ज्याला कोणाला सोबत काम करायचं त्यांनी hi SMS करा
लैंगिक वैवाहिक व्यवसायिक मार्गदर्शन करणारे पेज
लैंगिक समस्या असतील किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम ऐकमेव मार्गदर्शन करणार पेज.
प्रत्येक तरुणांने बिजनेस केला पाहिजे म्हणून सतत मार्गदर्शन करणारे आपलं हक्कच मराठी पेज
������
आपण पुन्हा व्यवसाय बदल पोस्ट टाकायला चालू करू या
17/07/2025
माझ्यासहीत अनेकांसाठी मार्गदर्शक पोस्ट...👇
रिल्स बघून हॉटेल व्यवसायात उतरण्याची तय्यारी करणाऱ्या मित्र मंडळींनी नक्की वाचावा असा अनुभव.
ही वेळ कोणावर येऊ नये..
हॉटेल मालकाने स्वतः लिहिलेली ही पोस्ट आहे ...
कृपया सगळ्यांनी वेळात वेळ काढून वाचा ...
"नमस्कार,
मी हॉटेल गावरान बंधूचा ( तीनपैकी एक) सर्वासर्वा..
आज वार गुरवार, तारीख सतरा सात दोन हजार पंचवीस..
आजपासून आपलं हॉटेल कायमस्वरूपी बंद राहील.
कारण की आपण जे सपान पाहून हॉटेल चालू केलं होतं तसं काई होताना दिसत नाई.. त्याच्यामुळं हॉटेल गावरान बंधू कायमचं बंद करतोय याची सर्वांनी नोंद घ्यावी. कोणीही इतक्या दिवस केली न्हाई तशीच गर्दी करू नई. धन्यवाद.
हॉटेल गावरान बंधू...आता सेट अप इकायचंय का इचरा अन् फायनल कितीला देता इचरा.."
खरंतर ही व्हिडिओ बनवण्यासाठी लिहिलेली स्क्रिप्ट होती पण ज्या गोष्टीची थोडी लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवून माज दाखवण्याची हिंमत झाली नाही म्हणून व्हिडिओ बनवायचा प्लॅन कॅन्सल केला.
तुम्हाला अजूनही मजाक वाटत असेल तर खरं सांगतो आम्ही एक जुलैपासून आमचं हॉटेल बंद केलं आहे.
आता मी हे फेसबुकवर का लिहितोय तर माझ्यासारखंच स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचा विचार करत असलेल्या एखाद्या मित्राला ही पोस्ट वाचून अजून विचार करायला वेळ मिळेल आणि कदाचित माझं जे नुकसान झालं ते त्याचं होणार नाही.
माझा मुळ व्यवसाय गावरान बंधू शेतकरी उत्पादक कंपनी. यामध्ये आम्ही हिवाळ्यात आमच्या शेतातला ज्वारीचा गुळभेंडी हुरडा आणि इतर पदार्थ विकतो. हुरड्याचा सिझन फक्त हिवाळ्याचे तीन महिने असतो त्यामुळे बाकी वर्षभर मला विशेष असं काही काम नसतं. त्याकाळात गेली तीन चार वर्षे मी वेगवेगळे जॉब जॉइन केले पण जॉब करण्याचा माझा पिंड नाही त्यामुळे मी कुठे टिकलो नाही.
जन्मतःच आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करण्याचा किडा असल्यामुळे माझी "एक ना धड भाराभर चिंध्या" अशी अवस्था आहे. त्यानुसार यावर्षी कुठे जॉब करायचा नाही असं ठरवून स्वतःचं हॉटेल सुरू करायचं ठरवलं आणि एप्रिल महिन्यात पुण्यात नवले मेडिकल कॉलेजसमोर शॉप भाड्याने घेऊन मी आणि माझा पार्टनर Rushikesh Navale आम्ही हॉटेल सुरू केलं.
