Yashwant Highschool, Karad

Yashwant Highschool, Karad रयत शिक्षण संस्थेची कराड शहरातील गुणवत्तापूर्ण शाळा.

💐बीजगणिताच्या डी. डी. पाटील सरांचा सेवापुर्ती सोहळापाहता पाहता पप्पा उद्या निवृत्त होतायत. जवळपास २५ वर्ष रयत शिक्षण संस...
30/07/2025

💐बीजगणिताच्या डी. डी. पाटील सरांचा सेवापुर्ती सोहळा

पाहता पाहता पप्पा उद्या निवृत्त होतायत. जवळपास २५ वर्ष रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आणि ७-८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा करून उद्या ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुलांना शिकवणं हि आवड आणि कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेतच काम करायचं हे मनात ठरवल्यानं वडिलांचे Msc मॅथेमॅटिक्स चे शिक्षण असूनही इतर संस्थेत प्राध्यापक होण्याऐवजी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून १९९२ मध्ये रुजू झाले.

सुरवातीला कराड तालुक्यातील धोंडेवाडी, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, त्यानंतर पुणे जिल्ह्यात चासकमान, नंतर पाटण तालुज्यातील जिंती, कराड शहरातील यशवंत हायस्कुल आणि सध्या येळगाव असा वडिलांचा प्रवास झाला. जाईल तिथं आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत त्यांनी वेगळी छाप पाडली. शिस्तप्रिय तरीही विद्यार्थीप्रिय अशी त्यांची ओळख प्रत्येक शाळेत आजही आहे. बीजगणिताचे डीडी पाटील सर म्हणून रयत शिक्षण संस्थेत लोकप्रिय असणारे असे माझे वडील उद्या सेवानिवृत्त होत आहेत.

शांत बसणं त्यांच्यासाठी सर्वात कठीण बाब आहे. सतत काहीतरी प्रयोग करत राहण, काम करत राहणं, डोक्याला खुराक देत राहणं असा स्वभाव असणाऱ्या आमच्या वडिलांना आता निवृत्तीनंतर काय करायचे असा मोठा प्रश्न पडलेला आहेच. वयाच्या एका टप्प्यानंतर माणसानं स्वतःला वेळ द्यायला हवा, थोडी विश्रांती घ्यायला हवी हे खरंय पण वडिलांना शांत बसवेल असं वाटत नाही. त्यामुळे ऑफिशियली सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचे काम थांबेल असे वाटत नाही. आशिया खंडातील रयत शिक्षण संस्थेत ३४ वर्षांची सेवा करून, बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी घडवून मोठे सामाजिक कामच वडिलांनी केले आहे असे मी म्हणेन.

आपण सर्वांनी वेळात वेळ काढून सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

यशवंत हायस्कुलच्या प्रांगणातील 2013 साली टिपलेला फोटो. तुम्ही कोणत्या बॅचचे विद्यार्थी आहात ते कमेंट करुन सांगा.
01/11/2022

यशवंत हायस्कुलच्या प्रांगणातील 2013 साली टिपलेला फोटो. तुम्ही कोणत्या बॅचचे विद्यार्थी आहात ते कमेंट करुन सांगा.

यशवंत हायस्कूल, कराडSSC 1987 बॅच, "शुभचिंतान समारंभ"दि.०५.०३.१९८७
01/11/2022

यशवंत हायस्कूल, कराड
SSC 1987 बॅच,
"शुभचिंतान समारंभ"
दि.०५.०३.१९८७

26/01/2022

यशवंत हायस्कुल, कराड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Highschool, Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category