श्री गजानन विद्यालय - आपली कल्याणमधील उत्कृष्ट मराठी शाळा

श्री गजानन विद्यालय -  आपली कल्याणमधील उत्कृष्ट मराठी शाळा

Share

This page is for deciding our schools 60th Anniversary Programs.

08/05/2026

🎉🏆 Proud Moment for Shree Gajanan Vidyalaya! 🏆🎉

Heartiest Congratulations to all our brilliant Students, supportive Parents, and dedicated Teachers on achieving a phenomenal 💯% Result in the SSC 10th Examination! 🌟

This remarkable success is a reflection of:
✨ Students’ hard work & determination
✨ Parents’ constant support & encouragement
✨ Teachers’ dedication & guidance

Together, we have created a milestone of excellence and made our school proud once again. ❤️📚

May this achievement inspire every student to dream bigger, work harder, and achieve greater success in the future.

👏 Congratulations once again to the entire Shree Gajanan Vidyalaya family! 👏

Photos from श्री गजानन विद्यालय -  आपली कल्याणमधील उत्कृष्ट मराठी शाळा's post 24/03/2026

श्री गजानन विद्यालय आणि सामाजिक वनीकरण विभाग बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा

शनिवार, दि. 3 जानेवारी ,2026 व 24 जानेवारी ,2026 श्री गजानन विद्यालय कल्याण( पश्चिम) आणि सामाजिक वनीकरण विभाग, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला ,निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता, संवेदनशीलता ,पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी, पर्यावरण पुरक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्वच्छता दूत म्हणून माझी भूमिका ,शहरीकरणाचा जंगलावर होणारा परिणाम, झाडे लावा, झाडे जतन करा इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. जंगलातील प्राणी किंवा पक्षी झाडाखाली गप्पा मारणारी माणसे किंवा खेळणारी मुले, प्लास्टिक मुक्त शहर इत्यादी विषयांवर सुंदर चित्रे विद्यार्थ्यांनी काढली निसर्गचित्र, जंगलातील प्राणी किंवा पक्षी ,प्लास्टिकचे प्रदूषण टाळा इत्यादी विषय रांगोळी स्पर्धेसाठी देण्यात आले होते. मनमोहक रांगोळ्या विद्यार्थिनींनी काढल्या या स्पर्धांमध्ये एकूण 78 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती कांचन भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाने व सामाजिक वनीकरण बदलापूर यांच्या सहकार्याने सर्व स्पर्धा वेळेत आणि उत्तमरीत्या पार पडल्या.

27/02/2026

🌸 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरी होणारी आपली 'मराठी' ही केवळ एक भाषा नसून ती आपली संस्कृती, आपला अभिमान आणि आपल्या विचारांचा भक्कम पाया आहे.

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व काय?

🧠 संकल्पनांची स्पष्टता (Clear Concepts): शिक्षण हे केवळ पाठांतर नसून समजून घेणे आहे. विज्ञानाचे अवघड नियम असोत किंवा गणिताची सूत्रे, जेव्हा विद्यार्थी ते आपल्या मातृभाषेतून शिकतो, तेव्हा त्याच्या 'संकल्पना' (Concepts) मुळापासून पक्क्या होतात. मातृभाषेतून विचार करण्याची प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक असल्याने, मुलांच्या बुद्धिमत्तेचा आणि तर्कशक्तीचा विकास अधिक वेगाने व सहजतेने होतो.

🌱 सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास (Personality Development): स्वतःच्या भाषेत व्यक्त होताना विद्यार्थ्यांच्या मनात कोणताही न्यूनगंड नसतो. हाच मोकळेपणा त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. शाळेत मिळणारे 'संस्कार', आपली संस्कृती आणि मराठी भाषेतील समृद्ध साहित्य मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला एक परिपूर्ण आकार देते. इंग्रजी ही संवादाची भाषा नक्कीच आहे आणि ती आपण एक 'कौशल्य' (Skill) म्हणून उत्तमरित्या शिकवतोच; पण विचार करण्याची आणि मूल्यांची भाषा आपली मातृभाषाच असते!

'श्री गजानन विद्यालय' याच विश्वासावर विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करत आहे. आमची मुले आज मातृभाषेचा अभिमान बाळगून जागतिक स्तरावर (Global Level) यशस्वी झेप घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने 'क्रांतीज्योती' ठरत आहेत.

कारण आमचे ध्येयच आहे...

"मूल्यांच्या पायावर, प्रगतीचे शिखर!"

आजच्या या मंगल दिनी, चला आपल्या भाषेचा जागर करूया आणि आपल्या पाल्याचे भविष्य मातृभाषेच्या संस्कारक्षम आणि भक्कम पायावर उभे करूया!

जय महाराष्ट्र! जय मराठी! 🚩

📍 प्रवेश सुरू: शैक्षणिक वर्ष २०२६-२७

तुमच्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच श्री गजानन विद्यालयाला भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

वंदना शिंदे मॅडम- 84250 28026

कल्पना पाटील मॅडम - 98923 79678

फोटो क्रेडिट - कुणाल म्हात्रे, रिपोर्टर आणि माजी विद्यार्थी

27/02/2026

Big shout out to my newest top fans! 💎 Lalit Chaudhari, Mrunali Kulkarni

Drop a comment to welcome them to our community, fans

19/02/2026

श्री गजानन विद्यालयाचे स्काऊट गाईड चे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना..!!🙏🏻🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा..!!🔥🙏🏻💐

02/02/2026

श्री गजानन विद्यालयातील मुलांचे कवायत प्रकार २

02/02/2026

श्री गजानन विद्यालयातील मुलांचे कवायत प्रकार १

10/11/2023

श्री गजानन विद्यालय - आपली कल्याणमधील उत्कृष्ट मराठी शाळा तर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

27/08/2023

*आपल्या शाळेत जुडो ,थाय बॉक्सिंग व शिकाई मार्शल आर्ट या खेळांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना या खेळाविषयी माहिती मिळावी यासाठी सोमवार दिनांक 28/08/2023 ते शनिवार दिनांक 02/09/2023 या कालावधीत शाळा सुटल्यावर सायंकाळी 6.00 ते 7.00 या वेळेमध्ये डेमो दाखविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना डेमो बघायचा आहे, खेळात सहभाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यावर थांबायचे आहे. सदर डेमो विनाशुल्क आहे.*

कल्याण : श्री गजानन विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! 06/08/2023

श्री गजानन विद्यालय कल्याण पश्चिम चे संस्थापक कै.प्रभाकर भालेराव दादा यांच्या जयंतीनिमित्त 5 ऑगस्ट रोजी दरवर्षी शाळेतील बालवाडी ,इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक , कल्याणातील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ.अमित झोपे हे होते. विज्ञान प्रदर्शनात साधारणता 300 विद्यार्थी सहभागी झाले. सदर कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीम. प्रतिभाताई भालेराव मॅडम, सचिव श्री. केदार पोंक्षे , संस्थेचे सदस्य श्री. सुश्रुत भालेराव , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांचन भालेराव मॅडम , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.अस्मिता माळी मॅडम उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी ,पालक यांनी खूप परिश्रम घेतले.

कल्याण : श्री गजानन विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! #डोंबिवली नेमके काय आहे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ आणि अशा आणखी ...

Want your school to be the top-listed School/college in Kalyan?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Agra Road
Kalyan
421301