शॉपचा मालक मित्र असल्याने तोही आमच्यात पार्टनर झाला त्यामुळे सुरुवातीला कराव्या लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचे तीन भाग झाले. प्रत्येकाच्या वाट्याला येणारा आकडा एवढा काही मोठा नव्हता त्यामुळे हा प्रयोग फसला तरी खूप मोठं नुकसान होणार नाही आणि प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात अजून मोठा विचार करता येईल असा विचार करून आयुष्यात अजून एक प्रयोग करायचं ठरवलं.
इथे माझी पहिली चूक झाली ती म्हणजे निर्णय घेण्यात घाई.
हॉटेल व्यवसायाचे कुठलेही ज्ञान, अनुभव किंवा कौशल्य नसताना मी फॉर्ममध्ये येऊन क्रीज सोडली आणि काही कळायच्या आत स्टंप-आऊट झालो. तीनच महिन्यात माझ्यावर हॉटेल बंद करण्याची वेळ आली.
हॉटेल सुरू करताना आमच्या डोक्यात वेगळीच हवा होती त्यामुळे आम्ही हॉटेलच्या इंटेरियरवर मोकळ्या हाताने खर्च केला. भरपूर अनावश्यक सामान विकत घेतले. कलर थीम अन् लाईट्चा झगमगाट अन् नावाचा बोर्ड विचारू नका किती खर्च झाला ते...
तिघांपैकी कुणालाही स्वतः काही बनवत येत नसल्याने आम्हाला आचारी/वस्ताद/शेफ ठेवावा लागला. चपाती- भाकरी बनवायला आणि भांडी घासायला दोन महिला कामगार ठेवाव्या लागल्या. तिघांचा पगार, शॉपचे भाडे, लाईट बिल, किराणा, भाजीपाला, डेअरी, चिकन, नवीन घेतलेल्या वस्तूंचे ईएमआय असा आमचा महिन्याचा बेसिक खर्च लाखात होता.
हॉटेलचं उत्पन्न आणि हॉटेलचा खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता हे लक्षात येता येता आमचा पहिला महिना गेला.
हॉटेलच्या एरियाचा अभ्यास न करता आम्ही स्वतःच्या मनाने जेवणाचा मेनू आणि त्याच्या किंमती ठरवल्या आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्या एरियात बॅचलर आणि हॉस्टेलला राहणारी पब्लिक जास्त असल्याने त्यांना क्वालिटी चांगली देऊनही त्यांनी किंमत पाहून आमच्याकडे पाठ फिरवली ती कायमचीच.
आम्ही तीन महिने कष्ट भरपूर केले. सकाळी दहा ते रात्री बारा आम्ही हॉटेलला असायचो. काम करण्याबद्दल कुणाची काही अडचण नव्हती पण आम्हाला अपेक्षित व्यवसाय झाला नाही म्हणून आमचा हिरमोड झाला.त्यानंतर दुसरा महिना आम्ही आशेवर काढला आणि तिसरा निराशेत.
सुरूवातीला बरंच काही करण्याचा हुरूप होता पण हिरमोड होत गेल्यावर आमचा उत्साह मावळला. हॉटेलचे प्रभावी मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडलो. लिहून ठेवलेले अनेक प्लॅन्स कागदावरच राहिले. आमच्या वेळकाढूपणामुळे तीन महिन्यात आम्ही स्विगी झोमॅटोवर आमचे हॉटेल रजिस्टर करू शकलो नाही. अशा आमच्या अनेक चुका झाल्या. इथे लिहिता येणार नाहीत अशाही काही गोष्टी घडल्या आणि मग अजून पुढे होऊ शकणारं नुकसान टाळण्यासाठी आम्ही हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःचे हॉटेल सुरू करण्याच्या विचारात असलेल्या मित्रांसाठी गेल्या तीन महिन्यात मी शिकलेल्या काही गोष्टी लिहितो.
1) हॉटेलचा धंदा प्रॉफिटचा आहे का तर हो..हॉटेलमध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्तही प्रॉफिट राहू शकतं फक्त आपल्याला खर्चाच नियोजन जमलं पाहिजे.
