Mankeshwar Foundation

Mankeshwar Foundation We found problems in rural area about educational awareness and basic needs of poor famillies, so we decided to work for rural peoples.

निसर्गाच्या कुशीत
वसले आहे गोटेवाडी
सुरुच्या वनात
सुंदर दिसती कितीतरी

रूप त्याचे देखणे
भारावून टाकी मन
डोंगर कपारी सुंदर आहे
मन मोकळे करवंद खाणे

कधी डोंगरातून
धबधबा कोसले
तर कधी अंबराईतुनी
सूर्याची किरणे डोकाऊन जाई

रूप गोजिरे आणि देखणे
अथांग सागराचे जेवढे
बगावे तेवढे डोळ्यात साठवणे
अवगड असे

गोटेवाडीत जाता येता
निसर्ग बदलत राही
कधी डोंगर तर कधी झाडे
आणि ते विशाल धरण

वांगी पावटा सोबत असे
हि तर मज्जा गोटेवाडीत दिसे

काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खालआत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात....
02/03/2017

काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल
आत्ताचा मोसम हा द्राक्ष्यांचा आहे, आणि द्राक्ष ही तब्येतीसाठी चांगली असतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. पाहूया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते.
1 डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण
काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.
2 एकाग्रता वाढायला मदत
काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
3 हार्ट ऍटेकचा धोका कमी
काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.
4 वजन होतं कमी
नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
5 अस्थमा होतो बरा
काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.
6 कॅन्सरला रोखा
काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.
7 अपचन होत नाही
काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
8 डोळ्यांसाठी गुणकारी
दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.
9 सुरकुत्या होतात कमी
काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
10 केस गळती थांबवायला मदत
काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.

स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"....अच्छा जी ...सध्याची 'कल के जीनियस' .आज देशात सर्वात लोकप्रिय व आपण भारतात कुठेही गेलात ...
17/03/2016

