Saraswati Vidyamandir

Saraswati Vidyamandir School

PARIS OLYMPIC 2024आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये मनू भाकर हिने १० मीटर नेमबाजी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मि...
01/08/2024

PARIS OLYMPIC 2024
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा २०२४
मध्ये
मनू भाकर हिने १० मीटर नेमबाजी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

तसेच भारताला नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा मान ही मिळवला.

आपल्या या कामगिरीने देशातील क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नेमबाज होण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल.

जनकल्याण प्रतिष्ठान व सरस्वती शैक्षणिक संकुलातर्फे मनू भाकर हिचे भारतीयांना आनंद साजरा करण्याचे क्षण दिल्याबद्दल आणि पदक प्राप्तीबद्दल अभिनंदन...

सरस्वती विद्यामंदिरचा सायकलिस्ट - अथर्व चंद्रजीत पाटील याचा पंढरपूर येथील सायकल संमेलनात सहभाग ( कराड - पंढरपूर - कराड प...
09/07/2024

सरस्वती विद्यामंदिरचा सायकलिस्ट - अथर्व चंद्रजीत पाटील याचा पंढरपूर येथील सायकल संमेलनात सहभाग ( कराड - पंढरपूर - कराड प्रवास असा ३११ किमी प्रवास )

पंढरपूर येथे ३ रे आखिल महाराष्ट्र सायकल संमेलन झाले. या संमेलनात कराडच्या सरस्वती विद्यामंदिर मधील इयता ८ वी मधील विद्यार्थी अथर्व चंद्रजीत पाटील याने सहभाग घेतला. रविवार दिनांक ७ जुलै रोजीच्या संमेलनात अथर्व याने कराड ते पंढरपूर व परत पंढरपूर ते कराड असा ३११ किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला. यासाठी सकाळी ८.३० वाजता त्याने कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली. कराड मधील १४ सायकलिस्ट सोबत त्याने हा प्रवास पूर्ण केला. कडक ऊन, वेगवान वारा, पाऊस याचा सामना करावा लागला.
शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी त्याने सकाळी ६ वाजत प्रवासाला सुरुवात केली व दुपारी ४ वाजता १५२ किमी अंतर पूर्पंण करून पंढरपूर येथे पोहोचला.
७ जुलै रोजीचे सायकल संमेलन पूर्ण करून सकाळी ८.३० वाजता प्रवासाला सुरुवात करून रात्री ११ वाजत कराड येथे पोहोचला.
रोज धावण्याचा सराव, तर रविवारी वडिलांसोबत ३०/४० किमी सायकल सराव यामुळे त्याचा प्रवास सहज आणि सुखद झाला.....

त्याच्या या सायकल प्रवासाबद्दल जनकल्याण प्रतिष्ठानचे संचालक श्री दीपक कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ.सोनाली जोशी, समन्वयक विजय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
अथर्व
असाच प्रवास करत रहा...छंद जोपासत रहा...
सरस्वती शैक्षणिक संकुलाकडून तुझ्या या छंदास ...

प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे  आणि समजून घेणे या उद्देशाने जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय येथे क्...
20/01/2023

प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आणि समजून घेणे या उद्देशाने जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय येथे क्षेत्रभेट हा उपक्रम राबवला जातो.
इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास १या विषयाची क्षेत्रभेट गोळेश्वर या ठिकाणी श्री.आनंदराव जाधव यांच्या शेतात सेंद्रिय शेती पाहण्यासाठी नेण्यात आली.
सेंद्रिय शेतीचे महत्व काय आहे त्याचे फायदे काय आहेत हे विद्यार्थ्याना समजले.विद्यार्थ्यांनी विविध फळ झाडें व् पिकांचे निरिक्षण केले.सेंद्रिय फळे व् भाज्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहेत हे विद्यार्थ्यांना समजले त्याच बरोबर पारंपरिक शेती व् आधुनिक शेती या विषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेती आरोग्यासाठी कशी फायद्याची आहे या बाबत विद्यार्थ्यांना माहिती श्री.जाधव यांनी सोप्या शब्दात सांगितली.
या क्षेत्रभेटीचे संयोजन सौ.विद्यादेवी जाधव यांनी केले.

अध्ययन ही एक कृतीयुक्त प्रक्रिया असून यामध्ये अनुभवाद्वारे अर्थनिर्मिती होते.पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम  केवळ लेखन, वाचन...
19/01/2023

अध्ययन ही एक कृतीयुक्त प्रक्रिया असून यामध्ये अनुभवाद्वारे अर्थनिर्मिती होते.पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम केवळ लेखन, वाचन, पाठांतर,यांवर भर न देता त्यांनाच त्यांच्या कल्पकतेचा वापर करण्यास भाग पाडून विविध विषयांचे आकलन स्वत:च करण्याची संधी देणे , प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आणि समजून घेणे या उद्देशाने जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय येथे क्षेत्रभेट हा उपक्रम राबवला जातो.