2)आपल्याला जे विकायचं आहे ते स्वतःला बनवता येत असेल तर बेस्टच पण नसेल येत तर त्यासाठी लागणाऱ्या सामानाचा आणि खर्चाचा किमान अंदाज तरी आपल्याला असायला हवा.
3) आपण आपल्या ग्राहकाची परिस्थिती जज करू नये पण ज्या भागात आपल्याला व्यवसाय करायचा आहे तिथं राहणाऱ्या लोकांच्या income आणि spending capacity (खर्च करण्याची क्षमता) याचा अंदाज घेऊन आपल्या वस्तूंची किंमत ठरवावी.
4) एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत असेल तरच पार्टनर घ्या आणि जास्तीत जास्त दोन पार्टनर असू द्या.
5) आपली एक्स्ट्रा मेहनत आपला विकास करणार आणि आपला कामचुकारपणा हा आपलंच नुकसान करणार हे सूत्र बहुतेक प्रत्येक व्यवसायाला लागू होईल.
6) धंद्याच्या गल्ल्यातला एक रुपयाही वैयक्तिक खर्चासाठी वापरू नये. एक अन् एक रुपयाचा हिशोब लागलाच पाहिजे.
7) सगळं देणं मिटवून झाल्यावर जेव्हा खात्यात प्रॉफिट शिल्लक राहत असेल किंवा strong back up plan असेल तेव्हाच लोन करावे.
8) यशस्वी झालात तर माजू नये कारण आपल्यापेक्षा खूप मोठमोठे लोक अतिशय नम्र असतात. अयशस्वी झालात तर लाजू नये.. अपयशातून शिकावं आणि हसत हसत पुढच्या आयुष्यातल्या प्रयोगाला सामोरं जावं.
यश पचवता नाही आलं तरी चालेल पण अपयश पचवता आलं पाहिजे म्हणून हा लेखनप्रपंच.
हॉटेल व्यवसायात उतरण्याच्या तयारीत असलेल्या आपल्या मित्रांना नक्की पाठवा.
धन्यवाद.
आपलाच - अमित मरकड
अमित मरकड
14/08/2024
या लहान मुलीला पोलिस घेऊन आले होते. काल एका ब्रिजखाली सापडली आहे. फार गोड बाळ आहे, आवाज एकदम खणखणीत... पण तिला तिच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. नाव विचारलं तर फक्त 'छोटी' एवढंच सांगते. भाषा हिंदी आहे.
वाईट गोष्ट अशी की तिच्या अंगावर जागोजागी मारहाणीच्या खुणा आहेत, काळे निळे व्रण आहेत, डोक्यावरही मार लागलेला आहे. आता ती स्टेबल आहे, एकदम हसून खेळून बोलत आहे पण अंगावरचे, पाठीवरचे वळ बघता खूप त्रास झाला असावा. फार वाईट वाटलं, लोक का करत असतील असं?
एक डॉक्टर म्हणून उपचार करणं, प्रकरण हाताळणं सोपं आहे पण एक माणूस म्हणून फार अवघड वाटतात या गोष्टी.
विचार करून बघा आपलं बाळ पाच मिनिटं नजरेआड झालं तर कसं वाटतं... कुठे चाललंय हे सगळं?
ज्याने कोणी तिला असं मारहाण करून सोडून दिलं असेल ती व्यक्ती किती निष्ठूर असेल...
यात एक गोष्ट फार चांगली वाटली की, पोलिस त्या बाळाला फार छान वागवत आहे. सोबत असलेल्या लेडीज पोलीस कॉन्स्टेबल अगदी स्वतःच्या मुलीसारखं सांभाळत आहेत. तिला खाऊ पिऊ घालण्यापासून, कडेवर उचलून घेण्यापर्यंत. एक सेकंद सुद्धा त्या मॅडम मुलीला नजरेआड होऊ देत नाहीत. बऱ्याच वेळा लोकांचे पोलिसाचे अनुभव चांगले नसतात पण अशावेळी मात्र ते फार चांगले वागतात. ते पण आधी माणूसच आहेत...!
