Shree Girija Shankar Highschool Rajache Kurle

Shree Girija Shankar Highschool Rajache Kurle The Authorised Highschool from Swami vivekanand Sansta It is a Educational Page Information

SSC बॅच 1987 -1988 गेट टुगेदर #38 वर्षश्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले येथील चा तब्बल 38वर्षांनी गेट टुगेदर करण्य...
16/12/2025

SSC बॅच 1987 -1988 गेट टुगेदर #38 वर्ष

श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले येथील चा तब्बल 38वर्षांनी गेट टुगेदर करण्यात आले.


#शाळा
#वर्गमित्र
दोस्त

16/12/2025

श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले येथील SSC बॅच 1995 -1996 चा तब्बल 30 वर्षांनी गेट टुगेदर
दोस्त
#वर्गमित्र
#शाळा

वर्ष ६वे-ज्ञानवर्धिनी संकल्प2025आमचे वंदनीय बाबा कै. गणपती शंकर गुरव यांच्या स्मरणार्थ  फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशन, रा....
19/08/2025

वर्ष ६वे-ज्ञानवर्धिनी संकल्प2025
आमचे वंदनीय बाबा
कै. गणपती शंकर गुरव यांच्या स्मरणार्थ फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशन, रा. कुर्ले यांच्या सौजण्याने श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले शाळेतील इयत्ता दहावी प्रथम क्रमांक-कु.वैष्णवी प्रदीप माने हिस स्वतंत्र दिना निमित्ताने बक्षीस वितरण!

धन्यवाद!
#ज्ञानवर्धिनी

#शाळा
#सायकल
#सामाजिकजागृती

माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेत काम करत असणारे राजाचे कुर्ले गावचे सुपुत्र ,कला शिक्षक श्री भीमसेन सुपले सर यांची श...
19/08/2025

माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेत काम करत असणारे राजाचे कुर्ले गावचे सुपुत्र ,कला शिक्षक श्री भीमसेन सुपले सर यांची शाळेशी अनोखी भेट वस्तू ...
#पियानो

धन्यवाद! सर
#माजी विद्यार्थी
#शाळा
#कला

22/06/2025

**संस्थामाता सुशीला देवी साळुंखे* समृद्ध ग्रंथालय व वाचनालय श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले.

*उदघाटन व लोकआर्पण सोहळा.....!!!!!*

फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशन राजाचे कुर्ले यांच्या विचारातून तसेच ग्रामपंचायत राजाचे कुर्ले,माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या आर्थिक सहकार्याने,व श्री गिरिजा शंकर हायस्कूल यांच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेलं *संस्थामाता सुशीला देवी साळुंखे* समृद्ध ग्रंथालय व वाचनालय

*उदघाटन व लोकआर्पण सोहळा.....!!!!!*

SSC BATCH 2003Gate-together 13 MAY 2025 #मैत्री #बालमित्र  #स्नेहमेळावा   सर्वाना प्रेमाचा नमस्कार....काल आपली एसएससी बै...
19/05/2025

SSC BATCH 2003

Gate-together 13 MAY 2025

#मैत्री
#बालमित्र
#स्नेहमेळावा


सर्वाना प्रेमाचा नमस्कार....

काल आपली एसएससी बैच 23 वर्षा नंतर एकत्र आली खुप छान वाटल सर्वाना भेटून हे सर्वांनी अनुभवल ही असेल, जे आपल्यातुन कायम स्वरूपी निघून गेलेत त्यांची ही आपन आठवण केली त्यांना श्रद्धांजलि वाहिली... काही मित्र मैत्रीनी व्यक्तिगत कारना मुळे येवू नाहीत शकले नाहीत

...सर्वांचे मनापासून आभार सर्वांनी खुप सहकार्य केल तुम्ही होता म्हणून कार्यक्रम झाला, जे उपस्थित होते त्यांनी तो आनंद अनुभवला आणि परत एकदा त्या शाळेच्या दिवसा मधे गेलो ते जुने दिवस आठवले दहावी च्या वर्गात गेल्यावर सर्व भावनिक ही झाले... हॉटेल साईं सम्राट (सातारा )ला गेल्यावर सर्वजन स्वताबद्दल बोलले स्वताबद्दल माहिती दिली खुप दिवसातून सर्वजन मनसोक्त हसले त्यात स्वता बद्दल बोलताना असेल, संगीत खुर्ची खेलताना, गानी म्हणताना सर्वानी सर्व एन्जॉय केल... म्हणून एवढच वाटत की जो आनंद क्लासमेट सोबत असतो तो इतर ठिकाणी भेटत नाही... म्हणून सर्वांनी एकत्र राहु एकमेकांच्या संपर्का मधे राहु सर्वांची साथ भेटली तर आपल्या एसएससी बैच ची सिल्वर जुबली (25 वर्ष) पूर्ति निम्मीत खुप छान प्रोग्राम शाळेत घेवू तेव्हा अजुन छान नियोजन करू आणि सर्वाना आमंत्रित करू...