इ.6वी ची गणित या विषयाची क्षेत्रभेट पुस्तकातील घटक *'बँक व सरळव्याज'* या अंतर्गत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था, रुक्मिणी नगर शाखा या ठिकाणी गेली होती
सौ.रुपाली खंडागळे मॅडम या शाखेच्या प्रमुख असून त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार, स्लिप कशी भरायची, एटीएम मधून पैसे कसे काढायचे, व्याज म्हणजे काय, व्याजाचा दर कसा असतो, बँकेत आपले पैसे सुरक्षित कसे राहतात, एटीएम चा वापर कसा करायचा,इ- बँकिंग म्हणजे काय हे सर्व समजावून सांगितले. बँकेतील विविध फॉर्म व स्लीप कशी भरायची याचीही माहिती प्रत्यक्ष फॉर्म व स्लिपच्या मदतीने सांगितली.
त्याचप्रमाणे सायबर गुन्हे म्हणजे काय ते होऊ नये म्हणून काय करावे व रोखण्यासाठीच्या उपाययोजना देखील व्यवस्थित समजावून सांगितल्या.
या क्षेत्रभेटीचे संयोजन सौ.शिल्पा भुतकर व सौ.रुपाली चव्हाण यांनी केले.

अध्ययन ही एक कृतीयुक्त प्रक्रिया असून यामध्ये अनुभवाद्वारे अर्थनिर्मिती होते.पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम  केवळ लेखन, वाचन...
18/01/2023

अध्ययन ही एक कृतीयुक्त प्रक्रिया असून यामध्ये अनुभवाद्वारे अर्थनिर्मिती होते.पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम केवळ लेखन, वाचन, पाठांतर,यांवर भर न देता त्यांनाच त्यांच्या कल्पकतेचा वापर करण्यास भाग पाडून विविध विषयांचे आकलन स्वत:च करण्याची संधी देणे , प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे आणि समजून घेणे या उद्देशाने जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय येथे क्षेत्रभेट हा उपक्रम राबवला जातो. इयत्ता सहावीच्या वर्गाची विज्ञान विषयाची क्षेत्रभेट कराड नगरपरिषद कराड येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देण्यास गेली होती. जलशुद्धीकरण प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या श्री. कोळी सरांनी मुलांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती सांगितली. या प्रकल्पासाठी उपलब्ध होणारे पाणी कुठून आणले जाते? त्यानंतर कशा पद्धतीने त्यावरती प्रक्रिया केली जाते अशा विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू प्रश्नांसाठी श्री. कोळी सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. या प्रकल्पाची मुलांनी पाहणी केली. पाणी कसे विविध स्तरांमधून जाते याचे ही बारकाईने निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले.या क्षेत्रभेटीचे संपूर्ण संयोजन सौ.स्वाती जाधव व सौ.रुपाली चव्हाण यांनी केले.

*अभिनंदन* 👸🏻 डेरवण येथे झालेल्या १० मीटर रायफल शूटिंग विभागीय क्रीडा स्पर्धेत जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या...
22/12/2022

*अभिनंदन* 👸🏻
डेरवण येथे झालेल्या १० मीटर रायफल शूटिंग विभागीय क्रीडा स्पर्धेत जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी अदिती मधुकर जाधव ( इयत्ता ६ वी )हिने विभागीय स्तरावर *द्वितीय* क्रमांक प्राप्त केला आहे.
अदितीची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा...

*यश बिचकर चा शाळेच्या वतीने सत्कार*कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थी यश बिच...
20/12/2022

*यश बिचकर चा शाळेच्या वतीने सत्कार*
कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थी यश बिचकर याचा आयर्न मॅन हा बहुमान मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी हा किताब मिळवला. १.९ किमी समुद्रात पोहणे, ९० किमी सायकलिंग व २१ किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ८.३० तासात ही स्पर्धा पूर्ण करावी लागते.यश ने निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करत सर्वात लहान वयात ' आयर्न मॅन ' हा किताब मिळविला.
जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अनिल कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय कुलकर्णी, क्रीडा शिक्षक दिपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी यश बिचकर यांचे विद्यालयात आगमन होताच वाद्यांच्या गजरात व टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
शिरीष गोडबोले म्हणाले,यशने मिळवलेले यश विद्यालयासाठी अभिमानास्पद तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे.शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित खेळ व व्यायाम फार महत्त्वाचा आहे.
सत्काराला उत्तर देताना यश बिचकर म्हणाले, नियमित सराव व प्रचंड इच्छाशक्ती असेल तर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवता येते. या विद्यालयाने केलेला सन्मान पुढील वाटचालीसाठी मला प्रेरणादायी आहे.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सोनाली जोशी यांनी केले.

Address

Vakan Road
Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saraswati Vidyamandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Saraswati Vidyamandir:

Shortcuts

Share

Category