच, विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आणि "प्रत्येक विद्यार्थिनीने आयुष्यात आपले ध्येय निश्चित करावे व ते गाठण्यासाठी जिद्दीने वाटचाल करावी," असे प्रेरणादायी आवाहन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी आपल्या भाषणात शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पाहुण्यांना दिली. त्या अभिमानाने म्हणाल्या, "आज कन्याशाळेच्या विद्यार्थिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. शिक्षण असो, कला असो की क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला असून शाळेच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतच आहे."
​रिलायन्स Jio-bp कंपनीने दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील वर्षीही याच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत कन्याशाळेतील विद्यार्थिनींना शूज आणि इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप केले होते, अशी कृतज्ञतापूर्वक आठवण यावेळी काढण्यात आली. रिलायन्स कंपनीच्या या निरंतर मदतीबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व 'शेतीमित्र' अशोकराव थोरात (भाऊ), संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पालक आणि विद्यार्थिनींनी कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. "ही मदत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये नक्कीच मोलाचा हातभार लावेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​ ​कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रिलायन्स Jio bp चे सर्व कर्मचारी, तसेच श्री.अमृत शिर्के, श्री.शुभम चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थिनींना भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मोठी ऊर्जा दिली आहे.

03/07/2026

कन्याशाळा मलकापूरचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 🏆🥇🥇🥇

18/06/2026

📢श्री मळाईदेवी शिक्षण संस्था वर्धापन दिन🎂🎂💐💐 -शुभेच्छुक कन्याशाळा मलकापूर 🏆📚👈

एस. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२६ 🚩🚩💐💐श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेची कन्याशाळा मलकापूरचे दैदिप्यमान यश.. 🚩🚩कु.धनश्री संकपाळ ...
08/05/2026

एस. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२६ 🚩🚩💐💐श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेची कन्याशाळा मलकापूरचे दैदिप्यमान यश.. 🚩🚩कु.धनश्री संकपाळ व कु. स्वरा पाटील ९७.२० गुण मिळवून विद्यालयात व मलकापूर केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान. मिळविला... 🏆🏆🏆विद्यालयाचा निकाल "" ९७.६७""
@@ आमच्या हिरकणी @@ 🚩🚩इयत्ता ५वी ते १०वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश सुरु.. प्रवेश सुरु.. 👆👆👆👆👆👆👉👉आजच आपला प्रवेश निश्चित करा. 🚩🚩🚩🚩

24/04/2026

संगीत प्रेमींसाठी खास पर्वणी...श्री मळाई ग्रुप आयोजित
गीत निनाद प्रस्तुत "गाणी तुमच्या मनातील "

24/04/2026

'संगीत प्रेमींसाठी खास पर्वणी "श्री मळाई ग्रुप आयोजित गीत निनाद प्रस्तुत "गाणी तुमच्या मनातील "👍🎹🥁🎼🎵

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थिनीचे कन्याशाळा मलकापूरमध्ये अनोखे स्वागत.."शिक्षणाची गुढी व ध्येयाचा सेल्फी ''
23/03/2026

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थिनीचे कन्याशाळा मलकापूरमध्ये अनोखे स्वागत.."शिक्षणाची गुढी व ध्येयाचा सेल्फी ''

18/03/2026

माजी विद्यार्थिनी.. आमचा मान व सन्मान 🏆👈आज विविध उच्च पदावर कार्यरत.. Proudfeel

विद्यार्थिनींचे बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा सर्वागिण विकास करण्यासाठीचे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे आपली कन्याशाळा मलकापू...
16/03/2026

विद्यार्थिनींचे बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा सर्वागिण विकास करण्यासाठीचे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे आपली कन्याशाळा मलकापूर..👇👇👇👇मग विचार कसला करताय.. आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी पहिली पसंती द्या. 🙏

प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!! गुढीपाडव्याच्या  शुभमुहूर्तावर  आपला प्रवेश निश्चित करा व निश्चिंत रहा.
16/03/2026

प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपला प्रवेश निश्चित करा व निश्चिंत रहा.

Address

A/p -malkapur Tal- Karad Dist -Satara
Karad
415539

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,कन्याशाळा मलकापूर ता.कराड जि. सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category