सर्वांना शाळेतील अडचनी समजल्या असतील, आपन त्यावर चर्चा ही केली आहे तर आपल्याकडून त्यातील काही गोष्टी करायच्या आहेत त्यात सर्वांचे सहकार्य लागणार आहे त्याच ही नियोजन सर्वाना लवकर सांगितल जाईल... आर्थिक स्वरुपात किती अमाउंट लागेल याचा अंदाज घेतला जाईल...

पुन्हा एकदा सर्वांचे खुप खुप आभार तुम्ही होता म्हणून कार्यक्रमाला शोभा आली असेच सहकार्य असूद्या...*🙏🤝

आपलाच मित्र
विध्यार्थी SSC BATCH 2003

श्री गिरीजा शंकर हायस्कूल, राजाचे कुर्ले विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षा मार्च 2025 मध्ये 🌹🌹उज्वल यश🌹🌹1)प्रथम क्रमांक . कु...
17/05/2025

श्री गिरीजा शंकर हायस्कूल, राजाचे कुर्ले विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षा मार्च 2025 मध्ये
🌹🌹उज्वल यश🌹🌹
1)प्रथम क्रमांक . कुमारी वैष्णवी प्रदीप माने .92.20 %
2) द्वितीय क्रमांक. कुमारी कार्तिकी कुंडलिक माने. 91.60 %
3) तृतीय क्रमांक. कुमारी अनुष्का अमोल माने. 88.40 %
4) चतुर्थ क्रमांक. कुमारी सायली बापूसो थोरवे. 88.00 %
5) पाचवा क्रमांक.विश्वजीत अनिल माने.86.00 %

परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी - 45
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी. - 44
अनुत्तीर्ण विद्यार्थी. - 01

💐💐 विद्यालयाचा शेकडा निकाल. 💐💐 97.77 %

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐
शुभेच्छुक: मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ राजाचे कुर्ले.

*जगातल्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जावा पण**शाळेतल्या मित्रांसारखा ग्रुप कुठेच बघायला मिळत नाही.* 😍🍀*श्री गिरीजा शंकर हाय...
05/05/2025

*जगातल्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जावा पण*
*शाळेतल्या मित्रांसारखा ग्रुप कुठेच बघायला मिळत नाही.* 😍🍀

*श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले SSC बॅच 2010*

खरंच कालचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस होता.तब्बल 15 वर्षांनी आपण सर्वजण भेटलो ,असा हा अविस्मरणीय दिवस ठरला.