मी पोलिसांना विचारलं की, मी थोडीफार काही मदत करू शकतो का? सोशल मिडियाचा काही वापर करता येईल का? अर्थात त्यांना ते आवडलं.
मला जाणीव आहे की, असा फोटो टाकणं ठीक नाही पण या माध्यमातून जर तिच्या घरच्या पर्यंत, आई वडिलांपर्यंत पोहोचता आलं तर त्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती नसेल. पोलिसांना विचारून त्यांच्या परवानगीने हा फोटो आणि ही पोस्ट करत आहे. उद्देश प्रामाणिक आहे!
महत्त्वाचं: पिंपरी चिंचवड परिसरातील रावेत भागातील एका ब्रिजखाली ती सापडली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. झोपडपट्टी किंवा एखाद्या कामगार वसाहतीतील ती मुलगी असावी. त्या भागातील पत्रकार, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक यांनी पुढाकार घेतला तर त्या बाळ योग्य ठिकाणी जाईल. शक्य झाल्यास ओळख पटवण्यात आपलीही त्यात मदत व्हावी🙏🏼
डॉ. प्रकाश कोयाडे
पोस्ट दिनांक : १४ ऑगस्ट २०२४
22/07/2024
#रत्ना_आंबा ही व्हरायटी कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली आहे.
🟥 नीलम आंबा व हापूस आंबा यांच्या संकरापासून तयार केलेली ही व्हरायटी आहे.
🟥 चुनखडी असलेल्या जमिनीमध्ये शक्यतो लागवड टाळावी.
🟥 पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड जमिनीत लागवड करावी.
🟥 लागवडीनंतर तीन वर्षात फळधारणा होते.
🟥 या आंब्याची चव ही हापूस आंब्यासाठी असते.
🟥 हा आंबा पिकल्या वरती आठ दिवस टिकतो.
दत्ता खराडे
090827 27363
🍋🍊🥭🍑🍒🥑🥝🍎🍏🍇🧅
04/07/2024
अपमान करन शिव्या घालन कोणत्याही महान लीडरला या मधून जाव लागत आणि हे काही कायम नसत पण या मध्ये स्थिर होयाला
मन आणि डोकं खुप शांत लागतं.. आपल्या कामावर फोकस करावं लागतं आणि हार्दिक पांड्याने तेच केल...आणि आज त्यानें दाखवून दिले am the best....
अगदी काही दिवसांपूर्वी याला सगळे भरपूर शिव्या देत होते.
याच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल चेष्टा मस्करी करत होते.
असं वाटलं याला काढून टाकतील. त्याचे करिअर संपेल..
पण तो खचला नाही शांत राहिला. विचार करा अशा वेळी मानसिक खच्चीकरण किती झाल असेल त्याचं पण त्याने स्वतःला विचलित होऊ दिले नाही.
व्यवसाय करताना सुद्धा अनेक वेळा असे चढउताराचे प्रसंग आयुष्यामध्ये येत राहतील कधी अपयश मिळेल कधी पदरी निराशा मिळेल.
पण खचून जाऊ नका कोणत्याही कारणाने..
तुम्ही फक्त तुमचे बेस्ट देत रहा नक्की तुमचा बिजनेस वाढेल..
.
03/07/2024
03/07/2024
☝🏻पुण्याचे रहिवासी श्री. इनामदार. भन्नाट व्यक्ती. गेल्या 3 वर्षात लोकांनी पाणी पिऊन फेकून दिलेल्या प्लास्टिक च्या 1 लिटर च्या बाटल्या ते व त्यांच्या कुटुंबाने गोळा केल्या. त्यात माती भरली व नेहमी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या विटा ऐवजी त्या माती भरलेल्या बाटल्यांचा उपयोग करून सिंहगड च्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या प्लॉट वर दुमजली बंगला बांधला. फायदा असा की 1. बांधकाम खर्च निम्मा झाला. 2. प्लास्टिक च्या बाटल्या मुळे होणारे प्रदूषण थांबले. 3. विटा भाजताना लागणारी heat energy वाचली. 4. विटा भाजताना होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण थांबले. आहे की नाही भन्नाट idea व कृती. खाली त्यांच्या बाटली बंगल्याचे फोटो पाठवत आहे.......
