09/01/2022
दिनांक 7/1/2022 रोजी
वंदना फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय नाटळ येथे ग्रामीण भागातील शिक्षण घेत असणाऱ्या वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले .ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब मुलांना जेव्हा त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुषाचा नियतीच्या काही प्रसंगामुळे मृत्यू होतो व त्यानंतर मुलांना शालेय, सामाजिक जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.या शाश्वत परिस्थितीचा अभ्यास करून वंदना फाउंडेशन मुंबई चे अध्यक्ष श्री.मिलिंद पवार व शशांक वंजारे यांनी कणकवली तालुक्यातील 25 मुलांना दप्तर, वह्या, कंपास ,पेन, पट्टी अशा शैक्षणिक साहित्याचा संच मुलांना दिला.यावेळी वंदना फाउंडेशन चे सदस्य राज पावसकर, दीपक पोळवणकर, प्रवीण यादव व सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत वंजारे हे उपस्थित होते .त्याच बरोबर माध्यमिक विद्यालय नाटळ शालेय समिती चेअरमन श्री.भालचंद्र सावंत मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत तांबे तसेच हरकुळ बुद्रुक केंद्रप्रमुख श्री. विजय भोगले ,भिरवंडे केंद्रप्रमुख श्री. उत्तम सूर्यवंशी ,फोंडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .सुर्यकांत चव्हाण, हरकुळ खुर्द केंद्रप्रमुख व माध्यमिक विद्यालय नाटळ समितीचे खजिनदार श्री .शांताराम सावंत तसेच मुख्याध्यापक श्री .सुनील गावकर शाळा दिगवळे नंबर.१,मुख्याध्यापिका सौ.श्रेया गवस शाळा नाटळ खांदारवाडी प्रशालेचे शिक्षक श्री .आनंद तांबे , श्री.सतीश मेस्त्री, श्री शैलेश तळेकर , सौ.प्रणिता बांबुळकर, सौ स्वरा राणे शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.रामदास टारपे व श्री.गंगाराम खरात व नववी ,दहावी चे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री दयानंद गावकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दिनेश गावित यांनी केले.