आज जवळपास 6 महिने झाले आपण नियोजन करतोय.पण ते काही पूर्ण होईल असं वाटत नव्हतं कारण याच्या आधी सुध्दा सर्वांचा एक अयशस्वी प्रयत्न झाला होता. पण त्या नंतर आपण ही गेट टुगेदर घ्यायचंच हा विषय व्हॉट्सअँप च्या ग्रुप वरती सारखाच चर्चेला यायचा. कारण ही तसच होत. की आमच्या मागील बॅच चे व पुढील बॅच चे पण गेट टुगेदर झाले होते. मग आमच्या नियोजनालाही सुरवात झाली.सगळ्यांना फोन चालू झाले, प्रत्येकाचा सुट्यांचा प्रश्न होता त्या साठी हालचाली सुरू झाल्या.आणि त्यात फौजी लोकांची सुट्टी आणि मग त्यात रविवार शोधणे आणि मग बाकीच्या लोकांच्या सुट्या या सगळ्यांचा मेळ घालून मग 4 मे 2025 ही तारीख गेट टुगेदर साठी फायनल झाली. आणि मग तयारी चालू झाली.
आम्ही जानकी टुरिझम बोरगांव मधील वॉटर पार्क बुक केले .आणि बघता बघता 4 मे तारीख जवळ आली काही जन आदल्या दिवशी गावात आले तर काही जन तिथे बोरगांवलाच आले. आम्ही 4 मे रोजी सकाळी 9 वाजता शाळेमध्ये भेटायचे ठरवले 9 ते 10 वेळ शाळेमध्ये काढला त्या वेळीं आमच्या 10 वी च्या वर्गामध्ये गेलो तर एका क्षणात सगळं विसरून 15 वर्ष माग जावून पुन्हा त्या 10 वी च्या बाकावर बसलो तिथं लावलेले पताके, कर्डशित पेपर वरती काढलेली चित्रं तोच हिरवा फळा, भिंतीवर काढलेले सुविचार, वर्गा बाहेर असलेली हरे राम , हरे राम ची प्रार्थना दहावीच्या वर्गा समोरील महादेवाचे छोटेसे मंदिर पाहून मन अगदी भारावून गेले. नुकतीच बदललेली शाळेची नवीन इमारत, शाळेला कंपाऊंड केलेली भिंत व त्यावर झालेली रंग-रंगोटी ,शाळेमध्ये बसवलेले CCTV कॅमेरे,पाण्याचा RO प्लांट, डागडुजी केलेले स्टेज,यांनी सांगितल की शाळा सोडून तुम्हाला 15 वर्ष झालीत. परंतु शाळेची घंटा आजही तशीच होती आणि त्याच जोशात आजही संपूर्ण शाळा गोळा करण्याचं धाडस तिच्यात दिसलं .
तीथं थोडस फोटो वैगेरे काढून जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला व मग 3 गाड्या घेउन आम्ही जानकी टुरिझम बोरगांव ला निघालो. तिथं पोहचल्यावर आम्ही डायरेक्ट मिसळ पाव चा नाष्टा केला व एक हॉल घेतला. व तिथेच सर्वजण गप्पा मारत बसलो.10 वी पर्यंत कधीही एक मेकांशी न बोललेली मुल- मुली आज मनमोकळे पणाने एक मेकांशी बोलत होते. बोलताना प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. तिथं जातानाच आम्ही 2 केक घेऊन गेलो. व त्याच हॉल मध्ये केक कापून एक मेकांना खाऊन दिला व कार्यक्रमाची सुरुवात केली. एक एक जन समोर येऊन शाळा सोडल्या पासुन 15 वर्षांचा प्रवास ,त्यात आलेले चांगले वाईट अनुभव सांगायला लागले मुलींनी आपलं आपलं गाव व माहेरची आडनाव पण सांगितली पण ती काय आमच्या लक्षात राहिली नाहीत.कोण म्हणतंय मी हाऊस वाइफ आहे तर कोण म्हणतंय मी बिजनेस चालवते तर कोणी म्हणतंय की मी जॉब करते. सेम तसच मुलांचं देखिल काहीजण जॉब करतात,काहीजण गव्हरमेंट सर्वंट आहेत, काही फौजी, तर काही बीजनेसमॅन अशा या सर्वांच्या गप्पा झाल्या नंतर मध्येच आम्हाला समजलं की आमच्यातीलच एक व्यक्ती आमच्यबरोबर नव्हती. ही गोष्ट सर्वांनाच न झेपणारी होती. तिच्यासाठी सर्वांनी मौन धरून पुढील कार्यक्रम चालू केला व त्या नंतर आम्ही जेवण करायला गेलो तिथलं जेवण ही खुप छान होतं. सगळ्यांना जेवण करण्यासाठी एकत्र बसायच होत.पण एवढी मोठी जागा मिळाली नाहीं म्हणूण मग आम्ही झाडांच्या सावलीत थंड हवेत लॉनमध्ये जेवण करायला बसलो.तिथेचभरपुर वेळ गप्पा मारल्या व नंतर तेथुन बोटिंग करायला गेलो. बोटिंग ला देखिल खुप छान वाटलं सर्वांना. बोटिंग करून झुलता पुलावरती सगळे गेले तिथं होणारे भितीचे वातावरण खाली उभे असणाऱ्यांना हसवत होतं. त्या नंतर आम्ही ट्रॅक्टर ला जोडलेल्या ट्रेन मध्ये बसून संपूर्ण वॉटरपार्क ला राऊंड टाकला व पुन्हा हॉल मध्ये येऊन गप्पा मारत बसलो. तिथं थोडावेळ मुलांनी डान्स देखिल केला व नंतर अमृताने प्रत्येका साठी एक छोटी भेटवस्तू आणलेली होती. ती घेऊन आम्ही सगळे तेथुन बाहेर पडलो . व तेथुन पुढे साताऱ्याला गेलो तिथं जाऊन सर्वांनी मटणावर ताव मारला व काहीजण पुण्याला गेले, काहीजण तेथूनच आपल्या गावी व राहिलेले आपल्या गावाला कुरल्या ला आले.येताना रहिमतपूर मध्ये सर्वांनी आईस्क्रीम खाल्लं व घराकडे निघालो. पण माघारी परतत असताना सर्वांचेच चेहरे पडलेले होते . करणं पहिल्यांदाच सगळे एकमेकांना भेटले होते व मनमोकळे पणाने बोलले होते. माघारी येताना प्रत्येकजण एकच विचारत होता की पुन्हा कधी असे नियोजन करायचे .