दत्ता खराडे
090827 27363
30/06/2024
जय शिवराय मित्रानो... आता पावसाळा सुरू झाला आहे लोकं आता फिरायला बाहेर पडत आहेत..
तर तूम्ही निसर्ग भागात किंवा रस्त्यावर.. कणसे विकायचा बिजनेस सुरू करू शकता 5 रू मिळणार कणीस तूम्ही 40 ते 50 रु विकु शकता
कमी वेळात जास्त फायदा देणारा हा सिजनेबल बिजनेस आहे....
याला गॅस किंवा वेगळा अस खर्च लागतं नाही तुम्ही कोळशावर सुध्दा हा बिजनेस करु शकता ..
मित्रानो भेले तुमच्या कडे व्यवसाय करायला लाखो रुपये नाहित पण छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही नक्कीच लाखो रुपये कमावू शकता..
आपल्या गावात जर कोणी मुले असतील किंवा ते बेरोजगार असतील तर मिळून करायला काही हरकत नाही..
आपल्या जवळच्या मित्राला शेर करा.. त्यांना नक्कीच फायदा होईल
अधिक माहितीसाठी किंवा काही मदत लागली तर मला sms करा
090827 27363
27/06/2024
पब्लिक स्विंगपुला मध्ये जाताना ... जरा खालील पोस्ट वाचा..
आज चिखली मध्ये एका डॉक्टरांची मुलगी जी केवळ 16-17 वर्षाची होती अॅक्युट पॅनक्रिया टायटीस मुळे गेली. तीन-चार दिवसांपूर्वी तिला अचानक संध्याकाळी पोट दुखायला लागलं नंतर उलट्या सुरू झाल्या ...लगेच ऍडमिट केलं.. फिजिशियन कडे दोन दिवस त्यांनी ट्रीटमेंट करून बघितले. ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली .त्यामध्ये तिला अॅक्युट पॅनक्रियाटायटीस निघाला.ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत नाहीये हे बघून थर्ड डे ला तिला लगेच संभाजीनगरला शिफ्ट केलं. तिथे ती मल्टी ऑर्गन फेलीवर मध्ये गेली .पलमनरी ईडीमा.. प्लुरल ईफ्युजन अशा बऱ्याच शारीरिक अडचणी सुरू झाल्या आणि एडमिट केल्यानंतर थर्ड डे ला सकाळी तिचा आज मृत्यू झाला. एवढ्या कमी वयामध्ये अॅक्युट पॅनक्रॅटिस कसा काय झाला असं डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी जे सस्पेक्टेड कारण सांगितलं ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं ...मेडिसिनच्या बुकमध्ये स्विमिंग पूल डिसीज चे वर्णन आलेले आहे. या चॅप्टरमध्ये कॉमन स्विमिंग पूल वापरल्यामुळे काय काय इन्फेक्शन होऊ शकतात त्याचं वर्णन केलेलं आहे .हा पेशंट सुद्धा पाच सहा दिवसांपूर्वी पुणे किंवा शिर्डीच्या वाटर पार्क मध्ये गेला होता आणि .....तिथेच या मुलीला कुठलं तरी इन्फेक्शन झालं ..जे त्या पाण्यामध्ये तिच्या नाकात तोंडात गेलेलं होतं आणि पुढच्या चार-पाच दिवसांमध्येच एवढे भयंकर प्रॉब्लेम सुरू झाले आणि आज तिची डेथ झाली. त्यामुळे यानंतर स्विमिंग पूल मध्ये उतरण्याआधी थोडा विचार करूनच उतरा.🙏🙏विनंती
आता ट्रेड आला आहे.. मस्त स्विमिंग पुला मध्ये जाऊन अंघोळ करायची त्या मध्ये 10 ते 12 लोकं अंघोळ करत असतात.. कोणला कोणत इन्फेक्शन असेल याची आपल्याला कोणतीही माहिती नसते याचे परिणाम खुप भयानक आपल्याला भोगावे लागतात
काही जण तर पाण्या मध्ये लघवी करतात... किंवा थुकतात.. तेच पाणी आपण तोडांत घेतो ... अंगावर घेतो उद्या खुप भयंकर त्वचाविकारासाठी तयार रहाव लागतं....
