Shri Ganesh VidyaMandir Dombivli East

Shri Ganesh VidyaMandir Dombivli East

Share

SHREE GANESH VIDYAMANDIR SCHOOL,GIRIJATMAK DARSHAN,OPPOSITE STAR COLNEY,GANESH NAGAR,MANPADA ROAD,DOMBIVLI (East) 421 204.

04/07/2025

२०२५-२६ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप 🌹🎊

Photos from Shri Ganesh VidyaMandir Dombivli East's post 26/01/2024

आज ७५ वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!! आज श्री गणेश विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप उत्साहात विविध कार्यक्रम करीत , पथनाट्य , लेझीम पथक , समूह गीते , देशभक्तीपर गीते सादर केले .🇮🇳❤️🎊🌹🙏🏻

14/09/2023

इयत्ता पाचवी ते सातवी चे विद्यार्थी पर्यावरण पूरक कागदी पिशव्या बनवताना🥳🎊

Photos from Shri Ganesh VidyaMandir Dombivli East's post 14/09/2023

आज दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या श्री गणेश विद्यामंदिर प्राथमिक डोंबिवली पूर्व शाळेत पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली, व श्री लक्ष्मी नारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक अशी गणपतीची मूर्ती कशी तयार करायची हे शिकवण्यात आले.
श्री आदित्य कदम सरांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर शाडूची गणपती मूर्ती बनवण्यास शिकवले .

Photos from Shri Ganesh VidyaMandir Dombivli East's post 03/09/2023

*प्लास्टिक निसर्गात पसरू नये म्हणून आपण विद्यार्थ्यांना इको ब्रीक बनवायला शिकवले होते .त्याप्रमाणे*
*इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी इको ब्रीकस बनवल्या आहेत ते दिनांक २ सप्टेंबरला* *पर्यावरण दक्षता मंडळ आणि ऊर्जा फाउंडेशन यांना इको ब्रीकस दिल्या*.🙏🏻

*प्लास्टिकची योग्य विल्हेवाट काळाची गरज*

* plastic pollution*

Photos from Shri Ganesh VidyaMandir Dombivli East's post 15/08/2023

*आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा आपल्या शाळेमध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे .*

Photos from Shri Ganesh VidyaMandir Dombivli East's post 29/06/2023

श्रद्धा व भक्तीचा अनोखा संगम असणारी, एकमेकांमधील बंधुभाव दृढ करणारी वारकरी संप्रदायाची परंपरा वृद्धिंगत व्हावी व भक्तिरसाचा हा सांस्कृतिक वारसा कायम राहावा ही शुभकामना.

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

*दिनांक २७ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त आपल्या श्री गणेश विद्यामंदिर शाळेतील प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकरी दिंडी काढली होती. त्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी ,वारकरी अशा विविध वेशभूषा करून ध्वज पताका, टाळ, ढोलक, तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाले होते,

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री अशोक कोर सर आणि सौ संगीता तुपे मॅडम यांनी केले.

तसेच शाळेतील श्री संजय शिंदे, सौ अश्विनी बडे, सौ नीता भांगरे, सौ.सुलोचना काळे ,भूमिका पाटील या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी मानसी पांचाळ यांनी वारकरी दिंडीत विद्यार्थ्यांसमवेत अभंग वाणी म्हणत, टाळ वाजवत, फुगडी ,रिंगण खेळत उत्साहात सहभागी झाले होते .

सौ.सुलोचना काळे मॅडम यांनी आपल्या मधुर आवाजात अभंग वाणी , संतवाणी यांचे गायन केले.

सौ.बडे मॅडम यांनी आषाढी एकदशी ची माहिती दिली. विठ्ठल नामाचा जयघोष करत आपले चिमुकले वारकरी दिंडीला निघाले होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीतल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा झाला.

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.

29/06/2023

*दिनांक २७ जून २०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त आपल्या श्री गणेश विद्यामंदिर शाळेतील प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकरी दिंडी काढली होती. त्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मिणी ,वारकरी अशा विविध वेशभूषा करून ध्वज पताका, टाळ, ढोलक, तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाले होते,

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री अशोक कोर सर आणि सौ संगीता तुपे मॅडम यांनी केले. तसेच शाळेतील श्री संजय शिंदे, सौ अश्विनी बडे, सौ नीता भांगरे, सौ.सुलोचना काळे ,भूमिका पाटील या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी मानसी पांचाळ यांनी वारकरी दिंडीत विद्यार्थ्यांसमवेत अभंग वाणी म्हणत, टाळ वाजवत, फुगडी ,रिंगण खेळत उत्साहात सहभागी झाले होते .

सौ.सुलोचना काळे मॅडम यांनी आपल्या मधुर आवाजात अभंग वाणी , संतवाणी यांचे गायन केले.
सौ.बडे मॅडम यांनी आषाढी एकदशी ची माहिती दिली. विठ्ठल नामाचा जयघोष करत आपले चिमुकले वारकरी दिंडीला निघाले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीतल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे , चित्रफिती पहा .*

श्रद्धा व भक्तीचा अनोखा संगम असणारी, एकमेकांमधील बंधुभाव दृढ करणारी वारकरी संप्रदायाची परंपरा वृद्धिंगत व्हावी व भक्तिरसाचा हा सांस्कृतिक वारसा कायम राहावा ही शुभकामना. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Star Colony, Manpada Road
Kalyan
421203