*खरचं 4 मे हा दिवस तुम्ही सर्वांनी मिळून अविस्मरणीय केल्या बद्दल धन्यवाद* 🙏

*मित्रांनो एक मेकांना भेटतं जावा एक मेकांची खुशाली कळवत जावा *// क्या पता कल हो ना हो //*

*आपलाच तुषार माने*🖋️✍🏼

श्री गिरीजा शंकर हायस्कूल,राजाचे कुर्लेस्नेह मेळावा SSC बॅच 2006 #बालमित्र #स्नेहमेळावा
05/05/2025

श्री गिरीजा शंकर हायस्कूल,राजाचे कुर्ले

स्नेह मेळावा SSC बॅच 2006
#बालमित्र
#स्नेहमेळावा

श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले  #कला प्रेम #चित्रकार
06/03/2025

श्री गिरीजा शंकर हायस्कूल राजाचे कुर्ले
#कला प्रेम
#चित्रकार

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  *तब्बल ४९ वर्षानंतर* श्री गिरीजाशंकर हायस्कूछ राजाचे कुर्ते येथील *एस. एस. सी बैच...
04/03/2025

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे
*तब्बल ४९ वर्षानंतर* श्री गिरीजाशंकर हायस्कूछ राजाचे कुर्ते येथील *एस. एस. सी बैच १९७६* च्या मात्री विद्यार्थीचे एकत्र
# *मैत्रीला वय नसतं व शाळेच्या तर मुळीच नाही!*

दिनांक २ मार्च २०१५ रोजी सातारा येथीद हॉटेल राजवाडा इन" या ठिकाणी उत्साहात पार पडले मेळाव्यास एकूण ३५ विदयार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहणे, विदयालयाचे बीजगणीत व भूमितीचे माजी शिक्षक श्री. बी.ए. पवार सर उपस्थित होते.

प्रथम सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रमुख पाहु‌णे श्री पवार सर व इतर वविद्यार्थी यांनी केले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री पवार सर यांनी 'चाला तरच चाललं' सूर्यनमस्कार ,आहारात पालेभाज्या सॅलेड यांचा समावेश याचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी माने यानी केले, तर सुत्रसंचालन श्री हणमंत भाग्यवंत यांनी केले. श्री सयाजी माने यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.

सर्व विद‌यार्थी यांनी श्री.पवार सरांचा सन्मान व सत्कार करत त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास गणपत माने, सुधाकर सुपले, विश्राम शेडगे, अशोक क्षिरसागर, बाळासो माने, अरविंद थोरवे, नामदेव पोळ, रामचंद्र माने, प्रकाश जगदाळे, आशा पाटील, लतीका पवार,उषा भोसले, रंजना देशमुख, सुनंदा जाधव, नंदा देशमुख, प्रभावती निकम, सिद्धार्थ शिंदे ,शशिकांत सुपले, कमल पाटील,आदी माजी विध्यार्थ्यां उपस्थित होते.

#ऋणानुबंध
#बालपण
#माझी शाळा
#जगण्याचा आनंद..

श्री गिरीजा शंकर हायस्कूल चे यश..कु.सोनाक्षी संतोष माने सातारा विभागीय भाषण स्पर्धेत लहान गटाततिसरा क्रमांक!!तसेच समृद्ध...
01/02/2025

श्री गिरीजा शंकर हायस्कूल चे यश..
कु.सोनाक्षी संतोष माने

सातारा विभागीय भाषण स्पर्धेत लहान गटात

तिसरा क्रमांक!!
तसेच समृद्धी दीपक माने हिने ही सहभाग नोंदवला दोघींचं ही

अभिनंदन!!
अभिनंदन!!

#भाषण
#वक्तृत्व
#स्पर्धा
#शिक्षण

#दैनिक पुढारी
#दै.प्रभात

Address

Rajache Kurle Near Pusesavali Karad Road Taluka :-Khatav District:-Satara
Karad
415512

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919730637681

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Girija Shankar Highschool Rajache Kurle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shree Girija Shankar Highschool Rajache Kurle:

Shortcuts

Share

Category