दत्ता खराडे
090827 27363
26/06/2024
Business idea....
कोट्यधीश बनण्यासाठी लागते कष्ट आणि मेहनत घेण्याची तयारी. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबाबत सांगणार आहोत, जिने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या नारळाच्या कवचापासून कमाईचं नवं साधन शोधलं.
या महिलेचं नाव आहे मारिया कुरियाकोसे.
मारियानं २०१९ मध्ये थेंगा कोको नावाच्या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी नारळाच्या कवचापासून टिकाऊ, पर्यावरणपूरक हस्तनिर्मित वस्तू बनवते. केरळमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या उद्योगाने अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
२०१९ मध्ये मारिया कुरियाकोस यांनी केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात नारळाचे कवच गोळा करण्यास सुरुवात केली. मारियाने हे कवच चांगल्यारितीने स्वच्छ केले. त्यानंतर त्यावर सँडपेपरचा वापर करून त्याचा पृष्ठभाग अतिशय सुबक केला.
नारळाच्या कवचाचा उपयोग कचऱ्यातून टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरणासाठी चांगले आणि हस्तनिर्मित घरगुती वापरासाठी तयार होणाऱ्या उत्पादनासाठी करण्यात आला. मारियाने या व्यवसायाला थेंगा कोको असं नाव दिलं आहे. मल्ल्याळम भाषेत थेंगा या शब्दाचा अर्थ नारळ असा होता.
नारळाचं झाड खास असते. त्याला कल्पवृक्षही म्हटलं जाते. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगाचा असतो. मग ते झाडाचे खोड, फळे, मुळे असोत, मारिया यांना या उपयोगी भागातून प्रयोगशील आयडिया सुचली. २०१६ मध्ये मारियानं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती स्पेनला गेली.
मारियानं २०१७ मध्ये मुंबईच्या एऑन हेविट इथं सल्लागार म्हणून काम केले. नोकरीपेक्षा व्यवसाय बरा हा विचार तिच्या मनात कायम होता. पर्यावरण, समाजाला फायदा होईल असं काहीतरी वेगळे करण्याचं तिच्या डोक्यात होतं. त्यानंतर १ वर्षात मारिया यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मैना महिला फाउंडेशनचं काम सुरू केले.
मारियानं सुरु केलेल्या उद्योगात केरळमधील विविध क्षेत्रातील शेतकरी आणि कुशल कामगारांचे नेटवर्क आहे. त्यात कोट्टायम, कोंडुगल्लूर, मेट्टुपालयम आणि एलेप्पी यांचा समावेश आहे. त्यांच्या कंपनीत ३० हून अधिक लोक काम करतात त्यातील ८० टक्के महिला आहेत.
या महिला कामगारांना दरमहिना २० ते २५ हजार पगार आहे. चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मारिया यांच्या कंपनीनं तयार केलेल्या उत्पादनांची मागणी आहे. त्यासोबतच डेनमार्क, स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या देशातही भरपूर मागणी आहे. अलीकडेच देशातंर्गत मागणीपेक्षा परदेशातील मागणी वाढली आहे.
दत्ता खराडे
090827 27363
अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअँप ग्रुप... जोईन करा
https://chat.whatsapp.com/JViUvde20UHK0NuYhZdsEt
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Karad
02/08/2024