स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"....अच्छा जी ...सध्याची 'कल के जीनियस' .
आज देशात सर्वात लोकप्रिय व आपण भारतात कुठेही गेलात तरी फक्त रु ५ ला मिळणारी, गोरगरीबाना परवडणारी ,एका वेळ जेवणाची सोय करणारी .आणि आजच्याही काळात
टिकून राहिलेली सर्वाची लाडकी पारले जी बिस्किटे ...
पारलेचा भारतातील इतिहास मोठा रोचक आहे.१९२९ साली मुंबईच्या विलेपार्ले भागात पारले प्रॉडक्टसचा छोटा कारखाना सुरू झाला.त्यावेळी तेथे टॉफी, चॉकलेट बनविली जात होती तर बिस्कीटे बनविण्याची सुरवात १९३९ साली झाली. ही बिस्कीटे ग्लुको बिस्कीटे नावाने बाजारात आणली गेली व या उत्पादनाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. १९४७ साली या बिस्कीट पुड्याच्या कव्हरवर एका लहान मुलीचा फोटो झळकला व आजही हाच फोटो कायम आहे. या मुलीची ओळख पटविण्यासाठी अनेक नांवे घेतली गेली मात्र अखेरी पार्लेनेच नागपूरच्या नीरू देशपांडे या मुलीचा हे हाताने काढलेले चित्र असल्याचे जाहीर केले. आज नीरू देशपांडे ७८ वर्षांच्या आहेत.
इतक्या वर्षांच्या व्यवसायात पारले जीच्या किमती केवळ दोन ते तीन वेळाच वाढल्या तर त्यांची जाहिरातही दोन ते तीन वेळाच बदलली गेली. सुरवातील पारले ग्लुको असलेल्या या बिस्कीटांचे १९८० साली पारले जी असे नामकरण केले गेले. पारलेच्या कारखान्यात या बिस्कीटांचे रोज ४० कोटी पॅक बनतात. खेड्यापासून शहरांपर्यंत कुठेही ही बिस्कीटे एकाच किमतीला मिळतात. पारले जी कॅनडा, युरोप, ब्रिटन, अमेरिका अशा अनेक देशांतही उपलब्ध आहेत. समस्त भारत खंडात पारले बिस्किटे आणि त्याच्या वेष्टनावरील सुरेखश्या बाळाचा फोटो कोण ओळखत नाही गेली काही दशके पिढ्यानपिढ्या ह्याच एका बिस्किटावर फिदा असल्याचा जमाना आताशा काळानुरूप मागे पडत चालला तरी ती बिस्किटे आणि त्यांच्या सह असलेल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी कश्या विसरता येतील?
आपल्या लाडक्या पार्ले बिस्किटाविषयी पार्ले-जी चवीसाठी तर प्रसिद्ध आहेच जग १९२९ मध्ये भारतात पारले बिस्किट निर्मिती सुरु झाली असा कंपनीच्या संकेतस्थळावर उल्लेख सापडतो. १९८० मध्ये पारले-जी बिस्किटे Gluco असे नामकरण करण्यात आले. हे जी म्हणजे ग्लुकोज आहे असा याचा अर्थ.१९८२मध्ये पहिल्या टीव्ही व्यावसायिक जाहिरातीत "स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी" असे घोषवाक्य वापरण्यात आले.
पारले-जी २००१मध्ये प्रथमच कागदी वेष्टन (पॅकिंग)सोडून प्लास्टिकच्या वेष्टनात वितरीत होऊ लागले. आता "स्वाद भरे शक्ती भरे पारले-जी"चा प्रवास जी म्हणजे जीनियस अश्या नवीन टप्प्यावर येउन ठेपला आहे. सध्याची 'कल के जीनियस' ही जाहिरात संकल्पना प्रसिद्ध कवी गुलजार साहेबांनी लिहलेली आहे आणि पियुष मिश्रांनी आपल्या आवाजात सादर केलेली आहे. पारले-जी बद्दल सांगितली जाणारी गमतीदार गोष्ट अशी की एका वर्षात खाल्ल्या जाणारे पारले-जी बिस्कीट एका सोबत एक रेषेत ठेवल्यास पृथ्वीच्या परीघाची १९२ वेळा वेळा परिक्रमा करता येईल.
मुंबई , बंगळूरू, बहादूरगड (हरियाना ) आणि नीमराना(राजस्थान ) येथील आपल्या १० उत्पादन प्रकल्पांसह देशभरात सुमारे ७५ ठिकाणी कंत्राट-पद्धतीने कंपनी आपली लाडकी पारले-जी बिस्किटे दररोज ४० दशलक्ष पॅकेट इतक्या प्रचंड संख्येत उत्पादित आणि वितरीत करत असते जे देशातील सुमारे ३३००० केंद्रामार्फत विक्री केले जातात. स्पर्धा कितीही वेगाने वाढत असली तरी ४०% बाजार हिस्स्यासह भारतातीलच नव्हे तर "जगातील नं. १ खपाची विकली जाणारी ग्लुकोज बिस्किटे" असा भारदास्त लौकिक कमवून आहे.

17/06/2014

श्री माणकेश्वर विद्यालय गोटेवाडी सन २०१३-१४ इयत्ता १० वी चा RESULT १००% लागला आहे . तरी यशस्वी सर्व विद्याथारंचे हार्दिक अभिनंदन …।

27/02/2014

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

13/02/2014

thought for the day..............

शासकीय योजनांची माहिती
11/02/2014

शासकीय योजनांची माहिती

11/02/2014

thought for the day.................

11/02/2014
10/02/2014

good evening.................:-)

04/02/2014

गणेशजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...............!!!

10/01/2014
विजेसारखी तलवार चालवुन गेला,निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्यान...
10/01/2014

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."................................................!!

Address

Karad
415111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mankeshwar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mankeshwar Foundation:

Shortcuts

Share

Category